लेखकभाग्यश्रीयांनी बुधवार, 08/10/2008 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज मला इमेल आली, जी मला खूप इंटरेस्टींग वाटली म्हणून इथे देत आहे.. (मिपाच्या धोरणात बसतं का हे? बसत नसेल तर अवश्य काढू शकता.. )
ही सगळी बातमी इथे वाचता येईल..
लेखकअरुण वडुलेकरयांनी मंगळवार, 07/10/2008 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
बोरिबंदर यायला तीनच स्टेशनच राहिली, तसा, लिमयेचा आवाज कानावर येऊन आदळला, " लिखित्या ऊठ रे. डाऊनच्या लोंढ्यात मरायचंय का? च्यायला! लिखित्या, लेका झोप कशी रे लागते एवढ्या गर्दीत."
खरंच आज झोप अगदी अनावर झालेली होती. मुंबईतील महानगरपालिकेतील चांगली नौकरी आणि भरभक्कम पगार केवळ या दोनच दोन जमेच्या बाबी वगळता सध्याचे बाकी सारे जीवन जीवघेण्या धकाधकीचे होते. चांगल्या नौकरीचा प्रश्न मुंबईने सोडवला होता तरी निवासाचा प्रश्न खर्डी सारख्या दूरवरच्या गांवात येऊन सुटला होता. प्रवासातच रोज जाऊन येऊन किमान तीन तास जात होते. विश्रांतीही जेमतेमच होत होती. त्यातून वाचनाचे व्यसन लागलेले.
लेखकपद्मश्री चित्रेयांनी शुक्रवार, 03/10/2008 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण मला आता ,मुळी सुद्धा येत नाही
उगीच डोळे भरुन येतात, बाकी खरंच काही नाही..
फूल बघुन मला आता कुणी सुद्धा आठवत नाही
हळुच नजर वळवते मी, बाकी खरंच काही नाही....
चिम्ब पाउस आला की आपली भेट आठवत नाही
भिजणं मात्र टाळते मी ,बाकी खरंच काही नाही...
पहाट जेव्हा सरत असते ,तुझं स्वप्न पडत नाही
झोप मात्र निघुन जाते ,बाकी खरंच काही नाही...
एकटं एकटं वाटतं पण ,तू मुळीच आठवत नाहिस
विसरलेच नाही तुला मी ,बाकी खरंच काही नाही...
लेखकस्वप्ना हसमनीसयांनी बुधवार, 01/10/2008 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
मलेशियासारख्या मुस्लिम राष्ट्रात "हरी राया" हा सण आपल्याकडील दिवाळीसारखा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा केला जातो.
ह्या सणापूर्वी एक महिना अगोदर "रमाधान"महिना सुरु होतो.महिनाभर येथील लोक सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी काहीही खात पीत नाहीत.
त्यामुळे दिवसभर शांतता पण संध्याकाळपासून जागोजागी खाण्यापिण्याची तंबूवजा हॉटेल्स माणसांनी खचाखच भरुन वाहत असतात.
रमाधानच्या काळात सर्वत्र 'प्रमोसी'(सेल) चालू असतात.लोक भेटवस्तू खरेदी करतात.सकाळ संध्याकाळ प्रार्थना केल्या जातात.
कामानिमित्त शहरामध्ये वास्तव्य असलेले लोक,हरी रायाच्या
लेखकप्राजुयांनी बुधवार, 01/10/2008 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी अलवार जाग आली.. उठून बाहेर आले. सहज पॅटीओचं दार उघडलं..समोर पसरलेली हिरवळ डोळ्यात साठवत तशीच बसून राहिले त्या खुर्चीवर..
४ दिवसापूर्वीच तो येऊन गवत छाटून गेला होता आणि आज परत.. एकेक पातं जणू तलवार.. !!!!:)
पहाटेनं जाताना बहाणा केला धुक्याचा आणि दवाचं वाण देऊन ती परत निघाली होती..प्रत्येक पातं चांदीच्या कोंदणामध्ये मोती ल्यायला होतं..आणि एकमेकाला विचारत होतं "कोण जास्ती सुंदर आहे रे??"
अचानक एखादी वार्याची कोवळी झुळूक हळूच येऊन एका गवताच्या टोकदार पात्याच्या कानात फुंकर घालून गेली.. ते पातं आळस देत उठलं आणि तो चांदी मोत्याचा साज उतरवत...
लेखकलिखाळयांनी मंगळवार, 30/09/2008 02:32 या दिवशी प्रकाशित केले.
भेसूर रात्र (आणि आस्वाद)
काल अचानक मी
बसलो उठून रात्री
लक्षात आले मजला
अमावस्या ती सर्वपित्री
कुठलेच नव्हते आवाज
कुठलाच रव नाही
थरथरत्या फांद्या अन्
झाडाला झोप नाही
पिंपळावरील मुंजा
हसतो भेसूर तेव्हा
सळसळत्या पानांचा
उच्चार अस्फुट होई
भुंकती मध्येच तेव्हा
रस्त्यावरील कुत्री
ऐकण्यासाठी त्यांना
कानांची लक्तरे उरली ...
१. वरील कविता अक्षरगणवृत्तात आहे की मात्रावृत्तात की मुक्तछंदात यावर प्रकाश टाकावा ही विनंती.
२. कवितेचा नक्की आशय काय असे कुणी विचारल्यास आम्ही पानभर लिहायला तयार आहोत.
३. या कवितेत लपलेला सामाजिक आशय सापडला का?
लेखकरामदासयांनी सोमवार, 29/09/2008 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
दोन आठवड्यापूर्वी सकाळी हिंदुस्थान टाईम्सची कॅफे पुरवणी चाळत असताना जहांगीर आर्ट गॅलरीतल्या एका चित्र प्रदर्शनाचा फोटो पाहीला.
फोटो पाहिल्यावर मी मंत्रमुग्ध झालो.पाच दहा मिनीटं माझ्या डोळ्यासमोर रंगपट उलगडत गेला.
तपशील वाचल्यावर कळलं की ही चित्रं प्रदर्शनाचं नाव सौरंगी आहे आणि कलाकाराचं नाव आहे शंकर देवरुखे.
त्या चित्राची मोहीनी एव्हढी जबरदस्त होती की त्या दिवशीचे बाकी सर्व कार्यक्रम रद्द करून मी जहांगीर आर्ट गॅलरीकडे पळत सुटलो.
मनात अनेक शंका होत्या.
आर्टीस्ट भेटेल का?
आपण जर दाद दिली तर ऍकनॉलेज करेल का?
जहांगीरच्या प्रदर्शनाची एक खासीयत असते. आर्टीस्ट फार व्यस्त असतो.
लेखकजयवीयांनी सोमवार, 29/09/2008 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
कालच झी टिव्ही वर "एवढंसं आभाळ" हा सिनेमा बघितला. दिग्दर्शकानं फार सुरेख हाताळलाय हा नाजूक विषय. प्रतिक्षा लोणकर, आनंद शिंदे आणि ऋत्विक नाडकर्णी ह्यांच्या नैसर्गिक अभिनयाने अधिकच वास्तविक सुद्धा वाटतो.
आई वडिलांचा घटस्फोट झालाय म्हणजे नक्की काय झालंय हे सुद्धा न कळण्याइतका भाबडा मुलगा....जेव्हा ते सगळं आपल्या कुवतीप्रमाणे समजून घ्यायचा प्रयत्न करतो... तेव्हा त्याची होणारी चिडचिड, सोबत आई-वडिलांची अगतिकता....... आणि मग अचानक त्याला मिळालेला मार्ग... असं काहिसं कथानक.
प्रत्येक छोट्या मुलाचं आभाळ त्याच्या आई-वडिलांच्या आभाळातच असतं.....आणि तो तेच आभाळ आपलं समजत असतो.
लेखकविसोबा खेचरयांनी सोमवार, 29/09/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजूच्या फर्माईशीवरून हा लेख लिहीत आहे...
धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना
वार्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना...
उत्तरायण चित्रपटातलं एक अप्रतीम गाणं!
'धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना..'
या पहिल्या ओळीत शुद्ध गंधाराचा व शुद्ध रिखभाचा सुंदर संवाद आहे. 'धुंद होते शब्द सारे' तल्या शुद्ध गंधाराला 'भावना' या शब्दातून शुद्ध रिखभाने फार सुरेख होकार भरला आहे. त्यामुळे गाण्याची ही पहिली ओळच फार छान वाटते, फ्रेश वाटते..
वार्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांब ना..
क्या बात है..
लेखकप्राजुयांनी सोमवार, 29/09/2008 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज हे असं काय झालंय?? काल पर्यंत तर सगळं ठिक होतं. आज अचानक हे असं?? काहीतरी नक्की झालयं. मी ही अशी .. अशी कधी होते?? आणि माझं पिल्लू... माझा नवरा?? हे असे.. असे कसे झाले?? कुणी केलं हे असं?? हे स्वप्न तर नाही ना?? काल पर्यंत हे असं नव्हतं. आज अचानक सगळंच वेगळं दिसतं दिसतं आहे. का? नक्की कोण बदललं आहे?? मी, लेक की नवरा?? की सगळेच.
अरे हे काय?? माझा चेहरा?? हा असा?? आता मला सगळे काय म्हणतील?? मी अशी नव्हते. अशी कशी झाले? सुंदर नसले तरी दिसायला वाईट नव्हते. आणि आज मी अशी काय दिसते आहे?? एखाद्या जोकरसारखी?? माझे केस? माझे इतके सुंदर सळसळीत केस.. असे काय झाले आहेत?