अनुभव
लक्ष्मणपूर, एक पडाव......२
https://www.misalpav.com/node/49710
लक्ष्मणपूर, एक पडाव
मीच लिहीलेला लेख आणी त्यावर मान्यवरांचे प्रतीसाद शांतपणे वाचताना वाटले की मी आपल्या सर्वांच्या बरौबर गप्पाच मारतोय. सर्वाचे धन्यवाद.
नोकरी मुळे सतत बदली नवे शहर नवे लोक तेव्हा कळाले की शहराचा इतिहास आणी भुगोल जाणून घेणे आवश्यक आसते. त्यामुळे शहराची प्रथम दर्शनी ओळख होते. शहरातील पारंपारिक खुणा (conventional signs ) जर लक्षात ठेवल्या तर त्या शहरा मधे सहज फिरता येते. सैन्यात "नकाशा वाचन (मँप रीडिंग) हा एक खुपच महत्वाचा विषय.
एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग 4 (600 किमी) 19 डिसेंबर 2021
तिघांनी तीन फोन वर गजर लावून ठेवले होते. 11 ला पोहोचून 12 वाजता साधारण आम्ही झोपलो. 2 वाजता गजराच्या आधीच जाग आली. आवरून, कपडे बदलून, परत सगळी तयारी करून निघालो. खाली पार्किंग मध्ये आलो तर आमच्या सोडून फक्त 3 अजून सायकल होत्या. बाकी सगळे जण आधीच गेले होते. आपल्याला उशीर झालाय की काय या जाणिवेने पोटात गोळा आला. त्यात फक्त 2 तासाच्या झोपेवर अजून 300 किमी अंतर कापायचं होतं. जाणवून जरा दडपण आलं. पण थोडाच वेळ. एकदा सायकलवर बसलो आणि सुसाट सुरू झालो.
पुन्हा एकदा तो मोठा पूल पार करून अंकलेश्वर वरून हायवे ला वळलो. साधारण तासभर झाला असेल चालवून एक मोठा फ्लायओव्हर आला.
एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची (600 किमी) दिवस पहिला 18 डिसेंबर 2021
400 ची BRM फारच उत्कृष्ट रित्या पार पडली होती. कोणालाही कोणताही त्रास झाला नाही. नाही म्हटलं तरी माझ्या पायाला मागच्या वेळी झालेली जखम सुखत चालली होती. पण जवळपास 24 तास पाय बुटात बंद असल्याने आणि घामाने जखम चिघळली थोडी. पायातला मोजा जखमेला थोडा चिकटला नि तो ओढून काढताना खपली निघाली. घरी येऊन परत डॉ कडे जाणं आलं.
आता 600 चे वेध लागले. 11 डिसेंबरला सुरू झालेली 400, 12 तारखेला संपली. 18 ला लगेच पुढची 600 लागलेली. एवढ्या लगेच पुढची करायची का? तर एकमताने हो अस उत्तर आलं. यासाठी 2 रूट डोळ्यासमोर होते. PCMC क्लब ची पुणे - सोलापूर - तुळजापूर नि परत पुणे असा एक ऑप्शन होता.
लक्ष्मणपूर, एक पडाव.....
"अन्नासाठी दाहीदिशा", या व्यंकटेश स्त्रोतातील श्लोका प्रमाणे जगदीशाने आम्हाला उचलले आणी जेथे भाग्योदय होणार होता (देवा घरचे ज्ञात कुणाला ) आशा गावी आणून सोडलं. तब्बल चौदाशे कि. मी. दूर, कोवळ्या वयातला मी, कधी आपली गल्ली सोडून दुसर्या गल्लीत खेळायला सुद्धा गेलो नव्हतो (मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही ) आसा स्वभाव होता.
गोविंदाग्रजांची ( राम गणेश गडकरी),
‘एखाद्याचे नशीब’ नावाच्या अर्थपूर्ण कविते मधल्या शेवटच्या ओळी सारखे आम्ही त्या मुळे "बुडत्याला काडीचा आधार" , म्हणून " आलिया भोगासी ".
एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग 3 (400 किमी)
एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग 3 (400 किमी)
300 ची BRM तर पूर्ण झाली, आता 400. लगेच 4 डिसेंबरला मुंबई क्लबची मुलुंड - चिखली - मुलुंड अशी BRM होती. दापोलीच्या खानविलकर आणि पालवणकर ने नाव दाखलही केलं. पण 300 च्या BRM ने माझी खूपच वाईट अवस्था केली होती. हात आणि बोट दुखत होती. करंगळी आणि अनामिका बधिर अवस्थेत होत्या. खांदे दुखत होते. मी जराही उत्सुक नव्हते.श्रीनिवास चा देखील 300 च्या वेळेस पाय दुखायला लागला होता.IT बँड दुखावला अस काहीसं कळलं. अशा वेळी आठवडा पण पूर्ण विश्रांती नसताना 400 ची रिस्क घ्यायची का? तर उत्तर नाही असाच आलं. आम्ही मनोज दादाला दापोलिकरांबरोबर जायला सांगत होतो.
चका-या
'माझ्या मामाची रंगीत गाडी हो|
तीला खिल्लार बैलाची जोडी हो||
अशी कविता शाळेतल्या पुस्तकात होती.आजोळ
शहरात असल्याने मामाच्या घरी बैल,गाडी वगैरे नव्हते. आमच्या कडे गावी बैलगाड्या होत्या.पण रंगीत नव्हत्या.
साध्या होत्या.बैल खिल्लार नव्हते.साधे,गावरान होते.
आमच्या घरी कुठल्याही वस्तूचे असणे,चैनीसाठी
वा षौकासाठी नाही तर त्याची उपयुक्तता किती या निकषावर असे.बैल खिल्लार हवे,गाडी रंगीत हवी
असा आग्रह नसे.काम होण्याशी मतलब.
शेतीकामात बैल आणि गाडी बहुपयोगी.
एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग २ {३००किमी }
३०० किमी करायचे ठरवले पण त्यासाठी रूट ठरेना. सावंतवाडी क्लब चा सावंतवाडी - राजापूर - सावंतवाडी असा रूट होता. तर नवी मुंबई कल्याण सायकलिस्ट या क्लब चा वाशी - महाड - वाशी असा रूट होता. सांगली आणि पुणे क्लब चे पण रूट चेक केले. शेवटी या दोन रूट पैकी कुठचा फायनल करायचा हे ठरत नव्हतं. खारेपाटण खूप दमवणारा होता त्यामुळे परत त्याच रूट वर जायला मन धजावत नव्हतं. पण तिकडचे रस्ते सगळे चकाचक होते. तर मुंबई गोवा हायवे रत्नागिरी पर्यंत प्रचंड खराब आहे याची माहिती होती. तरीही बरीच चौकशी केली.
एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग १ {२००किमी}
एक स्वप्नपूर्ती - SR होण्याची भाग १ {२००किमी}
SR अर्थात super randonneur. खरं तर हे स्वप्न श्रीनिवासच. जानेवारी २०२१ ला ६०० किमी ची BRM करून त्याने ते पूर्ण देखील केलं. आणि मग हा किडा त्याने माझ्या डोक्यात सोडला. मागच्याच वर्षी त्याच्याबरोबर २०० नि ३०० किमी BRM मी केल्या होत्या. अर्थात तेव्हा दोघांनी चालवायची Tandem सायकल वरून हा प्रवास आम्ही केला. नंतर औरंगाबाद ला ६०० किमी चा प्रयत्न केला पण अर्ध्यात ती स्पर्धा सोडून दिली आणि तो नादच सोडून दिला. पण असा ऐकेल तो श्रीनिवास कसला? पूर्ण पावसाळा जवळपास "खूप पाऊस आहे आज नको सायकलिंग "या नावाखाली काढला.
मिसळपाव