Skip to main content

प्रकटन

हे बंध रेशमाचे

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 09/04/2012 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी चिवचिवत येणार्‍या चिमण्या हा माझ्या आयुष्याचा एक भागच झाला आहे. सकाळी बाहेरच्या खोलीचे काचेचे दरवाजे सरकावायला जरा उशीर झाला तर बाहेर आवाज सुरू झालेला असतो. दारं उघडायची खोटी. चिवचिवाटाने जणु ’सुप्रभात’ करत चिमण्या आंत शिरतात. छज्जावर तांदुळ टाकले की प्रथम आपल्या थव्यातील इतर चिमण्यांना साद घालणार आणि मग एकेक दाणा टिपायला सुरुवात. एकिकडे चिवचिवाट सुरुच असतो. अनेक वर्षे हे नियमितपणे होत असल्याने आता सरावाने मला साधारण तीन प्रकारचे बोल लक्षात येउ लागले आहेत.

ग्रेस

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 08/04/2012 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
मी महाकवी दु:खाचा प्राचीन नदीपरि खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल स्वत:च्या संपूर्ण मालकीची आणि केवळ स्वत:ची अशी अत्यंत सुंदर भाषा, लयकारीचा जीवघेणा नखरा आणि प्रतिमांची गूढ आणि नितांत रम्य मांडणी म्हणजे ग्रेस. ग्रेसनी कवितेला दिलेल्या योगदानाप्रती अत्यंत हार्दिक कृतज्ञता व्यक्त करून; सृजनाची प्रक्रिया, सृजनातली दुर्बोधता आणि ग्रेसच्या कवितेतून आपण काय घेऊ शकतो हे विशद करणारा हा लेख सादर करतो. ______________________________ सृजनाची संपूर्ण प्रक्रिया अशीये: हिज इनिशीयल चॉइस ऍट द बिगिनींग ऑफ अ वर्क ऑफ आर्ट इज थिऑरिटिकली कंप्लीटली ओपन.

सॅम पित्रोडा नवे राष्ट्रपती?

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 08/04/2012 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
फोन ही हल्ली अन्न, वस्त्र, निवारा आणि विज यानंतरची पाचवी मुलभुत गरज बनली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुरध्वनी जर कुठे उपलब्ध असेल, तर तो भारतात असं म्हणतात. अवघ्या काही वर्षांपुर्वी मात्र हे असं मुळीच नव्हतं. आपल्यापैकी अनेकांना ट्रंक कॉल लावून तासनतास वाट बघत बसण्याचे दिवस चांगलेच आठवत असतील. ट्रींग ट्रींग करणारा काळा फोनही अनेकांच्या अगदी स्पष्ट स्मरणात असेल. तारेपासुन ते ब्रॉडबॅण्डपर्यंत दुरसंचार क्षेत्रात अगदी तासातासागणीक होणा-या या प्रगतीला सत्यनारायण गंगाराम पांचाल नावाचा एक माणुस जबाबदार आहे, असं सांगीतलं तर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही.

निजेला लॅपटॉप

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 08/04/2012 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
६ मार्च २०१२, सकाळी आठच्या सुमारास आम्ही कल्याणला, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसमध्ये, एस-४ डब्यात आपल्या आरक्षित बैठकांवर स्थानापन्न झालो. गाडी सुटली. कामाचा दिवस आणि उलटी दिशा, ह्यामुळे गाडीला अजिबातच गर्दी नव्हती. कशाला उगाच आरक्षणाचा खर्च केला, त्यासाठी उगाचच जिवाचा आटापिटा केला असे वाटायला लागले. नेहमी शनिवार-रविवार-सुट्टीचे पुण्याला जाणारे आम्ही.

डॉ. संजय ओक

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 07/04/2012 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज ७ एप्रिल २०१२. जागतिक आरोग्यदिन. ह्या दिवशी आयुर्विज्ञान आणि सार्वजनिक आरोग्यनिगा ह्यांबाबतच्या आपल्या धोरणांची चर्चा होणे क्रमप्राप्तच आहे. आपली अशी धोरणे कोण निश्चित करते? कोण राबवते? ह्याबाबत आपली माहिती कायमच कमी असते. धोरणे निर्धारित करणारे अपात्र आहेत की राबवणारे, त्यांचे प्रभाव आपल्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच कोण स्वाहा करत आहेत, ह्याविषयी आपण सावध राहणे गरजेचे आहे. आपल्यांत वाखाणण्यासारखे लोक कोण आहेत ह्याचा सगळ्यांनीच शोध घ्यायला हवा.

असीर

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 06/04/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
असीर करके हमें क्यों रिहा किया सैयाद, वो हमसफीर भी छूटे, वो बाग भी न मिला। -'जलाल' लखनवी एकटेपणाचे दु:ख अफाट असते आणि ते ओझे खांद्यावर घेउन आयुष्यभर वणवण भटकण्याची शिक्षा मृत्युपेक्षाही भयानक. लखनवी च्या शायरीमधला पक्षी म्हणुनच पारध्याला (सैयाद) म्हणतो आहे " बाबा रे कधी काळी मला कैद (असीर) केले होतेस ते होतेस पण आता असे एकट्याला सोडुन का देतो आहेस? जिथुन कैद केले होतेस ती बाग तर आता कोसो दूर आहे आणि ज्यांच्यासाठी जगायचे ते कोणी आसपास उरलेले नाही.

उभ्या उभ्या विनोद.

लेखक रेवती यांनी गुरुवार, 05/04/2012 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला आपला मिपाकर मित्र संदीप चित्रेची इमेल आली. त्यात तो आणि त्याचे मित्रमंडळ शिकागो महाराष्ट्र मंडळासाठी 'उभ्या उभ्या विनोद' (उउवि) हा कार्यक्रम सादर करणार असल्याबद्दल लिहिले होते. निमित्त होते गुढी पाडव्याचे. ३१ मार्चच्या कार्यक्रमाला जाण्याचे नक्की करून आम्ही ऑनलाईन नावनोंदणी केली. ते ठिकाण आमच्या गावापासून एक तासाच्या अंतरावर वॉरनव्हिल येथे होते. संदीपचा कार्यक्रम बघायला मिळणार होता, शिवाय त्याला व्य. नि. करून आमच्याबरोबर घरी येण्याचे आमंत्रण दिले.

हिताची निगा किती करावी?

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 04/04/2012 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
. हा पर्जन्य वृक्षाच्या कटघराचा, १ एप्रिल २०१२ रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास काढलेला, आजदे गावातील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी मार्गावरील फोटो आहे. . हा रस्ता कदाचित डोंबिवलीतील सर्वात सरळ, सर्वात लांब व रुंद असलेला आणि दोन्ही बाजुंनी सुव्यवस्थित वृक्षारोपण केलेला सुंदर रस्ता आहे. आजदे ग्राम-पंचायतीने रस्त्याकाठच्या वृक्षांची उत्तम काळजी घेतलेली दिसून येते.

अष्टभूजा...की....अष्टावधानी की....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 03/04/2012 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक वर्ष झाले आणि आम्हाला घरी जायची ओढ लागली..कंपनीत रीतसर अर्ज केला आणि तिकीटाची वाट बघत बसलो... घरी तशी कल्पना दिली आणि घात झाला.. दुसऱ्या दिवसापासून बायकोने सामानाची यादी द्यायला सुरुवात केली...ह्या वेळी सुका-मेव्या शिवाय इतरही यादी खूप होती...मी पण खूपच चिडलो आणि बायकोसाठी काहीच खरेदी करायची नाही असे ठरवले... एक दिवस रजेचा अर्ज मंजूर झाला आणि मी विनंती केल्याप्रमाणे दुबई थांबा असलेले तिकीट पण मिळाले... चला आता पूर्ण १ महिना फक्त आराम...