अनुभव
स्वप्नपूर्तीचा तो दिवस
दिल्लीला जाण्याची माझी ती चौथी वेळ होती. पण ही दिल्ली भेट सर्वात विशेष ठरणार होती. कारण त्यावेळी माझं अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येत होतं. त्या स्वप्नपूर्तीला यंदा 10 वर्षे पूर्ण झाली आहेत.
दिल्लीला जाण्यासाठी मी आणि माझा मित्र शशिकांत आम्ही पुण्याहून दुरंतो एक्सप्रेसनं निघालो. एकीकडे प्रवासाचा उत्साह होताच आणि दुसरीकडे दिल्लीला ज्या कारणासाठी निघालोय त्यामुळे तर उत्साह संचारलेला होता. दिल्लीला जाण्याचं त्यावेळचं निमित्त होतं प्रजासत्ताक दिनाचा सोहळा प्रत्यक्षात पाहण्याचं. प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण सोहळ्याला माझ्यासाठी वैयक्तिक दृष्टीने अतिशय महत्व आहे.
सध्या मी काय पाहतोय ? भाग ९
पुष्पा द राइज पार्ट 1... युट्युबवर वेगवेगळी गाणी शोधताना / पाहताना अचानक या चित्रपटातील नुकतेच अपलोड झालेले स्वामी स्वामी हे तेलगु भाषेतील गाणे पाहण्यात आले होते.
त्या नंतर या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यात आला. अल्लू अर्जुन ची मुख्य भुमिका असलेला हा चित्रपट पाहण्या सारखाच असे तो ट्रेलर पाहुन वाटले.
वेळणेश्वर राईड
माझा लेक (वय वर्षे 10) याने त्याच्या बाबांसह आमच्या घरापासून वेळणेश्वर पर्यंत सायकल राईड केली. दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्याने परत घरी आले. त्याने केलेले हे प्रवासाचे वर्णन.
वेळणेश्वर राईड
दिनांक १० जानेवारी २०२२ आम्ही वेळणेश्वरला सायकलने जायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही प्रॅक्टिस करायला सुरवात केली. आम्ही १५ तारखेला ठरवलं कि उद्या वेळणेश्वरला जाऊया. मग आम्ही अगोदर सायकल रिपेअर करून घेतल्या. आदल्या दिवशी रात्री दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवली. सकाळी ५:१५ ला उठलो व तयारी केली. आई आणि आजोबा गाडीने येणार होते व मी आणि बाबा सायकलने. आम्ही सकाळी ६:१५ ला निघालो.
लक्ष्मणपूर, एक पडाव.........४
https://www.misalpav.com/node/49710 लक्ष्मणपूर १
https://www.misalpav.com/node/49726/backlinks लक्ष्मणपूर २
https://www.misalpav.com/node/49748/backlinks लक्ष्मणपूर ३
लक्ष्मन टीला
ताजमहाल सारख्या काही नशीबवान सरकारी मर्जीतल्या तर काही वेरूळ,उनाकोटी सारख्या सशक्त,
सरकार
"कुटायस रे ल*ड्या? कार्पोरेशनला ये. 'संगम'ला बसू." सरकारांचा मेसेज.
आता तुम्ही म्हणाल की बरं मग?
तर मग वगैरे काही नाही. सरकार म्हणजे आमचे जुने हितसंबंधी. या शहरात उगवतात अधूनमधून आणि मग काढतात आमची आठवण. आकस्मिक येऊन चकित करण्याची त्यांची पद्धत आहे.
आपणही समजा अशा ऑफरला नाही म्हणत नाही.
अर्थात कामं वगैरे नाचत असतातच पुढ्यात. पण त्याचं काय एवढं..! आख्खं आयुष्य त्यासाठीच पडलेलं आहे..! आज नाही केली तर उद्या करता येतील. किंवा परवा करता येतील.
किंवा करू करू म्हणता येईल.
शिवाय थोडा बदलही पायजेच ना माणसाला..!
रोज रोज एकटेच कसे बसणार..!
बसणार म्हणजे काही अगदी शब्दश: बसणं असं नाही.
माझी शाळा, निसर्ग शाळा - भाग २
(याआधीचा भाग इथे लिहिला होता -- माझी शाळा, निसर्ग शाळा)
साधारण जुलै २०२१ मधे आम्हां माजी विद्यार्थ्यांनी खूप वर्षांनी ऑनलाईन एकत्र येऊन, प्रत्यक्ष भेट वगैरे खर्च टाळून, शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का यावर चर्चा सुरू केली आणि पहिल्या टप्प्यात गरजू विद्यार्थांसाठी अवांतर वाचनासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य यावर एकमत झालं.
एकत्र येऊन काम करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने असेल कदाचित, उपक्रमातील पहिला टप्पा थोडा उशिराने, पण व्यवस्थितपणे
साधारण जुलै २०२१ मधे आम्हां माजी विद्यार्थ्यांनी खूप वर्षांनी ऑनलाईन एकत्र येऊन, प्रत्यक्ष भेट वगैरे खर्च टाळून, शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल का यावर चर्चा सुरू केली आणि पहिल्या टप्प्यात गरजू विद्यार्थांसाठी अवांतर वाचनासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य यावर एकमत झालं.
एकत्र येऊन काम करण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने असेल कदाचित, उपक्रमातील पहिला टप्पा थोडा उशिराने, पण व्यवस्थितपणेधावपटू- शतशब्दकथा
पहाटेची मॅरेथॉन साठी जमलेली गर्दी.
बंदुकीचा इशारा झाला आणि त्याने सर्वांसह दुडकी चाल धरली. श्वासाचा आणि धावण्याचा मेळ बसल्यावर त्याने वेग वाढविला.
रस्त्याच्या दुतर्फा जमलेली गर्दी अचंबित होऊन त्याच्याकडे पाहत होती. पण त्याला सवय होती. शर्यतीत राबणारे स्वयंसेवक त्याला मदत द्यायला उत्सुक होते.
अर्धं अंतर कापल्यावर त्यानं वेग वाढविला. अजूनही आपल्यात ऊर्जा शिल्लक आहे हे पाहून जोरात धावू लागला. शेवटच्या टप्य्यात तर त्याने कमाल केली. उरले सुरले सगळे स्पर्धक मागे टाकले.
दुसऱ्या दिवशीचं वर्तमानपत्र त्याने अपेक्षेने उघडले. क्रिडाविभागात, धावत असतानाचा त्याचा पूर्ण फोटो छापून आला होता.
मिसळपाव