मुम्बईत अजुन तरि मेरवान वगैरे शिल्लक आहेत हेही नसे थोडके,पण भावना कल्लोळ सन्ध्याकाळी जास्त उशीर करु नका कारण सन्ध्याकाळी साडेसहा पर्यन्त मेरवान मध्ये शुभम्करोती फुक कल्याणम होते उगीच विरस नको व्हायला.
वेगळा...खानदानी, अस्सल अनुभव असायचा.
मुंबईत...व्हीटीसमोर....एंपायर आहे का बघा किंवा मगेच न्यू एक्सलसियर काफे,
बघा अपर्णा , ही हॉटेलं जिवंत आहेत का ते ....
तुम्हाला कॅफे एक्सेलसिअर म्ह्णायचे आहे का?
तिथे बिर्याणी वेगळ्याच प्रकारची मिळते. माझ्या फार पूर्वीच्या रेग्युलर हँगाउट्सपैकी ते होतं. मधे दहा वर्षांच्या अंतराने गेलो तर सापडेचना.. मग आपल्या मिपाकर खादाड अमिता यांनी ते शोधून काढलं आणि त्यावर लेख लिहीला. त्यानंतर मी परत गेलो आणि तेव्हापासून तिथे हादडत आहे. आता ते आणखीनच चांगलं झालं आहे. पोटमाळ्यावर नवा विभाग केला आहे. काही लेबनीज पदार्थही आहेत. पण इराणी इसेन्स अजिबात कमी झालेला नाही. लांबडी खारी आणि ग्लासभर चहा हाही इथला खास प्रकार.. बाकी पदार्थांविषयी लेखच होईल. मटणपॅटिस / कटलेट हेही जरुर ट्राय करावे.
कितीही वेळ बसा कुणीच काहि बोलणार नाही, ही खरी इराण्याची लज्जत..
खिशात चवल्या-पावल्या असताना, चार पाच मित्रांसोबत, एक कप चहा आणि २-३ दमांवर तासन तास क्रिकेट, राजकारण, नट-नट्या यांवर गप्पा टाकत, चालती बोलती प्रेक्षणीय स्थळ दिसतील अशा मोक्याच्या ठिकाणी बसल्याच्या (व्हॉईस ऑफ इंडिया) कैक आठवणी अंमळ आठवून गेल्या! ;)
इराण्याची ही हाटेल शक्यतो कोपर्यावरच... सेनापती बापट मार्गावरचा किंवा पार्काच्या पलिकडचाय (कॅडल रोडवरचा) इराणी नेहमीचा असायचा पण ग्रँटरोडचा मारवान किंवा मार्केटच्या आसपासचे इराणी किंवा फोर्ट/ चर्चगेट मधले इराणी सगळे खासच!
मित्रांचा अड्डा जमवण्याच हक्काच गेल्या पंधरा वर्षांपासूनच ठिकाण अगदी हेच! :)
- सनराईज (ठाकुरद्वार) आणि व्हॉइस (गिरगाव) इराणी प्रेमी
परवाच मी ऑर्कुटवर इराणी हॉटेलच्या स्मृती जागवल्या आणि आज इथे... तो चहा, सोबतीला ब्रूनबटर, अन ऑमलेटपाव.. तिथेच खावा असा.. मुंबईतून आजकाल नाहिसे होत चालले आहेत हे इराणी हॉटेल..... की आहेत अजूनही पण मॅकडी, सीसीडी, पिझ्झा हटच्या भाऊगर्दीत हरवलेत..
इराण्याचा क्लासच वेगळा..
खास दक्शिण मुंबईची लज्जत न्यारीच ह्या इराण्यांच्या बाबतीत, मुळात त्यांची मॅक्डी/ पिझ्झा हट शी दुरान्वयेही तुलना होऊ शकत नाही. म्हणजे मॅक्डी वगैरे आले म्हणून इराण्याच्या हॉटेलमधली लोकं तिथे जाणार नाहीत, फार तर उडप्यांचि तिथे थोडीफार स्पर्धा असेल इतकच!
पण त्या ९३ च्या दंगलीत हीच इराण्यांची काही हाटेल जाळली होती, विषण्ण वाटल! :( जसे चांगले अनुभव आहेत तशा वाईट स्मृती सुद्धा..!
गुडलक आहे की!
पुणे महानगरपालिकेसमोरही एक मस्त कळकट असं इराण्याचं एक हाटिल आहे असा नुकताच शोध लागलाय. कधीतरी जाता येईल बहुतेक.
अजून मस्त डिटेलवार लिहायला हवं होतं.
@पुणे महानगरपालिकेसमोरही एक मस्त कळकट असं इराण्याचं एक हाटिल आहे >>> तिथे मस्का/पाव चांगला मिळतो,छा 1 नंबर असतोच, शिवाय पट्टि सामोसाहि अगदि पट्टिचाच ! :)
इराणी उपहारगृह ही मुख्यतः चौकात, नाक्यावर, मोक्याच्या ठिकाणी असायची.
एके काळी इराणी आणि ज्युक बॉक्स हे समीकरणच होतं. नाणी टाकायची आणि आपली आवडती गाणी ऐकत, चहा, केकचा आस्वाद घेत गाणयांची मजा लुटायची. वेळेचे बंधन नसायचे.
अंधेरी पश्चिमला स्टेशनला लागून इराण्याचे 'रेल्वे रेस्टॉरंट' होते तीथे ब्रुन पावाला बटर लावायचे काम पहाटे ३ वाजता सुरू व्हायचे ते ५ वाजता संपायचे. ब्रुन-बटर शेकड्याने बनविलेले असायचे ते पहाटे ५ ते ७ ह्या वेळात संपायचे.
इराण्याकडचे ऑम्लेट पाव हा अजुन एक आकर्षक आणि अत्यंत आवश्यक पदार्थ. बॉम्बे सेंट्रल स्थानका बाहेर सकाळी ८ वाजता बेकरीतून 'गरम गरम' पाव यायचे. कधी तिथे जायचा योग आला की, सायकलवरुन पाववाला येई पर्यंत मी बाहेरच थांबायचो त्या पाववाल्याने पावाच्या लाद्या पोहोचवल्या की आंत जायचं आणि खिमा + गरम पाव हादडायचा. त्याचं व्यसनच लागल्यासारखं झालं होतं.
इराणी उपहारगृहांचा एक वेगळाच दर्जा होता.
जाता जाता:
मराठी माणूस सुद्धा टेक-ओव्हर वगैरे करू शकतो
मराठी माणसाने टेक-ओव्हर ह्याच्या किती तरी आधीपासून सुरू केले आहे. दादरच्या कोहिनुर मिल क्र.३ समोरील इराण्याचे उपहारगृह बळजबरीने टेक-ओव्हर करून 'सेना-भवन' उभारलं.
मराठी माणसाने टेक-ओव्हर ह्याच्या किती तरी आधीपासून सुरू केले आ
अगदी. मीही पुण्यातले काही किस्से ऐकलेत. उगीच मराठी आहेत म्हणून अज्जीबात साधे नसतात. किंबहुना या प्रकरणात साधे असणे हे डिस्क्वालिफाय करते आजकाल. माणूस काश्मिरी असो किंवा तमिळी, हडेलहप्पी करतातच.
कयानीच्या समोरचा बास्तानीदेखील बंद झाला. मेरवान ही तर आमची पंढरीच आहे. शिवाय चर्चगेट स्थानकाच्या बाहेरचा इराणी...त्याच्याकडचा बुरुणमस्का, खिमापाव..
मेरवानच्या सगळ्या इतिहासासकट एक कच्चा लेख तयार आहे... त्या अत्यंत चमत्कारिक इराण्याने मला दिलेली मुलखत आहे.. ती एकदा ठाकठीक करून इथे लिहायची आहे..
तात्या.
बरेच वर्षापूर्वी museum हून getway कडे जायच्या रस्त्यावर एक इराणी हॉटेलात चहा आणि कॉफी एका कपात समप्रमाणात मिसळेले मारामारी नावाचे पेय प्यायलो आहे. हे हॉटेल आता आस्तित्वात आहे कि नाही हे माहित नाही.
बाकी इराणी हॉटेलांचे वैशिष्ट्य म्हणचे चौकात कोप्र्यावरची जागा, त्यातील संगमरवरी टेबले आणि खास शैलीतील खुर्च्या. . त्यांच्याकडे मिळणार्या गुलाबी रंगाच्या चहा सारख्या रंगाचा चहा इतर कुठेही मिळत नाही.
तशी मुंबईतली ... शं.वि.हिं.हॉ. ...अर्थात शंकर विलास हिंदू हॉटेल्स किंवा पुण्यातल्या अमृततुल्यांमधे साधा + पेश्शल मिसळून "मारा-मारी" दिली जाते.
पण रमेशजी तुम्हाला हे अगदी भार्री "आठवले"..!
मारामारी अन केटी ही सोलापुरातल्या चहाची स्पेशलिटि आहे, एमेसिबीच्या ऑफिसचं कँटिन, हुतात्मा बागेसमोरचा सिद्धेश्वर, सात रस्त्याचा इंडिया , तुळजापुर वेशीतला गुलाब केटी आणि लांबोटिचा स्पेशल. प्रत्येक सोलापुर ट्रिपमध्ये एवढे चहा पिल्याशिवाय गाडी पुन्हा हायवेला लागतच नाही कधी. मग येताना भिगवणला एक टपरी आहे ठरलेली तिथं.
बाकी हे अवांतर झालं, पण इराण्यांबद्दल म्हणाल तर पुण्यात अजुन बरीच जिवंत आहेत. कोरोनेशन आहे स्टेशनच्या समोर, केइएमच्या समोरचं आहे अजुन, गुडलक तर आहेच, सोलापुरात पण लकी होतं ते गेलं कधीच. कर्वेरोडला सह्याद्री हॉस्पिटलच्या समोर आहे, रेल्वे बुकिंग सेंटरच्या बाजुला. बाकी चर्चगेटजवळचं स्टेडियम मात्र अफलातुन आहे.
सुरेख आणि सुटसुटीत लेखन. आवडले.
आपल्याला, 'इराणी हाटेलं असतात' हेच माहिती नाही हे दाखवल्याने जास्ती ट्यार्पी मिळेल, का आपण लहानाचे मोठे इराणी हाटेलच्या अन्नावरच झाल्यासारखे वागल्याने जास्ती ट्यार्पी मिळेल हे निश्चित झाले की मग सविस्तर प्रतिक्रिया देतो.
अरे अजुन कुणीच वहुमनचं नाव घेतलं नाही??? पुण्यात स्टेशनच्या मागे येरवडा रोड वर.. कोणत्याही शुद्ध इराणी हॉटेल मधे मिळणारे बन-मस्का, बन ऑम्लेट, भुर्जी पाव एकदम भारी मिळतात.. आणि चहा तर, आहाहा!!!! शनिवार सकाळ, ४ जिवलग मित्र, ३-४ बन-मस्का, २-४ भुर्जी पाव आणि १०-१५ चहा.. तास दोन तास असे स्वर्गात गेल्यासारखे वाटतात.
अरे हो, हे राहिलंच, जहांगीरच्या बाजुला आहे तेच ना. तिथं पार्किंगचा प्रश्न आहे थोडा बाकी लई भारी,
एक चहा बिन मस्क्याचा पाव बुडवुन खायला, दुसरा मस्क्याचा पाव बुडवुन खायला, आणि तिसरा चहा हा चहा म्हणुन.
लई मजा येते तिथं. हल्ली थोडं वेळ वेळ करतात तिथं.
तीनचार वर्षांपूर्वी जहांगीरसमोरचा सिग्नल लय तुंबायचा. मो.सा. नेमकी वहुमनच्या दारात उभी राहिली की आतून एक एक जीवघेणे वास यायचे. माझ्या पोटातली गुरगूर बाजूच्याला ऐकू जाईल की काय असं वाटायचं. पण त्या कुटाण्यात पार्किंग कुठे मिळणार? त्यामुळे वहुमनमध्ये जायचं राहिलंच...
कररेक्ट... अशीच तर नांवं येत जातात आणी
मन नोंदी करू लागतं
बाय द वे, वहुमन ...की योहुमन ?
बिर्याणी पण १ नंबर मिळते तिकडे.
सायन सर्कल ला पण एक होता यार...
तिथे फक्त बिर्याणी राईस मिळायचा , वर सुर्वा...
स्वस्तात मज्जा , ८०-८१ साली हे तब्बल ... ३ रू. ला मिळायचं !
पार्कात लाईट ओफ भारत नवाच ईरानि होटॅल आहे.
ब्रुन मस्का फारच छान मिळतो तिकडे. पण आता त्यात इराणी पणा कमी होत चाललाय.
नवनवीन पदार्थ चायनीस, पंजाबी, तंदुरी, असे काही पदार्थ चालू केले आहेत.
पण मस्का पाव आणि पानी काम ची मजा काही औरच
चहा 14 रुपये कटिंग झालाय.!
ब्रुन मस्का फारच छान मिळतो तिकडे. पण आता त्यात इराणी पणा कमी होत चाललाय.
नवनवीन पदार्थ चायनीस, पंजाबी, तंदुरी, असे काही पदार्थ चालू केले आहेत.
पण मस्का पाव आणि पानी काम ची मजा काही औरच
चहा 14 रुपये कटिंग झालाय.!
शनिवार चा बेत शक्यतो गुडलक कॅफे चाच असतो.सकाळच्याला बन-ओमलेट नायतर बनमस्का,चा आणि सांच्याला तवा खिमा,तंगडी बिर्याणी…हे हॉटेल आणि ग्राहक घासिम याक्षी ची पुढची पिढी अजूनही छान सांभाळते.सध्या त्या चौकातले चारही कॉर्नर एका मराठी नेत्याच्या पुत्राने विकत घेतल्याचे ऐकले आहे.
मन्सूरभाई अरीई चा जॉर्ज पण चांगल चालूये अजूनही…
प्रतिक्रिया
संध्याकाळी मेरवान गाठलेच
शप्पथ ! मेरवान कसा विसरलो,
मुम्बईत
विषय मस्त, पण लेख थोडक्यात
मलाही वाटलं बरं का सौंदाळा,
आमाले ते इराणी चाय लै अवडते !
चांदणी चौकात
बंजारा हॉटेल शेजारी
मी कधीही अशा ठिकाणी गेले
इराण्यांची हॉटेलं आणि त्यातले
मुंबई-पुण्यातच आहेत बहुतेक
FYI
मी पण नाही ग गेले कधी.
वेगळा...खानदानी, अस्सल अनुभव
एंपायर च्या बाजूचा आहे कि
पुण्यात असाल रेवती, तर गुडलक
सहीच..
चला , प्रत्यक्ष नाही तरी
परवाच मी ऑर्कुटवर इराणी
परवा?
इराण्याचा क्लासच वेगळा..
डेक्कनचं लकी पण गेलं
गुडलक आहे की!
@पुणे महानगरपालिकेसमोरही एक
नका हो वर्णन करू.
(No subject)
काय सांगता! मस्त!
कुठे, कुठे? नक्की खाणाखुणा
तसं के.इ.एम. समोर पण आहेच, पण
इराणी उपहारगृह् संस्कृती.
चर्च्गेटचा "स्टेडियम" अजूनही
मराठी माणसाने टेक-ओव्हर
लाइक-ड !
कयानीच्या समोरचा
व्वा व्वा विसोबा....
Liked.. : - )
मारामारी
तशी मुंबईतली ... शं.वि.हिं.हॉ
मारामारी अन केटी ही
केटी
केटी मंजे फक्त दुदातला चा.
छान !
अरे अजुन कुणीच वहुमनचं नाव
अरे हो, हे राहिलंच,
तीनचार वर्षांपूर्वी
कररेक्ट... अशीच तर नांवं येत
शिवाजि पार्कातल लाईट ओफ भारत
लाईट ऑफ भारत शिवाजी पार्क
हेच ते "बरूण-मस्का" वालं....
शनिवार चा बेत शक्यतो गुडलक
Pagination