गुडलक हा एकेकाळचा फेवरिट इराणी अड्डा. लकी सोडून गुडलकला प्रथम पसंती देण्याचं कारण असं की एकदा लकीवाल्याने नुसती एक्स्ट्रा ग्रेव्ही (बिना चिकनची) देण्यास नकार दिला. त्यामुळे आमच्या ग्रुपचं आर्थिक गणित बिघडलंच, पण "नाही" ऐकावं लागलं. इराणी हाटेलात.. मग पुण्याची इतर हॉटेल आणि इराण्यात फरक काय राहिला? म्हणून गुडलकला शिफ्ट केला अड्डा..
तसा लकीमधेही "जास्त वेळ बसू नये" वगैरे बोर्ड होता, पण त्याला अजिबात काही अर्थ नव्हता हेही खरंच.
गुडलकमधे श्रूजबेरी ठेवायचे..(मूळ कयानीतून आणलेली) आताचे माहीत नाही.
खिमा पाव आणि अन्य काही चिजा जबरदस्त पोटभरीच्या होत्या असं आठवतं.
नुकत्याच केलेल्या दौर्यात तिथे शाकाहारी (बहुधा महाराष्ट्रीय) थाळी मिळेल असं लिहीलं होतं. पुन्हा पुन्हा खात्री केली. ते गुडलकच होतं.
महाराष्ट्रीय थाळीही प्रियच आहे पण गुडलकमधे?
खरंच तसं झालं आहे का?
तीच पाटी अलकासमोरच्या इराणी कॅफेवरही (नाव आठवेना) पाहिली.. सात्विक शाकाहारी थाळी..
कालाय तस्मै नमः.
नुकत्याच केलेल्या दौर्यात तिथे शाकाहारी (बहुधा महाराष्ट्रीय) थाळी मिळेल असं लिहीलं होतं. पुन्हा पुन्हा खात्री केली. ते गुडलकच होतं.
याबद्दल विचारलेलं,घासिम चा पोरगा म्हणे मार्केट ट्रेंड सांभाळावा लागतो…मेनू कार्ड मध्ये बर्याच नवीन गोष्टी आल्यात या १-२ वर्षात पण त्या स्वागतार्ह्यच होत्या…(स्पेशली नॉन-वेज मध्ये बरच काही)
झी मराठी या वाहिनीवर रोज दुपारी दीड ते दोन पर्यंत 'आम्ही सारे खवय्ये ' नावाचा कार्यक्रम दाखवितात. सद्ध्या त्याच्या अंतर्गत ' जाऊ तेथे खाउ' या नावाचा प्रोग्राम दाखवितात. त्यात वेगवेगळ्या शहरातील हॉटेलांमध्ये त्यांची टीम जाते आणि तेथे मिळणार्या खाद्य पदार्थांविषयी हॉटेलचे मालक आणि कर्मचारी यांच्याशी चर्चा करते.
आज( २७ मे) रोजी हि टीम पुण्याच्या कॅफे गुड लक मध्ये गेली होती त्या संबधीची क्लीप दाखवली गेली. गल्ल्यावरील माणूस आणि कर्मचारी यांच्या पैकी कोणीही इराणी वाटला नाही. म्हणजे गुडलक चे स्वदेशीकरण आहे असे वाटले.
जॉर्जमधे इराणी स्टाईलचं काही मिळत असेल पण त्याचा बाज, लुक अँड फील हे इराणी रेस्टॉरंटसारखं वाटलं नाही.
पण काय माहीत, स्टिरीओटाईप नसेल.. वेगळा लेआउट आणि मेन्यू ठेवला असेल.
क्याम्पातलं क्याफे नाझ आणि महानाझचं नाव अजून कुणी कसं काय नाय काढलं ब्वा.
क्याफे नाझ कधीच बंद होऊन तिथे आता बरिस्ता झालंय तर महानाज ताबूत स्ट्रीट वर स्थलांतरीत झालंय. पण महानाजचे पट्टी समोसे अजून तशीच चव देतात.
अनेक वर्ष आरटीओ पासून किंवा थेट नारायण पेठेतून नाझपर्यंत त्या सामोशासाठी गेलो आहे.
बरिस्ताने गिळंकृत केल्यावर महानाझवर भागवलं होतं नंतर काही वेळा.
ते अजून चालू असेल तर त्याचा नेमका पत्ता मिळाला तर जबरा मजा येईल....
महानाझ अगदी जवळच आहे.
हॉटेल अरोरा टॉवर्सच्या उजव्या बाजूच्या गल्लीत (जुन्या महानाझ समोरच्या गल्लीत) वळून लगेच डावी मारा. ताबूत स्ट्रीट येईल. तिथेच चालत जेमतेम २ मिंन्टांच्या अंतरावर आहे.
आता सामोश्यांबरोबर टॉमेटो सॉस मात्र होममेड न देता रेडीमेडच देतात त्यामुळे सॉसशिवायच सामोसे चापणे चांगले.
चला आजची दुपार @mahanaaj.com , thanks to #walli.
ट्याग केल्यालं हाय बरं का वल्ली, रागवायचं काम न्हाय ,
हा...हा...हा...
(ह्याचा अर्थ १.मला मिपा च्या स्मायल्या वापरता येत नाहीत, २. मी "मजेत" बोललो - हेहे)
६ सामोश्यांची प्लेट, केचप, चहा अन् बनमस्का...
(चालत असंल, तर चिकन सामोसा पन् ट्राय करून बघा)
नाझ आधी आंबेडकर चौकात होतं, तिथं बरिस्ता झाल्यावर मागच्या चौकात गेलं. तिथंपन नायके झाल्यावर ते अजून आतल्या गल्लीत गेलं, तेपन नाव बदलून. पन सामोसा, चहा अन् बनमस्का तसाच आहे.
अॅड्रेसः नायकी शोरूमपासनं गार्डन वडापावच्या रस्त्यानी जाय्चं, पहिल्या डाव्या हाताला वळणार्या रस्त्यावर जायचं. ह्या कोपर्यावर आरबीएस् अन् एबीएन अॅम्रो ची एटीएम आहेत. (आपोझिट साईड्ला सुलभ आहे). आत १०० पावलं गेलं, की उज्व्या हाताला महानाज!
प्रतिक्रिया
गुडलक हा एकेकाळचा फेवरिट
अलका समोरचं तर कधीच सात्विक
याबद्दल विचारलेलं,घासिम चा पोरगा...
अहो गवि, रीगल, रीगल ते....
कॅफे गुड लक video
camp मधलं का हो हे जॉर्ज ?
हे इराणी आहे ?
जॉर्जमधे इराणी स्टाईलचं काही
अनेक मिपाकरांची भेट / ओळख
क्याम्पातलं क्याफे नाझ आणि
महानाझ!!
महानाझ अगदी जवळच आहे.
चला आजची दुपार @mahanaaj.com
महानाझ
अहो, कढून झालं की, पण सामोसे
तुमच्या लेखात
Pagination