Welcome to misalpav.com
लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

काका शेवट कळाला , बाकी सगळ डोक्यावरुन गेल , पुभाप्र .

गोष्ट काय झेपली नाय, पण...इराणी हाटिलातल्या रोजच्या बैठकीतल्या गप्पांच्याच जातकुळीतली असल्यानं कॉफीचे घोट घोट घेत वाचल्यावर मजा आली. :) साला, ते काव्हीकानेचं चित्र पाहूनच दिल खुश झाला. हैऽऽअसं एक चार दोस्त गोळा करावेत, असल्या अस्सल तुरुकी अ‍ॅम्बियन्सच्या ठिकाणी जावं, कॉफीच्या दळलेल्या बियांच्या वासानं आपसुकच मूड जमून जावा, मऊ मऊ गाद्यागिरद्यांच्या मुसुलमानी बैठकींवर तबियतीत मैफिल जमवावी, जन्नत-उल-फिरदौस नाहीतर फक्र-उल-अरब चा फाया कानाशी चढवावा, हुक्क्याची नळी फिरवत गप्पांचे फड रंगत जावेत..सोबतीला अरेबिक/तुर्की कॉफीचे प्याले येत जावेत.... व्वा! जयंतराव, माहौल बनवून टाकलात मियाँ! आज साला शुक्कीरवारचा मुहुर्त धरुन संध्याकाळी जावं लागतंय आता अरेबिक क्याफेमध्ये. :)

मस्त लेख. कुर्निसात जयंतराव. @धमु:....जन्नत-उल-फिरदौस नाहीतर फक्र-उल-अरब चा फाया कानाशी चढवावा, हुक्क्याची नळी फिरवत गप्पांचे फड रंगत जावेत..सोबतीला अरेबिक/तुर्की कॉफीचे प्याले येत जावेत.... ...आणि सोबतीला असाव्यात वळणावळणाने कंबर लचकवणार्‍या धुंद नर्तकी... j चित्रकारः Jean-Léon Gérôme (१८२४-१९०४, फ्रान्स) h b डावीकडील नर्तकी: माता हरी (१८७६-१९१७) उजवीकडील नर्तकी: सॅडी.

वाचतीये. त्या धम्याच्या हातून बरेचदा कॉफी कळफलकावर सांडली असे ऐकले आहे. ;)

कॉफी हा आवडता विषय. तसे आम्ही अट्टल चहाबाज. पण तो दर्जेदार कॉफीचा दरवळ आणि पहिल्या घोटातली चव चहाला नाही.. परंपरागत दुधाट, वेलदोडे घातलेली कॉफी क्वचित पिण्यात अनेक वर्षे गेली आणि अचानक कूर्गमध्ये थेट बिया वेचण्याचा योग आला. फुलांपासून पार्चमेंटपर्यंत सगळं एकदम पाहिलं.. लै भारी वाटलं. "बाबा बुडान" बद्दलही येऊ द्या.. इथे बंगळूरात मात्र कॉफीची आवड निर्माण झाली. कित्तिही लांबचा प्रवास करून आलो तरी बंगळूरु एअरपोर्टवर आधी हट्टी कापी होते मग घर..हापिसात चहा जवळपास बंद झाला होता हट्टी कापी मुळे. एमटीआर, ब्राम्हिन्स कॉफी बार, आनंद भवन.. अनेक जागा. झकास कॉफी. सीसीडी ला ती सर नाही. ती कॉफी पिण्याची नव्हे तर निवांत गप्पाटप्पा करण्याची जागा आहे. जयंत काकांची लेखमाला म्हणजे असेच जादूगाराच्या पोतडीतले नवनवीन कथा आणि लेख ... त्या दरवळाप्रमाणे वाट पाहतो.

गोष्ट आवडली पण तिच्याशी असलेला कॉफीचा संबंध(संदर्भ)मात्र कळला नाही.

बर्‍याच जणांना त्या गोष्टीचा आणि य लेखाचा काय संबंध आहे हे उमगले नाही ते सांगण्याचा प्रयत्न करतो. एवढ्या जुन्या काळात ज्या ठिकाणी कर्मठ मुस्लीम देशात ही कॉफीखाने चालायचे. त्यात काय प्रकारच्या विचारांची माणसे जमायची हे सांगण्यासाठी ती गोष्ट सांगितली आहे. कॉफीखान्यामधे सर्व बंधने झुगारुन मनातील गोष्टी बोलण्याचे स्वातंत्र्य घेता येत असे. आजही तुम्ही बघाना बॅरिस्टामधे किती मस्त गप्पा रंगतात किंवा सीसीडीमधे. तसे स्वातंत्र्य घरी मिळत नाही हे खरे.......

तिथे बर्‍याच गोष्टी सांगितल्या जात असतील. हीच गोष्ट का सांगितलीत.. कथाही बरेच बादरायण संबंध जोडल्यासारखी आहे.. विशेष घेण्यासारख काही नाही त्यात!! थोडक्यात नमनाला घड्यापेक्षा जास्त तेल गेलं तुमचं.. आणि नमनही नीट झालं नाही..

बरं ! मला नाही वाटत वाचकांचे किंवा माज़े फ़ार नुकसान झाले असेल.........होते असे कधी कधी.......पुढे जर नीट वाचले असतेत तर हा प्रश्न कदाचित पडला नसता.....

अहो .. कॉफीविषयी वाचायला उघडला धागा आणि एक शेवटचा परिच्छेद वगळता कॉफी कुठेच दिसेना.. अल्ला काय, होजा काय, जीझस काय .. भुसकाटच निघालं ना सगळं.. पाखडायला ठेवलय काय यात??

माझ्या कुठल्याही लेखमालिकेची सुरवात अशीच असते हे जे माझे लेख नियमीत वाचतात त्यांच्या लक्षात एव्हाना आले असेल. ही आता लेखमालिका चालू करतोय याची Announcement असते... आपण दुसरा भाग वाचला असतात तर कदाचित आपल्याला हा प्रश्न पडला नसता. आणि शेवटी भुस्कट बाजूला ठेवायचे काम आपण जरुर करु शकता......भुस्कटच ते पटकन बाजूला उडते........... :-) :-)

पट्टीचे चहाबाज असल्याने आमचा पास .. बाकी अनुभवावरून तुमची लेखमाला म्हणजे पर्वणीच !! यामुळे तरी कॉफी प्यायची आवड निर्माण होते का पाहू या