Skip to main content

अनुभव

एक किस्सा

लेखक नचिकेत जवखेडकर यांनी शुक्रवार, 03/06/2022 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे. चूकभूल सांभाळून घ्या :) २०१० सालची गोष्ट आहे. मी जपान सरकारतर्फे शिष्यवृत्ती मिळून शिकायला आलो होतो. परदेशी विद्यार्थ्यांसाठी वेगळे वर्ग असायचे. त्या वर्गांमध्ये, परदेशीच पण जे पूर्णवेळ शिकत असतील(डिग्री प्रोग्रॅम) अशा विद्यार्थ्यांना पण परवानगी असायची. तेव्हा एका वर्गामध्ये माझ्याबरोबर एक चिनी विद्यार्थी होता, जो पूर्णवेळ शिकत होता. वर्गात जनरल हाय हॅलो व्हायचं पण मैत्री अशी नव्हती. त्याचं शिक्षण मार्चमध्ये संपलं होतं आणि त्याला दक्षिण जपानमध्ये नोकरी पण मिळाली होती असं सांगत होता.

व्यक्ति, प्रकृती आणि प्रवृत्ती – २

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 02/06/2022 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
व्यक्ति, प्रकृती आणि प्रवृत्ती – २ डिपार्टमेंट मध्ये भेटलेल्या विलक्षण व्यक्तींच्या यादी मध्ये जनमित्र ( मराठीत, ‘वायरमन’ ) जाधव मामांचे नाव वगळणे शक्यच नाही ! माझी त्यांच्याशी काही वर्षे आधी गाठ पडली असती तर खात्यातले माझे करियर नक्कीच आणखी ब्राइट झाले असते. पण जेव्हा मी त्यांची वरिष्ठ अधिकारी म्हणून आले तेव्हा त्यांची रिटायरमेंट साठी दोनच वर्षे राहिली होती. त्यातही दीड वर्षे मला त्यांच्या कडून (वरिष्ठ असूनही) खूप काही शिकायला मिळाले. आपल्या कामात तर जाधवमामा अचूक होतेच, शिवाय मनुष्य स्वभाव आणि व्यवहार ज्ञान यात ते अतिशय पारंगत होते.

परिक्रमा

लेखक कपिलमुनी यांनी बुधवार, 01/06/2022 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
नर्मदा परिक्रमेचा आजचा अकरावा दिवस, चालून चालून पाय भेंडाळून गेलेत.. सुरुवातीला एकत्र असलेले आपापल्या सोयीनुसार , वेगानुसार पांगले आहेत.. दोन दिवस निबीड जंगलातला रस्ता आहे . अवचित एखादा वाटसरू दिसला की रस्ता चुकला नाही याचे समाधान मिळते... संध्याकाळी दगडावर बसून नर्मदामैय्याचे विलोभनीय रूप बघत होतो तेव्हा डूबत्या सूर्यामागून एक उंच आकृती झपझप चालतं डोहाकडे आली ..धोतर , अंगरखा आणि डोईला मारवाड मुंडासे ! वाटसरू तहानलेला असावा.. येऊन गटागटा पाणी पिले , आमच्याकडे लक्ष नसावे बहुधा .. वाटसरू वस्त्रे काढून डोहात शिरला , मुंडासे काढले , केसांच्या दीर्घ जटा अस्ताव्यस्त पसरल्या..

एस.टी.एक आठवण!

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 23/05/2022 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
॥ एस.टी., एक आठवण..॥ 'माजलगाव पुरुषोत्तमपुरी, 'माजलगाव पुरुषोत्तमपुरी,गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ६वर लागली आहे.माजलगाव पुरुषोत्तमपुरी,गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक ६वर लागली आहे.माजलगाव पुरुषोत्तमपुरी.'   बसस्टॅन्डच्या मधोमध असलेल्या जाळीच्या खोकेवजा खोलीतल्या स्पिकरवरून,खाकी कपड्यातल्या कंट्रोलर नामे इसमाने केलेली घोषणा,ऐकली की तिथल्या सिमेंटच्या बाकांपैकी काही बाकांवर बसून कंटाळलेल्या,आणि इकडे तिकडे हिंडणा-या बाया,बाप्ये,तरणे,म्हातारे,अंगात चैतन्य आल्यासारखे,एकदम उठून आपापल्या पिशव्या,बॅगा,बोचकी घेवून,त्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने धावायला लागत.त्यात कुणाचा तरी नवरा,पोरगा,भाऊ,बाप,कुठेतरी रसवंतीत ,ह

चैतन्यदायी अनुभव

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 19/05/2022 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
चैतन्यदायी अनुभव ✪ ध्यान चर्चा, ध्यान सत्र, मुलांचं फन- लर्न आणि आकाश दर्शन अशी सत्रं सलग घेण्याचा अनुभव ✪ जालन्यातल्या चैतन्य योग केंद्राचं टीम वर्क ✪ ८७* नाबाद फिट अँड फाईन तरुणाला भेटून मिळालेली ऊर्जा ✪ को-या फळ्यावर काढलेला बिंदू बघणं, कोरा फळा बघणं आणि बघणारा बघणं- दृश्य, दर्शन आणि द्रष्टा ✪ ९९% मनासह तादात्म्य आणि १% ध्यान किंवा तटस्थता- अंधा-या खोलीत पेटवलेल्या काडीचा उजेड ✪ मुलांची ऊर्जा, मुलांना येणारी मजा आणि त्यांच्यामुळे आपल्याला मिळणारी ऊर्जा! ✪ बन्धी मुट्ठी खाक की, खुली तो लाख की! ✪ पावसामुळे चाँद छुपा बादल में, पण तरीही मुलांसाठी आया रे आया चंदा ✪ ससा व कासवाच्

प्रसन्नतेच्या लहरी!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 10/05/2022 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. आजपर्यंत अनेक वेळेस मुलांना आकाशातल्या गमती दाखवल्या होत्या. वेगवेगळे तारे, ग्रह आणि चंद्रावरचे खड्डे बघताना मुलांच्या चेह-यावर येणारा आनंद आणि त्यांना होणारं समाधान नेहमीच अतिशय ऊर्जा देऊन जातं. 'ऑ! अरे बापरे!' 'ओह माय गॉड' अशी एक एक दृश्य बघतानाची मुलांची (आणि वयाने जास्त असलेल्या मुलांचीही) प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. त्यासारखाच पण थोडा वेगळा असा सुखद अनुभव आज घेता आला. निमित्त होतं परभणीतल्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रामधल्या मुलांच्या सुट्टीतील शिबिरामध्ये घेतलेल्या ज्ञान रंजन अर्थात् fun and learn सत्राचं.

अनुभवातील व्यक्ति, प्रकृती आणि प्रवृत्ती -१

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 02/05/2022 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्य स्वभावाचे बरेच अजब नमुने निमसरकारी नोकरीत असताना पहायला आणि अनुभवायला मिळाले. भले, बुरे, खरे, ढोंगी, सरळ, वाकडे, वेडे, झपाटलेले ! काहीना काही आठवणी, ठसे मनात ठेवून गेलेले. त्यातल्या काहींची मनाने जपलेली नोंद इथे नोंदवण्याचा हा प्रयत्न . उमेदवारीच्या पहिल्या काही वर्षात क्षेत्रीय कामाचा अनुभव घेतला तेव्हा ग्राहकांशी थेट संबंध आलेला. त्यामुळे लोकसंपर्काच्या कळी माहिती झालेल्या. काही अधिकारी याबाबतीत वरचढ. तोंडावरची रेघही हलू न देता ग्राहकांना धादांत खोटी माहिती किंवा आश्वासने देऊन कसे रस्त्याला लावायचे हे यांच्याकडून शिकावे.

आणि मुंबईत धावले वाफेचे इंजिन...

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 16/04/2022 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील बोरीबंदर ते ठाणेदरम्यान आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली 16 एप्रिल 1853 रोजी. त्या ऐतिहासिक घटनेचे आता 170 वे वर्षे सुरू झाले आहे. यंदाच्या 170व्या वर्षाच्या निमित्ताने 20 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी भारतीय रेल्वेचे 150वे वर्ष सुरू झाले होते. त्या निमित्ताने 16 एप्रिल 2002 रोजी मुंबईत एका वेगळ्याच घटनेचे साक्षीदर होण्यासाठी लाखो मुंबईकरांनी बोरीबंदर ते ठाणेदरम्यानच्या लोहमार्गांच्या दुतर्फा, जिथे जागा मिळेल तिथे गर्दी केली होती. अगदी 16 एप्रिल 1853 ला केली होती तशीच. सगळेच जण ज्या दिवसाची वाट पाहत होते तो खास दिवस अखेर उजाडला होता.

मिपाकर होता होता .....

लेखक चौथा कोनाडा यांनी बुधवार, 13/04/2022 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
सात-आठ महिन्यांपुर्वीची गोष्ट, असाच फेसबुकवर चरत (पक्षी : ब्राउजिंग) होतो. अचानक एक चित्र दृष्टीस पडले. अतिशय साधे, काही मोजक्या रेषा. साधारणपणे सरळच. त्या रेखाटनातून दिसणारं सौंदर्य, साधणारा परिणाम, व्यक्त होणारा आशय मला अतिशय आवडला. अर्थात लाईक आणि कमेंट दिली. चित्रकाराचे नाव वाचले. श्रीनिवास कारखानीस. लक्षात राहील असे नाव. फेसबुक बघता बघता या नावाचा आणि चित्रांचा डोळे वेध घेऊ लागले. दिसले रेखाटन की त्याचा आस्वाद घेणे सुरू झाले. लाईक आणि कमेंट दिली जायचीच. मी त्यांच्या चित्रकलेचा चाहता होऊन गेलो. फेबु मेसेंजरवर त्यांच्याशी हॅलो हाय सुरू झाले.

स्मरण चांदणे५

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 28/03/2022 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण चांदणे ५.     आषाढ महिना सुरू झाला की पावसाची वाट पाहाणे सुरू होई.आषाढातच चातुर्मास सुरूहोई.आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चार महिन्यात, विशेषत:,बायकांचे वेगवेगळे उपवास,व्रतवैकल्ये सुरू होत.नित्याचे उपवास,वार असत ते वेगळेच.या काळातील ,धार्मिक महत्वाचे दिवस(तिथी)सांगण्यासाठी भटजी घरी येवून पंचांगानुसार तिथ्या,सण इ.ची माहिती सांगत.त्यांना नमस्कार करून,दक्षिणा,धान्य,आणि चहा/ दुध दिले जाई.