Welcome to misalpav.com
लेखक: चतुरंग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

दोन उंट आहेत ही चांगली गोष्ट आहे. आता कार्लसन बहुदा हत्ती ए ६ असा आणेल. आनंदने अजूनही पांढर्‍या घोड्याला उचकवले नाहीये कारण पटाच्या मध्यावरचा त्याचा पांढरा उंट मस्त बसलाय!

क्वीन एक्स्चेंज करायचा चंग बांधून घुसलेत आत. वजीर एफ ४. आता पुढची खेळी वजीर डी६. उंट ई५ वर घेणे शक्य नाहीये कारण एच प्यादे हँगिंग आहे. आनंद हत्ती डी १ वर घेईल असे दिसते

हत्ती आगया डी ८ में! आता घोडा मागे जाणार. कारण आनंदसाठी वजीर पटावर असणे महत्त्वाचे आहे.

वजिरा वजीरी केली तर कार्ल भाउ जिंकण्यासाठी भरपूर प्रयत्न करेल..

तिथे प्यादे आहे ना? डी-६ म्हणायचे आहे का? तिथे आनंदचा हत्ती आणि वजीर दोघेही लक्ष ठेवून असतील. काळजी नसावी. :)

आधी राजाची बाजू सावरायला हवी नाहीतर "मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा!" अशातली गत व्हायची!!

आनंदचा वजीर अडकून पडलाय, कार्लचा वजीर मध्यावर आहे अन तो आनंदला त्याचा वजीर हलवायला प्रवृत्त करतोय. आनंद बचावात्मक खेळतोय अन कार्ल सुरेख आक्रमण रचतोय.

आनंदची पोझीशन जरा इन्फीरिअर आहे! आनंदला एच प्यादे थांबवायला हवे. तो बहुतेक एच ५ खेळेल. मी आधी म्हटल्याप्रमाणे आनंद एच ७ खेळला आता त्याचा उंट मोकळा झाला.

आता पांढर्‍या उंटांची मारामारी करणार बहुदा. उंट ई५ आणला तर पांढर्‍या वजिराला जी ४ मधेच जावे लागते. मग जर एच ५ असे प्यादे आले तर काळ्या वजिराची मारामारीची तयारी असेल का?

ड्रॉची शक्यता गेली. आता खरी मजा येणार! वजीर थेट मागे एच १ मधे गेला.

पांढरा वजीर कोपच्यात नेला. आनंदचे उंट त्याची चांगलीच कोंडी करू शकतात. कार्लसन काय विचार करतोय कळंना. कार्ल्याचा वजीर मागे गेला. आपल्या डोक्याची मंडई व्हायलीय ऊऊऊप्स. वजीर एच-१ मधे. बाप रे. दणादण हल्ले चालू केले आनंदने. अब आयेगा मजा.

मागे जाऊनही उंटाच्या मदतीने वजीर काही गडबड करू शक्तो कार्लसनचा. ये हुई ना बात.

त्या पांढऱ्या हत्तींना कशाला पोसतोयस बिन कामाचा, फिरव न जरा त्यांना त्या भरवश्यावरच तुझे चान्सेस होते मघाशी