Welcome to misalpav.com
लेखक: अनंतसुत | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आय-टी इंजीनिअर
लोकांविषयी आम्हाला भारी करुणा वाटते जगातले सर्व दुक्ख ह्यांच्याच वाट्याला कसे काय आले, देवा यांचा उद्धार कर रे

तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन काम करतात, इंडस्ट्रीत दोनेक वर्ष काम केलं की यांचा पगार वीस पंचवीस हजारावर जातो. ऑफीसच्या नियमित वेळेव्यतिरिक्त ऑफीसला जायचं यायचं झालं तर अगदी दारापर्यंत कुलकॅब येते. वर्ष दोन वर्षांनी परदेश वारी होतेच होते. हे एखादया बिल्डरकडे घर पाहायला गेले तर बिल्डर यांच्यासाठी पायघडया घालतो. कुठल्याही मोठया रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ऑफीसचं ओळखपत्र दाखवलं की बिलात दहा टक्के सूट मिळते. नुसतं एक्सेल शीटवर काम केलं तरी भरभरुन सोडेक्सोचे पास मिळतात ते टेचात वापरता येतात. ईकडे रुपया घसरला की तिकडे ऑनसाईटला गेलेला बाब्या घरच्यांना अजून एक फ्लॅट बुक करायला सांगतो. एव्हढं सगळं मिळत असताना रडायचं म्हणजे जरा अतीच होतंय.

हो! हो! पण बाकी सगळे एकदा {(च)येथेही च महत्वाचा) काय ते शिकुन मार्गाला लागतात. आयटी इंजीनिअयर मात्र बिचारा जनमभर (मुद्दाम लिहीलयं) नुसता या वाटेने जाऊ की त्या वाटेने? या प्रश्नात अडकलेला असतो. जर वाट नाही निवडली तर दरी ठरलेली. स्टॅगनंट हा शब्द फार लवकर वाट्याला यायची शक्यता.

सुख खुपत ते हेच असावं बहुधा
ईकडे रुपया घसरला की तिकडे ऑनसाईटला गेलेला बाब्या घरच्यांना अजून एक फ्लॅट बुक करायला सांगतो.
खिक्क

तरी बरं हे मस्त गार एसीत बसुन काम करतात, इंडस्ट्रीत दोनेक वर्ष काम केलं की यांचा पगार वीस पंचवीस हजारावर जातो. ऑफीसच्या नियमित वेळेव्यतिरिक्त ऑफीसला जायचं यायचं झालं तर अगदी दारापर्यंत कुलकॅब येते. वर्ष दोन वर्षांनी परदेश वारी होतेच होते. हे एखादया बिल्डरकडे घर पाहायला गेले तर बिल्डर यांच्यासाठी पायघडया घालतो. कुठल्याही मोठया रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ऑफीसचं ओळखपत्र दाखवलं की बिलात दहा टक्के सूट मिळते. नुसतं एक्सेल शीटवर काम केलं तरी भरभरुन सोडेक्सोचे पास मिळतात ते टेचात वापरता येतात. ईकडे रुपया घसरला की तिकडे ऑनसाईटला गेलेला बाब्या घरच्यांना अजून एक फ्लॅट बुक करायला सांगतो. एव्हढं सगळं मिळत असताना रडायचं म्हणजे जरा अतीच होतंय.
सहमत. तिच्यायला आय.टी. वाल्यांसमोर आम्ही मेकॅनिकल वाले एसी मर्सिडिज मधून फिरणार्‍या बिझनेसमन समोर सेकंड क्लास चा पास काढून रेल्वेतून जाणारी माणसं. तरी मर्सिडिज वाल्यांनी रडगाणी गावीत म्हणजे आश्चर्य आहे. माणूस विघ्नसंतोषी असतो हेच खरं.

लै च भारी.. गाण्यांची चिर्फाड झक्कास जमलीये.. :))
‘बँन्डवाले बिचारे बजाते रहते है, और आय - टी इंजीनिअर साले बजते रहते है’
+१००

उन्मत्त आणि मदमस्त लोंकाच्या हातातील नोटा पाहुन ‘बँन्डवाले बिचारे बजाते रहते है, और आय - टी इंजीनिअर साले बजते रहते है’”
इथे आयटी वाल्यांची तुलना डान्सबार च्या बारबालांशी व्हायला हवी…नाय का

आयटीवाल्यांवर दौलतजादा पण कुणी करत नै इतका
अव पावनं तेंच्याव दौलतजादा करण्यासारकं तेंचेकडे असं काय असतंय तवा ;) आन पैक्याची तुलना काय करावी…होंडा एकॉर्ड वाली बारबाला पायली आन तवाच डोलं पानावलं…

हाहाहा, त्येबी खरंच म्हना. बारबाला नाचली की दौलतजादा कर्णार, हिकडं काय चांगला कोड ल्हिला/कोडातली २-३ लुपे वाचवली म्हणून काय डॉलर फेकणारेत थोडीच =))
होंडा एकॉर्ड वाली बारबाला पायली आन तवाच डोलं पानावलं…
अगायायायाया, माजंबी डोळं भरून वाहाय लागलं आक्षी पुरातल्या कृष्णेगत...

लेख लिहिण्याची पद्धत आवडली पण सगळे नोकरदार बँन्डवालेच असतात. आमच्या लाईन मध्ये तर आम्ही वरातीत नाचणारे घोडेच आहोत. फटाक्यांची भीती वाटते तरी नाचावेच लागते.

आमच्याकडं ऑनसाईटला सर्वसाधारण रिसोर्सला 'सोनु' अन स्पेशॅलिस्टला 'तरन्नुम' म्हणतात. आणि त्यांना प्रोजेक्टवर प्लेस करणार्‍यांना 'फटका' आता बोला. :)

र्वसाधारण रिसोर्सला 'सोनु' अन स्पेशॅलिस्टला 'तरन्नुम' म्हणतात. आणि त्यांना प्रोजेक्टवर प्लेस करणार्‍यांना 'फटका'
ए धमाल मुला.( ऊर्फ मनमिळाऊ मारुती) का उगाच कोडवर्ड्स सांगतोयेस. दिस्ट्रीब्यूटर्स आणि एक्झीब्यूटर्स चे गुपीत उघडू नकोस. ....................( क्लायन्टच्या तालावर नाच करणारा बारबालक विजुभाऊ)

आमच्याकडं ऑनसाईटला सर्वसाधारण रिसोर्सला 'सोनु' अन स्पेशॅलिस्टला 'तरन्नुम' म्हणतात. आणि त्यांना प्रोजेक्टवर प्लेस करणार्‍यांना 'फटका' फटका तो "आसमानमे लाखो तारे टॅवडॅव वालाच ना ? सरफरोश मधला......

श्रेय आमचं नाही! इकडं मुरलेल्या जुन्याजाणत्या सोनू लोकांनीच शिकवलं हे. :D

मी आयटीवाला नसलो तरी ब्यांडवाला झाल्याची भावना होतीच. आमच्या कुंपणीमध्येही सरसकट सर्वांना "सोनू" म्हणायचे. "जा सोनू, बैठ उसके साथ" या वास्तव शिणुमातल्या ड्य्वायलाकचा त्याला आधार होता. त्यावरचं विवेचन असं: "सोनू ही सोनू असते. एखादा संजय दत्त मिळाला तर ते सोनूचं नशीब. त्याजागी आर्य बब्बर किंवा नील नितीन मुकेश असता तरी सोनूला बैठण्या शिवाय पर्याय नाही."

सध्या तुमच्या आय टी मधे दोन प्रकारच्या कंपन्या दिसतात. एक मालक कंपनी दुसरी नोकर कंपनी. तुम्ही कुठल्या कंपनीत आहात यावर तुमचा अनुभव अवलंबून असतो. भारतातल्या सॉफ्टवेयर मजूरांनी आता आपण काही फंडू काम करत आहोत हे समजणे आणि इतरांसाठी तसा आभास निर्माण करणे बंद करावे. काही वर्षे फालतू काम केल्यावर त्या फालतू कामाचे तरी कुणी कौतुक करावे असे वाटणे साहजिक आहे. गर्दी कंपनीत काम करताना हाच अनुभव येणार आणि आय टी कशाला इतरही अनेक क्षेत्रातील कामगारांचा हा अनुभव असणार. गर्दी कंपनी - जिथे हेडकाऊंटला महत्त्व असते, आतल्या मेंदूला नव्हे. पी टी सी, गूगल, एच पी लॅब्स, मायक्रोसॉफ्ट, टेक्सास इंसट्रुमेंटस अशा ठिकाणी जाऊ शकलात तर हे प्रॉब्लेम येणार नाहीत. बा द वे फारच वैतागला असाल तर स्वतःचा बँड सुरू करा आणि नाचण्यासाठी लोक्स हायर करा.

भारतातल्या सॉफ्टवेयर मजूरांनी आता आपण काही फंडू काम करत आहोत हे समजणे आणि इतरांसाठी तसा आभास निर्माण करणे बंद करावे. काही वर्षे फालतू काम केल्यावर त्या फालतू कामाचे तरी कुणी कौतुक करावे असे वाटणे साहजिक आहे.
अगदी अगदी. हापिसात जाऊन काहीतरी कॉपी पेस्ट करत असतात किंवा कुठल्या तरी सर्वरचा ब्याकप घेत असतात. पण बाहे मात्र असा आव आणतात की नासाचे अवकाशयान हेच उडवतात. हे करत असलेल्या फडतूस कामाचे त्यांच्या हापिसात कुणाला कौतुक नसते. मग बाहेर आम्ही यव करतो आणि त्यव करतो सांगत सुटतात.

रडायची खरच गरज आहे का? साले पगार अश्या स्पीड ने वाढतात तुम्हा लोकांचे की आत्ता नोकरीला लागलेला बाब्या १ वर्शात फ्ल्याट बूक करतो. जेवढे पैसे घेता तितक काम तर करायलाच हव न राव.

ज्याचं जळतं ना त्यालाचं कळतं.. च्यायला, उगीच पैसे काढता सगळ्यांचे.. प्रोजेक्ट डिलिव्हरीला आले ना की दिलेल्या सगळ्या पैशांचं व्यवस्थित उट्टं काढतात कंपनी वाले.. २०-२२ तास सलग बसा डबड्या समोर, मग पैश्याचं गणित मांडा.. :|

काय राव.. आधी पैके मग एशी, अजून फारिन ट्रिप राहिलीये की.. आणि काय शिल्लक असेल तर ते बी होऊन जाउदे.. >:O

एवढ्यात पाहिलेली २ आश्चर्ये आपल्याबरोबर शेअर करीत आहे. १. एक पल्सारवाला अगदी हळू गाडी चालवीत होता. २. एक सॉफ्टवेयर इंजिनीयर डोके चालवीत होता.

२. एक सॉफ्टवेयर इंजिनीयर डोके चालवीत होता.
या विधानावरुन दोन गोष्टी कळतातः १. तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनीयर नाही. २. सॉफ्टवेअर इंजिनीयर नेमकं काय काम करतो याची तुम्हाला अजिबात कल्पना नाही.

यावरून २ गोष्टी कळतात. १. तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनीयर आहात. २. तुम्ही जगाचे २ भाग केले आहेत. आय. टी. वाले आणि इतर(काफर)

तुम्ही जगाचे २ भाग केले आहेत. आय. टी. वाले आणि इतर(काफर) हा निष्कर्ष कसा काय काढलात बुवा..?? तुमच्या माहितीसाठी - मी सॉफ्टवेअर इंजीनीयर नाही. ('IT'त काम करणारा) मोदक.

हा निष्कर्ष कसा काय काढलात बुवा..??
काही लोक "मला वाटतं म्हणून" निष्कर्ष काढतात. त्यासाठी कुठल्याही माहितीची किंवा तर्काची गरज नसते.

मोदक तुम्हाला नाही हो धन्याला प्रतिसाद दिला होता

धनाजीराव - आशू जोग यांनी मला दिलेल्या प्रतिसादाला तुम्ही का प्रतिसाद देताय..?? ऑफिसची बँडविड्थ फुकट जाळण्यापेक्षा काहीतरी काम करा. एक प्रश्न - आयटी कंपनीमध्ये (आरामात एसीमध्ये बसून!) ऑफीस इंटरनेटची बँडविड्थ अशी फुकट न घालवता वाचवली तर काही परकीय चलन वाचेल का..? वाचत असल्यास त्याचा रूपयाच्या कोसळण्यावर कितपत फरक पडेल..? आशू जोगसाहेब - धन्यवाद! :-)