श्री गणेश लेखमाला २०२४ -ब्रह्मघोटाळा
उपनिषदे म्हणजे भारतातील अनेक ऋषिमुनींच्या सखोल चिंतनाचा परिपाक आहे. विविध प्रकारच्या तत्त्वज्ञानांचे हे भांडार आहे. 'उपनिषद' या शब्दाचा अर्थ 'गुरूंजवळ बसून मिळवलेली विद्या' असा होतो. उप-नि-सद असा विग्रह केला, तर जवळ जाणे, रहस्य उलगडणे असाही एक अर्थ निघू शकतो. या विश्वाचे कार्य चालवणाऱ्या शक्तीच्या जवळ जाऊन तिचे रहस्य उलगडण्याचा मार्ग म्हणजे उपनिषद.
उपनिषदे तत्त्वज्ञान सांगतात, म्हणून त्यांना ‘ब्रह्मविद्या’ असे म्हणतात. उपनिषदे ही वेदांचे अंतिम अंग आहे, म्हणून त्यांना 'वेदान्त' असेही म्हणतात.
ज्ञानाची उच्चतम परिसीमा म्हणजे उपनिषदे.
श्री गणेश लेखमाला २०२४ - फार, फार, फार वर्षांपूर्वीच्या गणेशोत्सवातली गोष्ट
फार, फार, फार वर्षांपूर्वीच्या गणेशोत्सवातली गोष्ट
फार, फार, फार, फार, फारच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. फार शब्द फार वेळा वापरला, नाही का हो? त्याला कारण आहे. कारण ही खरंच फाssssर जुनी अगदी प्राचीन कथा आहे. माझीच. मी प्राचीन आहे हे माझ्याच तोंडाने कबूल करणं एक स्त्री म्हणून मला शोभत नाही. पण आता माझं म्हातारपण 'छुपाए न छुपाया जाय' ह्या कॅटेगरीत आलंय. मी आज ७५ वर्षांची आहे आणि ही गोष्ट आहे माझ्या लग्नानंतर लगेच घडलेली. लग्नात मी होते चोविशी उलटलेली. म्हणजे ५० वर्षं झाली आहेत या हकिकतीला.
तर आमचं नवं नवं लग्न झालेलं होतं. घरात आम्ही दोघंच.
श्री गणेश लेखमाला २०२४ - नाचणी - सुपर फूड
नाचणी, नागली याला फिंगर मिलेट, रागी याही नावांनी ओळखतात. शास्त्रीय नाव – एल्युसिन कोराकाना (Eleusine coracana) आहे. E. caracana subsp. Africana आफ्रिकाना यापासून उत्क्रांत झाली आहे. ही गवतासारखी दिसणारी एक तृणधान्य वनस्पती आहे. ३०००-५००० वर्षांपूर्वी पश्चिम युगांडा आणि इथियोपिया या अफ्रिकन देशांत नाचणीचे उत्पादन सुरू झाले. भारतामध्ये इ.स.पू. ३००च्या आसपास पश्चिम घाटापर्यंत पसरले. नाचणीचे बी / दाणे मोहरीसारखेच बारीक पण करड्या रंगांचे तपकिरी असते. त्यामुळे याची मळणी खूप आव्हानात्मक आहे. यातील गोदावरी, बी-११, पीईएस-११० इंडाफ८, दापोली-१, व्ही एल-१४९, निमगरवा, गरवा या जाती पिकवल्या जातात.
संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १ (पहिले १२ दिवस)
- Read more about संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १ (पहिले १२ दिवस)
- 30 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 11084 views
श्री गणेश लेखमाला २०२४ - ॥ श्रीगणेश स्तवन ॥
॥ श्रीगणेश स्तवन ॥
जय गिरिजात्मज हे गणनायक तू सकळांत कलाधिपती
वरदविनायक विघ्नविनाशक तू प्रतिपाळक या जगती ॥ध्रु.॥
तिलकविलेपित चंदनगंधित चंद्रविराजित भाळ तुझे
मुदित चतुर्भुज रूप मनोहर तेज मुखावर दिव्य सजे
सुमुख तुझे स्मरता अवघे खल,
श्रीकांत बोल्ला: दृष्टीहिन व्यक्तीचा डोळे उघडणारा प्रवास
- Read more about श्रीकांत बोल्ला: दृष्टीहिन व्यक्तीचा डोळे उघडणारा प्रवास
- 6 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 2772 views
प्रवास
- Read more about प्रवास
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 2449 views
प्रवास
कुठे पायवाटा, कुठे मार्ग मोठा
प्रवासाकडे लक्ष होते कुठे
अशी झिंग होती "तिथे" पोहचण्याची
कशाला फुका वेळ दवडा कुठे
आता पोहचल्यावर असे वाटते की
कुठे चाललो अन् पोहचलो कुठे ?
कुठे मार्ग हा स्पष्ट दृष्टीसी आला ?
अन् कुठे रांगता चालू झालो कुठे ?
इथे नित्य होतो अनादी अनंतीं
इथे जन्मलो, वाढलोही इथे
इथे जागलो तुझिया कृपेने
इथे बध्द अन् मुक्त झालो इथे
निघालो जिथुनि तिथेची पोहचलो
जिथे चालली वाट ती ही तिथे
आताशा गवसला प्रवासा मला तू
आता जायचे ना , यायचे ही कुठे.
Welcome Home !
_________________________________
द हिडन लाईफ ऑफ ट्रीज् (ऐसी अक्षरे-२०)
- Read more about द हिडन लाईफ ऑफ ट्रीज् (ऐसी अक्षरे-२०)
- 9 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 3634 views