ये कौन चित्रकार है ? ... अर्थातच किमयागार निसर्ग
विविध रंगात उमललेल्या या फुलांकडे पाहून कॅमेरा हातात नाही घेतला तरच नवल !
Dutch Iris च्या निरनिराळ्या उपजातींची ही फुले वर्षातून जेमतेम २ आठवड्यांसाठी हा असा आपला पिसारा फुलवतात. या फुलाच्या पाकळ्या अतिशय तरल व मुलायम अशा असतात.
मिसळपाव
उदयपूरच्या 'सहेलीयोंकी बाडी' या उद्यानातुन बाहेर पडत असता अचानक भिंतीच्या वरुन तुरुतुरु पळणारी ही छोटी खारूताई दिसली. सुदैवाने तिकडे कुणाचे लक्ष न गेल्याने तिकडे गजबज नव्हती, खारूताई मस्त बागडत होती. मी दबक्या पावलांनी भिंतीच्या जवळ गेलो आणि पुढे पळणारी खारूताई अचानक मागे वळली. क्षणभर ते गोल डोळे लुकलुकले आणि कान उभे राहीले. तिला काय वाटले कुणास ठाऊक पण ती न पळता अगदी स्तब्ध झाली. मी कॅमेरा सरसावुन चौकट साधली, खार पळत नाही म्हणताना अलगद झाडाच्या पारावर चढलो.
मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालिम