Welcome to misalpav.com
लेखक: इनिगोय | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

+2 यहिच कहता है| बाकि मृणाल तैं नी त्यांच्या पठडितलाच विषय निवडला असं दिसतय. तरि शिनुमा पाहिल्या जाइलच. :-)

गुंतागुंत खूप छान उलगडलेय परिक्षणात.. हे अशा शब्दात लिहिणं आणि पोहोचवणं नक्कीच सोप्प नाही! आवडलच..

कथा, मानवी मनाची गुंतागुंत, नाते संबंधातील आडवळणे, अभिनय, चित्रपट... सगळ्या अँगलनी आस्वाद घ्यावा म्हणुन हे विषय चांगले आहेत. पण त्यातुन निष्कर्श काढण्याच्या भानगडीत पडु नये. कारण या सर्व सव्यापसव्याला मनाची "आय वॉण्ट सम चेंज" ही एकमेव भुमीका कारणीभूत आहे. असो. अर्धवटराव

दोघांपैकी एकाच्या बाबतीत 'बदल हवा' हे कारण असतं तेव्हा दुसऱ्या व्यक्तीची नाईलाजाने ओढाताण ठरलेली, नाही का? अशावेळी दुसऱ्या व्यक्तीने काय करायला हवं? या सिनेमाची गोष्ट ही त्या दुसऱ्याची गोष्ट आहे. पहिल्याच्या वागण्याचं समर्थन नक्कीच नाही.

माझा प्रतिसाद चित्रपटाचे कथानक, त्यातला पात्रांना मिळणारा न्याय-अन्याय, तुमच्या मनात ते कसं उतरलं आणि तुमच्या लेखणीतुन ते कसं उतरलं याबद्दल नाहिच मुळी. चित्रपट कथेच्या अनुषंगाने मी केवळ एक पुस्ती जोडली... कि चित्रपटाचा शेवट "दि अ‍ॅण्ड" नसुन "पुढे चालु... अनंत काळ" असा आहे. अर्धवटराव

पण त्यातुन निष्कर्श काढण्याच्या भानगडीत पडु नये.
धागाकर्ती अशा काही भानगडीत पडलीय असे दिसत नाही. a
कारण या सर्व सव्यापसव्याला मनाची "आय वॉण्ट सम चेंज" ही एकमेव भुमीका कारणीभूत आहे.
मला वाटते चित्रपट म्हणजे याच सव्यापसव्याचे चित्रण आहे... बाकी चालुदे....

>>धागाकर्ती अशा काही भानगडीत पडलीय असे दिसत नाही. -- नाहिच पडली धागाकर्ती त्या भानगडीत. मी माझ्या खिश्यातुन ति पुस्ती जोडली :) >>मला वाटते चित्रपट म्हणजे याच सव्यापसव्याचे चित्रण आहे... -- अर्थात. आणि त्या चित्रणाचे परिक्षण देखील उत्तम जमलय. अर्धवटराव

अश्या कथा पाहताना एकदम टोकाची मते आपल्यामध्ये असतात. पांढर्‍याला पांढरं, अन काळ्याला काळ म्हणनं रंगांच्या बाबतीत शक्य आहे, पण माणसांच्या बाबतीत नाही हे सांगताना इनिगोयच्या लिखाणातल जबरदस्त शब्द सामर्थ्य कौतुकास्पद!! उत्तम परिक्षण. पिक्चर पाहिला जाईल.

या सिनेमातली माणसं अशा ठोकळेबाज साच्यात बसवायचं कुलकर्णी यांनी पूर्णपणे टाळलंय, म्हणूनच ते खऱ्या आयुष्याच्या जास्त जवळ वाटतं. रोहित हे पात्र अतिशय स्टेबल दाखवलंय. मात्र एका प्रसंगात अनुश्रीने परिस्थिती हातात घेऊन निर्णय घ्यायला हवा असताना तिच्या सवयीने ती निमूटच राहते, तिथे त्याचाही तोल सुटलेला दाखवलाय. it's so human. नंतर तोच तिला तिने नेमकं काय करायला हवं आहे हे इतकं सुरेख समजावून सांगतो. हाही प्रसंग खेडेकरांनी उत्तम वठवलाय.

खुप छान परिचय आणि परीक्षण. बर्‍याच दिवसांनी पल्लवी जोशी चा सिनेमा आला आहे म्हणून सिनेमा बघायचा होताच, पण मनावर घेतलं नव्हतं, पण आता हे परीक्षण वाचून नक्कीच बघावा लागेल.

चित्रपट परिक्षण अतिशय सुरेख. अर्थात भावनाशील चित्रपट किंवा एकंदरीतच हल्लीचे मराठी चित्रपट आवडत नसल्याने पाहिला जाईलच हे सांगू शकत नाही.

:) पण हल्लीचे मराठी खूप वेगवेगळे विषय हाताळतायत, असं नमूद करू इच्छिते. गेल्या वर्षभरात आलेले मसाला, बदाम राणी गुलाम चोर, शाळा, आयना का बायना, बालक पालक असे इंटरेस्टिंग आणि मुख्य म्हणजे भावनप्रधान नसलेले चित्रपट जरूर पाहावे असे आहेत.

खरे आहे. यापैकी शाळा, मसाला पाहिला होता. शाळा चित्रपट चांगला असूनही सुजय डहाके कादंबरीला न्याय देण्यात कमी पडलेत असे खेदाने म्हणावेसे वाटते. मसाला चित्रपटातील ग्रामीण बाजाचे संवाद अजिबातच ग्रामीण वाटत नाहीत. आयना का बायनाचे तर नावच पहिल्यांदा ऐकतोय; म्हणजे तसे आधी ऐकले होते पण चित्रपट हिंदी असावा असे वाटले. बालक पालक मात्र पाहिला नाही.

अहो, तुम्ही "हमने जीना जीना सीख लिया" नावाचा (म्हणे) "शाळा" वर आधारित शिणुमा पाहिला नाही म्हणून असं म्हणताय. त्याचा कोण तो डायरेक्टर होता त्याच्या तुलनेत सुजय डहाके स्पीलबर्ग आहे.

शक्य आहे, सिनेमा चांगला झाला का वाईट याबद्दल दुमत असू शकेल. पुस्तकावरून केलेल्या सिनेमाच्या बाबतीत त्या दोहोंची तुलना करू नये, असं मला वाटतं. दोन्ही माध्यमं वेगवेगळी आहेत. पुस्तक नुसतं लिहून पूर्ण होत नाही, वाचूनच पूर्ण होतं. त्यात वाचकाची कल्पनाशक्ती अ‍ॅड झाल्यानंतरच ते वाचकाच्या समोर कथानक उभं करू शकतं. त्यामुळे प्रत्येक पुस्तक प्रत्येक वाचकाला वेगवेगळ्या तर्‍हेने अपील होतं. सिनेमा मात्र बाय इटसेल्फ संपूर्ण असतो. प्रेक्षकाच्या कल्पनाशक्तीला त्यात वाव नसतो. ती लेखक- दिग्दर्शकाचीच कमेंट असते. (गुलजारचे सिनेमे याला अपवाद, ते आवाडण्या-नावडण्यात बघणार्‍याच्या आकलनाचा, अनुभवाचाही वाटा असतो.. असं माझं मत!)

बरेचदा लोकं पुस्तक आणि चित्रपट ह्या माध्यमांची तुलना करतात, ते बर्‍याचदा अस्थायी असू शकतं. चित्रपटात वेळेच्या बंधनात (तीन तास/ अडीच तास..) दिग्दर्शक त्याला जे आणि जसं दाखवायचं ते दाखवतो, तुम्हाला ते तसंच वेळेच्या बंधनात राहून बघायचं असतं. पात्र जिवंत असली तरी ती आपल्यावर इतकी आदळू शकतात की तुम्ही विचार करेपर्यंत/ समजून घेईपर्यंत पुढचा सिन येतोच. थोडक्यात तुम्हाला एखादा चित्रपट एक एक सीन वेगळा काढून बघता येतोच असं नाही. पुस्तकाचं मात्र तसं नाही. तुम्ही तुम्हाला हवं ते/ हव्या त्या वेगात, तुमच्या स्वतःच्या अनुभवविश्वाची रमत गमत तुलना करत पुस्तक पुढे वाचत नेऊ शकता. त्यामुळे विषय जितका तुमच्या स्वतःच्या आयुष्याशी तुलना करण्यासारखा असेल तितकं पुस्तकं जवळच वाटत जाईल, कारण पुस्तक तुम्हाला हवं ते स्वातंत्र्य (स्पेस) देतं वाचताना! 'शाळा'च्या बाबतीत नेमकं हेच आहे, त्यामुळे पुस्तक सरस ठरलं तर त्यात विशेष नाही.

''आयना का बायना'' हा सिनेमा अतिशय 'हीन' दर्जाचा आहे असे खेदाने आणि संतापाने म्हणावे वाटते. ह्याच विकांताला तो झी मराठी वर पहिला आणि खुप निराशा झाली. (मुळात चिडचिड झाली कारण ह्या चित्रपटासाठी मी माझे बाकीचे सगळे कामं बाजूला ठेवले, घरच्यांचा ओरडा खाल्ला... आणि हातात काय पडले तर एक वाईट चित्रपट). मात्र, बाकी नमूद केलेल्या चित्रपटांशी १००% सहमत! @वल्ली - तुम्ही ह्या (''आयना का बायना'') चित्रपटाचे नावच नाही ऐकले हे उत्तमच, चुकूनही बघू नका हा एक सल्ला!

आयना का बायना मी पाहिलेला नाही, त्यामुळे चित्रपट कसा आहे, याची कल्पना नाही. 'प्रेमाची गोष्ट' हाही वरच्या यादीत नोंदवण्यासारखा एक चांगला सिनेमा होता. मात्र त्याची हाताळणी जरा गंडली, असं वाटलं होतं.

नाजुक विषयावरचा हा चित्रपट पण तितक्याच प्रभावी पणे आणि कुशलतेने केलेले परीक्षण. व्यक्तीरेखांचे बारकावे छान टिपलेत. नक्कीच बघणार हा चित्रपट.:)

बरं केलस इन्नातै. चित्रपटाचं परिक्षण भारी लिहून दिलेस. आता बिल्कुल बघणार नाही.

उत्तम परिक्षण पण चित्रपट कंटाळ्वाणा होतो.नभोनाट्य ऐकल्या सारखा वाटतो.डोळे मिटुन पाहिला तरी काही मिस करतो आहोत अस वाटत नाही. उदा: रोहितच्या हॉस्पिटलच्या आवारात बाग फुलवण्याच्या प्रसंगात बाग सुद्धा निट दाखवली नाही.

तुमचे चित्रपट परिक्षण आवडले. बायकोचा बालक-पालक बघण्याचा हट्ट धुडकावुन मल्टिप्लेक्सात जाऊन पुणे-५२ हा भयाण चित्रपट बघितल्यापासून सिनेमाग्रुहात जाऊन चित्रपट बघण्याचा धसका(दोघांनीही)घेतला आहे. टिव्हिवर लागेल तेव्हा वेळ असला तर जरुर बघण्यात येईल.

आवडला. संधी मिळताच पाहण्याच्या यादीत या चित्रपटाची भर घातली आहे.

ओघवते परीक्षण आवडले . पण वल्ली म्हणतो तसे आम्हास असले "भावनिक गुंतावळे" पाहण्यात अजाबात रस नसल्याने आमचा पास !!

मस्त लिहीलय परिक्षण...! पहिल्य दिवशिच पिक्चर जाउन बघितला होत. केवळ मृणाल कुलकर्णी साठी, विषय मात्र चांगला निवडला आहे तिने . . एका स्त्रीच्या भवना छान मांडल्यात तिने, तसेच सचिन खेडकरा आणी मृणाल यांच्या नात्यात होणारी घुस्मट हि खुप छान मांडलीये. तसे काम सर्वानिच छान केलय.

केवळ मृणाल कुलकर्णी साठी, ती कुलकर्णी होण्याच्या पूर्वी स्वामी मध्ये पहिल्यांदा पहिली तेव्हाच माझ्या हृदयाची स्वामिनी झाली होती. सौंदर्य व बुद्धिमत्तेचा मिलाफ त्याला संस्कारक्षम व्यक्तिमत्त्वाचे कोंदण त्याला पुणेरी पैलू पडलेले . क्या बात हे तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी हा सिनेमा पहिला जाईल.

परिक्षण आवडले. दोन- तीनदा वाचले तेव्हा नक्की कोण कुणाबरोबर आहे हे समजले. म्हणजे आधी नावांचा गोंधळ. असो. :) बाकी मृणाल 'देवांची' आणि माधवरावांची 'रमा' असल्यापासून आवडायची. ' बन्नो तेरी....' वाली विको ची जाहिरात मस्तच. नवीन मालिकांमधली मधली तिची 'गुंतता हृदय हे' मधली नायिका आणि मुळात मालिका सतीश राजवाड्यांची असल्याने आवडली.

वा. अगदी नीट तपशीलवार पाहिला आहेत चित्रपट. त्यामुळे केवळ चित्रपट परिचय असा लेख न होता, काहीसा रसग्रहणात्मक आणि तरीही स्पॉईलर्स नसलेला उत्तम लेख झाला आहे. हा लेख प्रत्यक्ष चित्रपट बघताना काहीसा गाईडलाईन देणारा आणि आनंद वाढवणारा ठरेल.

:-) काहीकाही सिनेमे इतके सुरेख बनतात, की त्यातल्या एकाएका प्रसंगावर खूपसं बोलता येऊ शकतं. आणि म्हणूनच मग किती सांगायचं, कुठे थांबायचं हे ठरवावं लागतं. तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे असणारं 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमाचं मटामधलं मुकेश माचकर यांनी केलेलं रसग्रहण सहज आठवलं. अजूनही संग्रही आहे ते.

दखल घेण्याजोगा आहे.
कारण या सर्व सव्यापसव्याला मनाची "आय वॉण्ट सम चेंज" ही एकमेव भुमीका कारणीभूत आहे.
आणि
कथा, मानवी मनाची गुंतागुंत, नाते संबंधातील आडवळणे, अभिनय, चित्रपट... सगळ्या अँगलनी आस्वाद घ्यावा म्हणुन हे विषय चांगले आहेत. पण त्यातुन निष्कर्श काढण्याच्या भानगडीत पडु नये.
कारण निष्कर्श निघूच शकत नाही. फक्त चर्चा होईल जिचा आपल्या रोजच्या जगण्याला, विचारांना दिशा मिळायला काही एक उपयोग नाही. ओशोंचं आकाशावर लिहून ठेवावं असं एक वाक्य आहे : `मन का स्वभावही कुछ ऐसा है, उसे जो मिल गया वह व्यर्थ हो गया!' अनुश्री आणि केदार : अनुश्रीनं स्वतःच्या अक्कल हुशारीनं केदारसारखा उडनखटोला निवडलाय. आता कुणाला बोलणार? बरं प्राप्त परिस्थितीत काही मार्ग नाही पण संधी मिळताच रोहितबरोबर जमवायचा चान्स सोडत नाही. थोडक्यात काय तर अनुश्रीसाठी केदार आणि केदारसाठी अनुश्री व्यर्थ आहेत कारण ते उपलब्ध उपभोगू शकले नाहीत. एकमेकांशी सूर जुळवू शकले नाहीत. केदारला पश्चात बुद्धी होते तोपर्यंत अनुश्रीचं रोहितबरोबर चालू झालं आहे. रोहित आणि प्राची : संशोधनात करियर करण्यासाठी डिवोर्स कशाला घ्यायला हवा? म्हणजे वरून काहीही उच्च कारण दिसो, ते एकमेकांना कंटाळलेले आहेत. `मात्र आजही मैत्रीचं नातं टिकवून आहेत'. ही निव्वळ धूळफेक आहे. थोडक्यात दोघांनाही आपल्या निर्णयावर विश्वास नाही म्हणून ते परतीचा मार्ग मोकळा ठेवून आहेत. आणि दोघंही भंपकपणाचा कळस आहेत. कारण प्राचीला तिच्या आवडीचं `प्रेमपात्र' मिळालं नाही (इतकंच) पण रोहित संधी मिळताच अनुश्रीशी जमवून मोकळा झाला आहे. अर्थात निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक यांचा वकूब तो काय? तर सिनेमाची कॅच लाईन पाहा :
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं शिडीवर चढता चढता सापानं गिळायचा गेम असतं.
प्रेम म्हणजे एकमेकांप्रती संपूर्ण कमीटमेंट. दुसर्‍याला हरेक परिस्थितीत साथ देणारी एकसंध चित्तदशा. प्रेम म्हणजे मनाच्या `जो मिल गया वह व्यर्थ हो गया' या स्वभावावर मात करणं. सुरूवातीलाच योग्य निर्णय घेणं आणि मग उपलब्धाला आपल्या साथीदाराबरोबर नि:सीम कृतज्ञतेनं उपभोगणं.

बोला पुंडलिक वरदे हाआआआआआआआआआरी विठठल......! त्या ' टिकल्या वर्क' वाल्या साड्यांसाठी एक 'टीपिकल' शब्द आहे. त्या हो उन्हात चमकतात त्या! कुणाला माहिती आहे का? ;) हा आक्खा प्रतिसाद अवांतर आहे. हा म्हणजे माझा. :)