Welcome to misalpav.com
लेखक: अक्षरमित्र | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

पु.भा.प्र. अवांतरः >>आई, बाप, आणि आम्ही ३ भावंडे लहानाची मोठी झालो. -- आई, बाप आपल्या हिरोच्या सोबतच लहानाचे मोठे झाले... सेकण्ड लाईफमागची हिच मुख्य प्रेरणा काय ?? अर्धवटराव

सर्वप्रथम नवीन फ्लॅट मध्ये शीफ्ट झाल्याबद्द्ल मनापासून अभिनन्द्न ! माझाही प्रवास असाच काहीसा झाला आहे. मला सेकन्ड लाईफ असे काही वाटत नाही. जीवनशैली बदलली असे बोलू शकतो. जीवनशैली प्रमाणे खर्चही वाढला असणारच. शक्यतो आई वडीलाना बरोबर घेवुन जा. आपल्या कमाईने घेतलेल्या घरात आईवडीलाना घेवुन जाण्याचा आनन्द काही औरच. काहीही झाले तरी जूने दीवस वीसरू नका. जुन्या मीत्रान्च्या शेजारान्च्या सम्पर्कात रहा. शक्यतो जुन्या ठीकाणी राहात असताना जेवढा खर्च होत होता तेवढ्याच खर्चात घर चालवण्याचा प्रयत्न करा.(हे थोडे कठीण आहे पण असे केल्याने बचत करू शकाल - स्वानुभव) पु.भा.प्र.

चुकून "सेकंड वाईफ" असे वाचले आणि मोठ्या उत्सुकतेने धागा उघडला. असो, लेख आवडला.
लेखक: garava वेळ: गुरुवार, 05/16/2013 - 05:38 Permalink

काहीही झाले तरी जुने दिवस विसरू नका. जुन्या मित्रान्च्या शेजारान्च्या सम्पर्कात रहा. शक्यतो जुन्या ठीकाणी राहात असताना जेवढा खर्च होत होता तेवढ्याच खर्चात घर चालवण्याचा प्रयत्न करा.(हे थोडे कठीण आहे पण असे केल्याने बचत करू शकाल - स्वानुभव)>>>>+१

वाचतेय. ही काल्पनिक कथा आहे ना? वरचे काही प्रतिसाद वाचून गोंधळ होतोय.

येक्जॅक्ट्ली हाच्च प्रश्न मला पडला. मला वाटतंय की ही कथा आहे. चाळीची वर्णनं अर्थातच स्वानुभवातून आली असावीत. आता पुढच्या भागात "हार्डवेअरच्या व्यवसायात असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात थरार कसा उत्पन्न झाला" अशी कथा असावी. ते असो. मस्त लिहिलंय. पुभाप्र!

हा भाग छोटा आणि प्रातर्विधीच्या अनावश्यक तपशिलाने भरलेला वाटला. चाळीतल्या जीवनाचे सर्वांगी वर्णन यायला हवे होते. अर्थात, पुढील भागात कथानक/अनुभवकथन कसे पुढे सरकते ह्यावर त्याचे महत्त्व अवलंबून असेल. पुढील भाग लवकर येऊ द्यात.

मीही जवळजवळ अर्धे आयुष्य चाळीतच काढले. मी तेव्हा खोपोलीला राहात होतो. सार्वजनिक संडासची आठवण आहे. तेच दादा कोंडकेंनी सिनेमात मस्त दाखवले होते. घाई लागली असतांना नेमके कोणीतरी पटकन जाते. तेथेच गप्पाही रंगत. मला आठवते लहान मुलांच्या पण अशाच गटारीवर गप्पा रंगत. असो, पण या आठवणी सोडल्या तरी बर्याच चांगल्या आठवणीही कायम घर करून आहेत. सर्व सण चाळीत मिळून साजरे होत. अगदी गणपती पासून ते होळी, रंगपंचमी, संक्रांत, त्याआधी भोगीची खिचडी व्हायची. सगळयाकरिता मिटिंग व्हायची, दरवेळी कुणा एकाकडे, मग चहापाणी, गप्पा . इतकी खूप मजा यायची. आता सर्व लोक बहुतेक इकडे तिकडे पांगले. कुणी ब्लॉकमध्ये, कुणी बंगल्यामध्येही राहायला गेले. पण एकत्र भेटले कि सगळ्यांचे हेच म्हणणे असते कि जी मजा चाळीत यायची ती आता यॆत नाहि. तो खरोखर सुवर्णकाळ होता. एकमेकांच्या सुखादुख्खात सर्व सामील होत. कठीण प्रसंगातही सर्व मिळून एकजुटीने राहात. माझ्या मुलीही कुणाहीकडे जेवत होत्या. कोणी नसले तरी चिंता नव्हती.