Welcome to misalpav.com
लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तिची देवावर श्रद्धा आहे जी देवावरच्या विश्वासातून आली आहे आणि माझी तिच्या विश्वासावर श्रद्धा आहे जी माझ्या तिच्यावर असलेल्या प्रेमातून आली आहे. नेमकी भावना!!! :)

आमच्या घरीही वेगळे चित्र नाही. माझी पत्नी दर देवळातील देवाला 'मी आले आहे बरं का!' सांगत फिरते आणि मी दिवारच्या अमिताभसारखा देवळाच्या कट्यावर बसून राहतो. आजूबाजूच्या वृद्ध, विकलांग आणि असहाय्य भिकार्‍यांना आर्थिक मदत करण्यापुढे माझी ईश्वरसेवा कधी जात नाही. मी अश्रद्ध नाही पण श्रद्धेचा अतिरेक माझ्या डोक्यात शिरतो. असो. मी काही वाद घालत बसत नाही.

अगदी घरच चित्र डोळ्यासमोर उभे राहीले, मात्र तो हारफुलांचा अट्टाहास मात्र खरच कधी चालत नाही माझा, त्या ऐवजी एक लिटरभर दुध विकत घेउन समोरच्या पोराला दे, अस अगदी कडक आवाजात सुनवल जातं. हं. उगा दर मुद्द्याल कुठे गुद्दे म्हणुन गप बसायच झाल.

अगदी घरच चित्र डोळ्यासमोर उभे राहीले,
आमच्याकडे असले गोग्गोड दवणीय प्रसंग देवदर्शनाला जाताना घडत नाहीत. वर टॅक्सी करून देवदर्शनाला जाण्याची आणि कमळाची कळी असलेलं फुलांचं ताट घेण्याइतकी आपली औकात नाही. :(

खरतरं सुख- सुख असे बाहेर नसतेच .. ते असतं आत .. आपल्यात ! आपण ठरविले की आपण सु़खी होतो ! सलाम तुमच्या या सुखी रहाण्याच्या वृत्तीला ! असेच रहा ! Happyness is state of Mind,it has hardly anything to do with outside world ! ( असं कुणीसं म्ह्ट्लय .. आणि कुणी म्हट्ल नसेल तर मी म्हणतो .. आत्ता ! )

जे तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलेय ते मी मागे एका प्रतिसादात मराठीत म्हणालो होतो.. सुख दुख हि मनाची स्थिती असते असे काहीसे .. आधीही कोणीतरी म्हणाले असेलच.. कारण अर्थातच शतप्रतिशत खरे आहे ते :) प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.. ते वाचणेही एक सुखच असते.. :)

तिच्या वाढदिवसाला सकाळीसकाळी तिला म्हणतो, "आज तुला दोन ऑप्शन्स आहेत. सारसबागेतल्या गणपतीला जाऊ. मस्त निवांत ठिकाण आहे, नंतर नैवेद्यला ब्रेकफास्ट करू, मग पुढची पानं जशी उलगडतील तशी". "दुसरा ऑप्शन काये?" "तुझ्या आवडत्या दगडू हलवाईला जाऊ " खरं तर कुणी काय वाट्टेल ते केलं तरी त्या गर्दित जायला मन राजी नसतं. पण आमची ओळख होण्यापूर्वी तिथे जसराजजींच्या मैफिलित तिनं मैत्रिणीला, मला दुरुन दाखवलेलं असतं! आणि तिचं ते आराध्य दैवत असतं. "आपण दगडू हलवाईला जाऊ " तिथे पोहोचल्यावर निमूटपणे मी चप्पल स्टँडजवळ थांबतो, "तू ये जाऊन " "आत तर चला, मूर्ती सुरेख आहे" भाविकांच्या शिस्तबद्ध रांगेतनं वाट काढत मी सरळ सिक्युरिटी गार्डच्यामागे जाऊन उभा राहतो. "सर, रांगेतनं या, तुम्हाला दर्शन नाही का घ्यायचं?" "नाही, बायको आहे रांगेत, मी तिची वाट पाहतोय" समोर मूर्ती दिसते. अप्रतिम घडण, लखलखणारे दागिने, डोक्यावरचा दिमाखदार मुकुट, सभोवतालची देखणी महिरप, जीवंत वाटणारी शांत नजर आणि आजूबाजूचं भाविकांच्या श्रद्धेनं भारलेलं वातावरण. "साली काय दुनिया आहे, मस्त टाईमपास चालूये सगळ्यांचा" मी मनात म्हणतो. "प्रसाद घ्या" पुजार्‍याशी सुहास्यवदनानं बोलून, रांग पार करत ती आलेली असते. मी पेढा खातो. "काय मागितलंस आज?" "काही नाही. त्याला म्हटलं होतं, कमालीचा नास्तिक माणूस आहे, पण एक दिवस नक्की घेऊन येईन दर्शनाला, आज इच्छापूर्ण झाली" माझ्या डोळ्यात कधी नव्हे ते पाणी येतं. "सखे, तू अशीच सश्रद्ध राहा. मी काफिर असलो तरी हरकत नाही, तुझीही श्रद्धा अशीच राहू दे" साला, सुख, सुख म्हणजे अजून काय असतं? ___________________________ अभिषेक, मस्त झालीये पोस्ट. पण इतक्या दिलखुलास पोस्टवर नुसती आवडली लिहून उपयोग नव्हता म्हणून प्रतिसादाला वेळ लागला. या दुनियेत एक तरी माणूस इतका संवेदनाशिल आणि धागे जुळवून जगतो याचा आनंद आहे. जिओ!

माझ्या कथेतलं एक वाक्य तुला सांगावसं वाटतं :
माझे सगळे शब्द आणि अर्थ अभीव्यक्तीच्या सार्‍या सीमा ओलांडून तिच्यापर्यंत पोहोचतील असं वाटायला लागलं. ती काही बोलत नव्हती पण विचार ही करत नव्हती. फक्त सगळा विरोध, सगळा विसंवाद संपल्यासारखा वाटत होता. मला वाटायला लागलं बास! या क्षणी हे आयुष्य संपावं! स्त्री ही काय जादूगीरी आहे, एका स्त्रिशी सूर जुळणं सार्‍या अस्तित्वाशी एकरुपता जमण्यासारखं आहे.