Skip to main content

अनुभव

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने...

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 14/12/2021 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक २८ ऑक्टोबरच्या सकाळी बुंगाछीना- अग्न्या परिसरामध्ये मस्त ट्रेक झाला. हे गाव अगदी डोंगराच्या मधोमध आहे! नुसतं बसावं आणि समोरचं खरंखुरं वॉलपेपर डोळ्यात साठवावं!

माणूस आणि पुस्तक

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 09/12/2021 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
माणसं पुस्तकांसारखी असतात. कितीही वेळा भेटा, जवळ ठेवा, परंतु एकदा त्यांच्याशी संवाद सुरू झाला की कुणाचं कोणतं नवं रुप उलगडेल हे नाही सांगता येत. पुस्तके अशीच तर असतात. एक पुस्तक दुसऱ्यांदा हातात घेणे ही तशी दुर्मिळ गोष्ट. पण ज्यांनी असं केलंय त्यांना हे भावेल की, कधी कधी आधी वाचलेलं पुस्तक 'ते' हे नव्हतंच की काय असं वाटावं इथपर्यंत त्या नवेपणाची प्रचिती जाऊन पोहोचते. उरलेल्यांनी माणसांच्या बाबतीत मात्र हे शंभर टक्के अनुभवलं असेल. अगदी जवळचं उदाहरण घेऊ- आई. तुमच्यापैकी किती जण 'मला माझी आई पूर्ण कळाली' असा छातीठोकपणे दावा करु शकतील? अगदी बोटावर मोजण्याइतके.

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक

लेखक मार्गी यांनी सोमवार, 06/12/2021 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती २७ ऑक्टोबर! रात्री खूप लवकर झोपल्यामुळे पहाटे लवकर जाग आली. भयंकर थंडी आहे! पण पहाटेचं वातावरण आणि पहाटेचं आकाशही बघण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे कुडकुडत बाहेर आलो! आकाशामध्ये जबरदस्त नजारे आहेत. अष्टमीचा चंद्र डोक्यावर असल्यामुळे तारे काहीसे कमी दिसत आहेत. काही वेळ दुर्बिणीतून आकाश दर्शन केलं.

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 05/12/2021 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१, आणि १५ वे विद्रोही साहित्य संमेलन, नाशिक, ४/५ डिसेंबर २०२१ मधील छायाचित्रे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक, ३/४/५ डिसेंबर २०२१ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक,  ३ डिसेंबर २०२१, म

पुण्यावरून अदृष्य कॅमेरा मँन सह....... -कसरत

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 03/12/2021 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यावरून अदृष्य कॅमेरा मँन सह....... सकाळचे पावणे आठ वाजतायत, सहा वाजल्यापासून वाट बघतोय, आता कुठे थोड थोड दिसू लागलय. मिलटरीतली सगळे कापडे ,ब्लँकेट कामाला येत आहेत. घरी सामसूम आहे, बाहेर गाड्यांचे हाँर्न वाजतायत पण दिसत नाहीत. एकदम "भौक्क", केल्या सारख्या पुढे अचानक दिसतायत. सोसायटीतले चौकीदार कोपऱ्या कोपर्‍यावर शेकोट्या पेटवून कधी एकदा दिवसपाळी वाला येतोय वाट बघतायत. भटकी कुत्री शेकोटी जवळ येवू घुसायचा प्रयत्न करतायत पणचौकीदार त्यानां हाकलतायत,, बिच्चारी पुन्हा आपली पाय पोटात घेत इमारतीच्या आडोशाला मुटकूळे करून पडतायतं .

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 02/12/2021 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना २६ ऑक्टोबरचा दिवस! अतिशय थकवणा-या प्रवासानंतर मस्त झोप झाली. अलार्म ऑफ केला असूनही लवकर जाग आली. पूर्ण उजाडलेलं नसताना खोलीच्या बाहेर आलो. अहा हा! समोर एका दृष्टीक्षेपामध्ये अक्षरश: हजारो झाडं आणि घनदाट हिरवा रंग! सत्गडवरून एका दृष्टीक्षेपामध्ये किमान तीन हजार देवदार झाडं सहज दिसत आहेत! आत्ता कुठे जाणीव होते आहे की आम्ही मध्यरात्री कुठे आलो आहोत. आणि ही जाणीवही होते आहे की, आम्ही किती नशीबवान आहोत. ह्या सगळ्या परिसराची व दृश्यांचा आनंद घेताना जाम हुडहुडी भरत होती.

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 30/11/2021 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना सर्वांना नमस्कार. नुकताच उत्तराखंडमध्ये कुमाऊँ परिसरामध्ये फिरण्याचा योग आला. हा योग असतो आणि तो योग असेल तरच फिरणं होतं. अन्यथा कितीही नियोजन करून फिरणं होत नाही. हिमालयामध्ये फिरण्याची ही दहावी वेळ होती. ह्यावेळी हवामान खूप सुंदर होतं, त्यामुळे दूर दूरचे बर्फ शिखर दिसत होते. अनेक ठिकाणी ट्रेकिंग करता आलं. आणि सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे दुर्गम अशा मानस सरोवर- कैलास पर्वत यात्रा मार्गावर गूंजी व काला पानी अशा अतिशय दुर्गम जागी‌ जाता आलं. गेल्या वर्षीच २०२० मध्ये इथे जीपचा रस्ता सुरू झाला आहे.

‘शेजाऱ्या’चे ओझरते दर्शन

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 29/11/2021 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या २५-३० वर्षांत आपल्यापैकी अनेक जणांच्या कुटुंबात वा नात्यात कोणी ना कोणी परदेशी गेलेले किंवा जाऊन आलेले आहे. पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय अशा अनेक हेतूंनी लोक परदेशात जातात. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या गाठीशी परदेश प्रवासाचे विविध अनुभव साठलेले असतात. जेव्हा विविध कारणांमुळे होणाऱ्या कौटुंबिक मेळाव्यांना लोक एकत्र जमतात तेव्हा हटकून परदेशातील अनुभवांची देवाणघेवाण होते. असाच एक मेळावा एकदा आमच्या घरी भरला होता. त्या समूहातील ६ जण विविध देशांमध्ये जाऊन आलेले होते. अमेरिका कॅनडापासून ते ऑस्ट्रेलिया जपानपर्यंत अनेक देशांच्या अनुभवांवर गप्पा चालू होत्या.

आठवणी ५ - पुणे -१

लेखक मनस्विता यांनी रविवार, 28/11/2021 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी १ - प्रस्तावना आठवणी २ - मु. पो. बारामती आठवणी ३ - आठवणींच्या शिंपल्यातले खेड आठवणी ४ - मु. पो. इस्लामपूर आईच्या आग्रहामुळे आम्हा भावंडांच्या शिक्षणाला स्थैर्य यावं ह्यासाठी, पुण्यात राहण्याचा निर्णय घेतला आणि आमचा बाडबिस्तरा कायमचा पुण्याला हलवला. त्यामुळे बाबा बदलीच्या गावी आणि आम्ही मुलं आईबरोबर पुण्यात अशी आमची व्यवस्था ठरली.