Welcome to misalpav.com
लेखक: भावना कल्लोळ | प्रसिद्ध:
नमस्कार, आजच्या ठळक बातम्या ……… तर दिनांक २२ डिसेंबर २०१३ रोजी अतिचर्चित आणि दर वेळे प्रमाणे फाटे न फुटता खूप वेळेपासून गाजत असलेला अनाहिताचा पहिला वाहिला कट्टा हा ठाणे येथील स्वाद उपहारगृहामध्ये नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा का होईना पार पडला. परदेशी वास्तव्यास असलेल्या आमच्या काही मिपा अनाहिता अनाहुतपणे भारतवारी करण्यास आल्या होत्या आणि त्या आपसुकच या आमच्या कट्ट्या मध्ये गवसल्या. या कट्ट्याचे सर्वेसर्वा लिमाउजेट उर्फ माऊ यांनी अनाहितावर धागा काढला आणि बाकी सर्वं अनाहिताना पिंगवले. ज्या ज्या अनाहिता पिंगा घालत घालत कट्ट्यात सामील झाल्या होत्या त्याची नावे पुढील प्रमाणे : सानिकास्वप्नील, सविता ००१, पद्मश्री चित्रे, दुर्गावी, मीच मधुरा, भावनाकल्लोळ, सूर, अजया, लिमाउजेट, दिपालीकिरण. तसेच आपापल्या आयांचे प्रतिनिधित्व करत तीन छोट्या अनाहिता पण या कट्ट्यात सामील झाल्या होत्या. मीच मधुरा यास कडुन स्विनी तर सूर यास कडुन आर्या व फक्त ४ महिनाच्या अनन्या यांनी या कट्ट्यात सामील होत सर्वांत लहान मिपाकर होण्याचा मान मिळवला. तर यांच्या बाललीलांनी कट्ट्याला अधिकच समृद्ध केले. तर कट्ट्याचा वृतांत पुढील प्रमाणे. . काही मुंबईकर व परदेशी वास्तव्यास असणाऱ्या आमच्या काही अनाहीतानी संगनमत करून रविवारचा दिवस कट्ट्यासाठी आखला. त्याप्रमाणे मजल दरमजल करत सर्वं अनाहिता पैकी सगळ्यात पहिली हजेरी अजया यांनी वेळेआधी लावली. पण त्यांनी या वेळेचा सदउपयोग स्वतःला एक छान साडी घेऊन केला आणि लवकर आल्याचा स्वतःलाच स्वतः भुर्दंड पाडून घेतला.हा खर्च त्या उशिरा आलेल्या अनाहिताकडून करून घेणार असल्याचा मानस त्यांनी कट्ट्या दरम्यान बोलून दाखवला हि पण नंतर रंगलेल्या गप्पानी त्यांना याचा विसर पाडला. (हे बाकी आमच्या बायकाचे बाकी बरे असते, गप्पा मध्ये महत्वाचे विसरूनच जातो, असो शेवटी फायदा बाकी अनाहिताचा झाला). मग फोनाफोनी करून सगळ्या नक्की आल्या आहेत न यांची खात्री करून घेण्यात आली. सगळ्याजणी १०-१५ मिनिटांच्या अंतराने इच्छित जागी पोहचल्या. a मग स्वाद मधल्या बेसमेंट मध्ये ठाण मांडण्यात आले. अस्मादिकाना मात्र वसई विरार परिवहन यांच्या रविवारच्या सुस्त सेवेपोटी इच्छित जागी पोहचण्यास १ तासाचा विलंब लागला. पण स्वाद मध्ये जाताच कोणीही खाद्य म्हणुन आपला फडशा पडू नये उशिरा आल्यामुळे म्हणुन दरवाजा उघडून आत शिरताच "समुद्रामध्ये मोती शोधणे सोपे पण हे हॉटेल शोधणे महाकठीण असा शेरा हास्य वदनाने देत शामिल झाले". (काय करणार सगळ्या भुकेलेल्या वाघिणी होत्या न आणि उशिरा आलेली मीच एक म्हणुन हा खटाटोप). पण सगळ्यानी हसत हसत मला अनुमोदन दिले आणि स्थापन्न होताच समोर रुचकर घरगुती जेवणाची चव असलेली स्वादची मर्यादित थाळी ठेवली गेली. a (आमच्यापेक्षा हॉटेल मालकालाच खुप घाई होती म्हणुन आमच्या अन्नपुरवठ्याकडे जास्त लक्ष दिले जात होते, काय करणार बाहेर माणसे ताटकळत उभी होती आणि आम्ही मात्र निवांत पणे गप्पा टप्पा मारत जेवण करत होतो). . तर असे जास्त वैचारिक देवाणघेवाण न करता मस्त पैकी एकमेकांची शाळा घेत जेवण उरकले. जेवणातर गुलाबजाम आणि बासुंदी वर यथेच्छ ताव देत मेजवानी फस्त केली. . तिथे उभ्या असलेल्या (मालक कि मेनेजर?) कोण जाणे याच्या चेहऱ्यावर बायांनो आता खण आणि नारळ हवे तर घेऊन येतो पण या दहा जागा खाली करा ग असे काहीसे भाव पाहुन आम्ही बाहेर पडलो. पण हॉटेल बाहेर येताच एकमेकीचे भ्रमण ध्वनी क्रमांक घेत पुढचा कट्टा हा हॉटेल मध्ये न करता एका अनाहितेच्या घरी करण्याचे ठरवुन एक छानसे समुहचित्र टिपले गेले. मग प्रत्येकजणीने टाटा बाय बाय म्हणत या कट्ट्याची सांगता केली. . या बरोबरच कट्ट्याचा वृतांत संपला, पुन्हा भेटुया नवीन कट्ट्याचा वृतांता सोबत. तो पर्यंत याच कट्ट्याच्या वृतांतावर समाधान माना. नमस्कार. छायाचित्रकार सानिकास्वप्नील/ अजया सोबत वार्ताहर भावनाकल्लोळ ठाणे येथुन.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

गुलाबजाम आणि बासुंदी खाउन आजीबात जळजळ होते हे अजीबात खरे नाही. दोघेही आतिशय शीत मिष्टान्न आहेत. बाकी वृतांत फक्कड जमलाय.

वा..!!! खुसखुशित वृत्तांत. स्वादच्या आमच्या कट्ट्याची आठवण झाली आणि मोदकाने संपवलेल्या बासुंदीच्या वाट्यांची. =))

अरे वा तुमचा कट्टा कधी झाला म्हणायचा , मागे आम्ही , गवि , रामदास काका , स्पा , विमे , माउ, सूड आणि बाकी काही ह्याचा पावसाळ्यात स्वाद मध्ये एक जबरा कट्टा झाला होता.. आनाहिता कट्टा पण छान झाला अस दिसतोय , वृतांत आवडला आणि पु-क-शु :)

ज्जे बाSSत. हार्दिक अभिनंदन. उपहारगृहाच्या मालकाचे (किंवा मॅनेजरचे) टेन्शन घेऊ नये. दर अर्ध्या तासाने तो कांही सांगायला आला की एखाद दुसरा चहा मागवावा. बिचारा, मुकाट परत जातो. पुढील कट्ट्यास अनेकानेक शुभेच्छा..!

वृत्तांत आवडला ! जाता जाता :- माउ ताईचा गाल प्रत्येक नव्या फोटुत अजुनच फुगीर कसा दिसतो ? ते आज बासुंदी व गुलाबजाम पाहुन लक्षात आले. :P

आमच्या गप्पा बघून खरोखरच मालक टेन्शन्मध्ये होते बिच्चारे. एक आजोबा सविताला विचारत होते की हा कुठला ग्रुप आहे तुमचा? पण तिनी पत्ता लागू दिला नाही! ;) आमचं सोवळ्यातलं असतं ना सगळं.... =)) मिस कल्लोळ, सानिकानी आपल्यासाठी खाउ आणला होता हे सांगितलच नाहीस गं. :)

ह्या वाक्याने मात्र जळजळ झाली आहे.... जळवा तिच्यायला.... ओके...ठीक आहे.... पेठकर काका पुढच्या महिन्यात येत आहेत.... तेंव्हा ह्या वाक्याचे साग्रसंगीत उट्टे काढल्या जाईल.... (आपले काय जाते, (खरोखरच्या) हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवायला.)

एवढा आठवणीने आमच्या साठी खाऊ आणला आणि मी विसरले वृत्तांता मध्ये लिहण्यास, (जोहार मायबाप जोहार), काय करणार वृत्तांत लवकर लिहीण्याच्या घाईत. (जाऊ दे लहान बहिण समजून माफ कर हो सानिका ;) ) आणि हो माऊताई एवढ्या गोंधळात कळलेच नाही त्या आजोबांनी कधी विचारले ते. राहिले थाळी साधी असण्याचे तर मिपाबंधुनो जसा विचार तसा आहार…… आम्ही साऱ्याचजणी तश्या सोज्वळ, सात्विक म्हणून रविवार असूनही साधी थाळीच. ( घरी जाऊन बापुशी आणि नवरोबाने केलेले मस्त पैकी कोंबडी रस्सा आणि भात हाणला तेव्हा रविवार कुठे तरी सार्थकी लागला हे कोणास सांगणे न लागे). तश्या आम्ही खुपच साध्या बाई …. हो कि नाही ग गर्ल्स्स ….

मस्त वृत्तांत आणि फोटो! बा़की सोहळा एवढा मोठा, पण थाळी त्या मानाने साधी की हो... ( पळायचा रस्ता शोधलेला आहे.. :) ) जाता जाता.. :- या कधीतरी आमच्या पुण्याच्या दुर्वांकूर ला :))

कोण कुठल्या अनाहिता ते नावानीशी सांगा कि. एक माउतै सोडली तर (ते सुध्दा तीच्या गाल आणि बॉबकट मुळे) बाकि काय ओळखु येई ना.

काय बोलणार? आता तुम्ही काडी टाकलीच आहे, मी पण एक काडी टाकतो.... इ,ए. साक्षी आहेत. मुंबईकर कट्टा करायचे ठरवतात आणि ऐनवेळी कित्तीही संकटे आली तरी पार पाडतात.लोकेशन बदलले,वेळ बदलली, तरी मुंबईकर मागे हटत नाहीत.हे पुणेकरांचे मात्र काही खरे नसते. आता येतात सगळे पुणेकर अंगावर...

बस का मुविकाका..जेमतेम २/३ तासांत कट्टा ठरवून सुद्धा १० जण जमले होते आणि ते पण वर्किंग डे ला आणि ते पण ठिकाण आधी फिक्स नसताना. =)) एक्का काका साक्षी आहेतच. ;)

सहमत =)) अन असे कितीक कट्टे झालेत, अन होतही राहतील.

बा़की सोहळा एवढा मोठा, पण थाळी त्या मानाने साधी की हो... >>>>>>>>>>>> थाळी सुद्धा आम्हा अनहितासारखीच साधी, सरळ आहे. लय भारी गं अनहितानो.

लै जबरी लिवलंय! खरचच भन्नाट मज्जा आली. पहिल्यांदाच सगळ्या जणींना भेटत असूनही असा काही गप्पांचा फड जमला होता की बास. त्या हॉटेल मॅनेजर/ मालकाचा चेहरा आठवतोय अजुन. बिचारे दर वेळी यायचे आणि या काही एवढ्यात जात नाहीत याची खात्री पटून अधिकाधिक कष्टी व्हायचे. होतील नाहीतर काय! हॉटेलबाहेर ही रांग लागलेली आणि आम्ही उठायचं नाव घेत नव्हतो. बाकी जे आजोबा विचारत होते नं, की कुठला ग्रूप तुमचा? ते दोघे (आजोबा-आजी)खरच आमचं एकत्र येणं आणि दंगा करणं जाम एन्जॉय करत होते. एकदम नॉस्टॅल्जिक झाले होते बहुतेक. दोघं जाम गोड हसत होती आमच्याकडे बघून. सांगणार तरी काय त्यांना? पहिल्यांदा भेटलोय आज म्हणून???????????

दंगा आणि मजा मस्तच केलेली दिसतेय पोरींनो....अनाहीतावरपण आजी+आजोंबाबद्द्ल वाचुन एका चांगल्या कट्ट्याला येता आले नाही याची हळहळ वाटलीच.

खूप खूप चॉकोलेट्स आण्ली होती सानिकाने. जामच खूश सगळ्या जणी. आणि ती पॅकेट्स पाहिल्यावर छोट्या बाहुल्यांचे चेहरे तर केवळ सुंदर, अप्रतिम :)

हो तर सवे … माझा चेह्ऱ्यावरचा आनंद हि किती ओसांडून वाहत होता न, बादवे … आमच्याकडचे पाकीट संपवण्यातहि आलेले आहे. कोणी ते विचारू नये…. खिक .

स्टेशनवर आल्यावर एकमेकींना ओळखायचे कसे? याचे उत्तर माऊताईने दिले होते ,जिथे काही मुली अतिशय आनंदाने जोरजोरात गप्प मारताना दिसतील तो ग्रुप.हॉटेलमध्ये भेटल्यावर आम्ही तिचे उत्तर खर्या अर्थाने सार्थक केले.थाळी गप्पा मारता मारता कधी रिकामी झाली ते कळले नाही मग गोड खायचे टुम निघाली.ते बर्यापैकी उशिराने येउनही गप्पांची भूक काही भागेना,मग माऊताईच्या निमित्ताने चहा घ्यायचे पण चालले होते पण हॉटेलमालकांनी खरच खणानारळांनी ओटी भरुन ,हाताला धरुन बाहेर काढले असते म्हणुन आवरावे लागले पण हॉटेलबाहेर परत गप्पासत्र चालु!!

स्टेशनवर आल्यावर एकमेकींना ओळखायचे कसे? याचे उत्तर माऊताईने दिले होते ,जिथे काही मुली अतिशय आनंदाने जोरजोरात गप्प मारताना दिसतील तो ग्रुप.हॉटेलमध्ये भेटल्यावर आम्ही तिचे उत्तर खर्या अर्थाने सार्थक केले.थाळी गप्पा मारता मारता कधी रिकामी झाली ते कळले नाही मग गोड खायचे टुम निघाली.ते बर्यापैकी उशिराने येउनही गप्पांची भूक काही भागेना,मग माऊताईच्या निमित्ताने चहा घ्यायचे पण चालले होते पण हॉटेलमालकांनी खरच खणानारळांनी ओटी भरुन ,हाताला धरुन बाहेर काढले असते म्हणुन आवरावे लागले पण हॉटेलबाहेर परत गप्पासत्र चालु!!