Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मस्त लेखमाला... बरीच वाक्ये आवडली... "आंम्हा विद्यार्थ्यांमधे परस्पर चढाओढ कित्तीही असली,तरी ती चढाओढच होती.त्याचं कधिही द्वेषबुद्धीत किंवा मत्सरात रुपांतर झालेलं नव्हतं." "आमचे गुरुजि मात्र त्या ही बाबतीत वेगळे, कुणी नापास झाला तर ती चूक ते आपली मानीत.आणि त्या विद्यार्थ्यालाही , "हे बघं,नारज व्हायचं नाही...अरे,असं होतं कधिकधी. त्यात बावरून जाण्यासारखं काहिही नाही. आणि मी तुझी आता खास वेगळी तयारी करून घेइन... तुझी तिथल्या आधी हितेच एक आणखि पूर्वपरिक्षा घेइन..फक्त एकट्याची! म्हणजे मग गाडं नक्की आडतय तरी कशात? हे ही कळेल. काहि नाराज होऊ नको...जा पाठाला बस.. जा" असं खरंखुरं आश्वस्त करित असत." "ते नेहमी म्हणत असत, "अरे आत्मू... परिक्षा म्हणजे काय रे शेवटी? आपण जे काहि शिकलो,त्यात आपण किती तयार आहोत? हे जाणायचा आखाडाच ना तो! मग त्याला मेलं भ्यायचं कशाला? तयार असलो..तर सरकू पुढे.आणि नसलो..तर मागे यायलाही संधी मिळालीच कि पुन्हा!" साध्या भषेतलं सोप्पं तत्वज्ञान." ही मात्र खासच.

@या सिलॅबसातील सर्वोच्च परीक्षा अजूनही काशीलाच घेतल्या जातात का ओ?>> नाहि रे बाबा. सगळ्या परिक्षा सर्वत्र घेतल्या जातात. पण काशिची शाल-मिळवणं आजंही मानाचं समजलं जातं.

ओह अच्छा, धन्यवाद. तदुपरि या सर्व परीक्षांबद्दल थोडी थोडी माहिती येऊद्या. म्हणजे पयल्या वर्षीची अन शेवटची यांत कसा फरक, परीक्षा किती पद्धतीने घेतल्या जाते इ.इ. तेवढीच नवी माहिती.

गुरुजी अतिशय सुंदर ओळख करून देत आहात. बॅटॅनी विचारल्यानुसार परिक्षांमधला फरक पण येऊ द्या. काशीयात्रा आम्हालाही घडवा. तेवढेच पुण्य :biggrin:

ह्हा ह्हा ह्हा =)) अहो,प्रत्यक्ष पाहाण्याचा विषय आहे तो..मी इथे लिहुन काय सांगणार नुस्त? काहि परिक्षांमधे १ परिक्षक आणि दहा विद्यार्थी,तर काहि परिक्षांमधे दहा परिक्षक आणि एकच विद्यार्थी..., इतका सामना वेगवेगळ्या पातळी वरचा असतो. ते लिहुन सांगून समजावता येणारं प्रकरणच नाही.