Skip to main content

प्रकटन

रस्ता

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 02/03/2012 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ता जन्मापासून खातो आहे , आजवरी खस्ता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता कधी देखणा.. प्रशस्त होता, सांगते हो कोणी दोन कडेला उभारली ही टप-यांची लेणी ऐश्वर्याच्या गालाहूनी मऊ म्हणे होता असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता टप-यांपुढे उभी राहते, रिक्षांची सेना बसथांब्यावर कुत्रे बसते, उतारूंची दैना उरली आणिक, जागा म्हणूनी, पथा-याही आल्या सोय झाली, गं भाजीची, बायका म्हणाल्या शिस्त बिस्त, कधी इथे, कुणी पाळीत होता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता उरल्या सुरल्या..

अमृतानुभव

लेखक अन्या दातार यांनी गुरुवार, 01/03/2012 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
(पूर्वप्रकाशित) स्प्रिंग फेस्टचा पहिला दिवस. सकाळपासूनच विविध वर्कशॉप्सची रेलचेल होती. सकाळी काही कुठे गेलो नव्हतो; पण संध्याकाळी मात्र "अनुभव"(फ्युजन संगीत मैफल) ला जायचेच असे ठरवले होते. दुपारी कॅमेरा घेऊनच बाहेर पडलो होतो. कॉन्सर्टला पंडित विश्वमोहन भट येणार असल्याने त्याला माझ्या लेखी विशेष महत्त्व होते. संध्याकाळी ५ वाजता असणारी कॉन्सर्ट ६ वाजता चालू झाली. प्रचंड मोठ्ठी रांग बघून मला आत जायला मिळेल की नाही याची चिंता लागली होती. रांगेतच एक मित्र गाठ पडल्याने रांगेत मध्येच घुसणे शक्य झाले.

मला ईश्वर भेटला ....!

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 28/02/2012 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला ईश्वर भेटला ! कोपऱ्यावरचा बनिया नव्हे हो..! खराखुरा ईश्वर ! कसा ते ऐकायचंय ? अगदी अलीकडची आठवण म्हटली तर गेल्या आठवड्यातली गोष्ट. कामवाल्या सरूच्या ३ वर्षाच्या नातवाला बाळदमा आहे. ‘रातसारी खोकतोय हो पोर ताई !’ सरू म्हणत होती ‘औशीदबी लागू पडना.’ घरात एक सितोपलादी चुर्णाची बाटली होती. तिला दिली अन सकाळ संध्याकाळ पाव चमचा गरम पाण्यातून द्यायला सांगितलं. ४ दिवसांनी हसऱ्या चेहऱ्याने सरू सांगत आली ‘ताई, खोकला पार बंद झाला वो नातवाचा ! लई चांगलं औशीद दिलासा बगा .’ तेव्हा तिच्या हसऱ्या डोळ्यात मला ईश्वर भेटला ....! विनू माझ्या मुलाचा शाळूसोबती मित्र. चौथीनंतर शाळा बदललेल्या पण मैत्री कायम.

(कॉमन मॅन यांनी पुन्हा धागा काढला)

लेखक अन्या दातार यांनी मंगळवार, 28/02/2012 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरचे तथाकथित वकील सदस्य कॉमन मॅन यांनी आजच पुन्हा एकदा कथ्याकुट सदरात धागा काढून त्यांची मते मांडली आहेत दोन वाक्यात आपले मत व्यक्त करण्यासाठी नमनालाच घडाभर तेलाची उधळपट्टी केली आहे कॉमन मॅनच्या हाताशी असलेला जिलेबीचा सोऱ्या, इतर सदस्यांच्या प्रतिक्रियांचा ओघ आणि आपणच इथले कायद्याचे जाणकार असून, प्रत्येक धाग्यात कलमांचा संदर्भ लावलाच पाहिजे हा त्यांचा आग्रह आता बळावलेला दिसतो असेच म्हणावे लागेल कॉमन मॅन यांनी पाडलेल्या जिलेब्यांच्या विषयांवरून जयंत कुलकर्णी यांनी त्यांच्या पोशाखाला चालेंज करायचे ठरवलेले दिसते.

मावळतीचा सूर्य

लेखक रेशा यांनी सोमवार, 27/02/2012 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ५ ची वेळ ... अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते "सूर्यबिंब" मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ...

मना घडवी संस्कार !

लेखक यशोधन वर्तक यांनी सोमवार, 27/02/2012 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कार हा फार ट्रिकी शब्द आहे...कधी त्याला खोल अर्थ असतो आणि कधी ते अळवावरचे पाणी असते. संस्कार हे कोणावर कधीच लादता येत नाहीत किंवा " पास " अथवा " रिजेक्ट " लेबल सारखे चिकटवता नाहीत . संस्कार दिले जातात आणि ते योग्य रीतीने घेतले जातात असा संस्कारांचा वसा पिढी दर पिढी चालू असतो . पण मुळातच ज्या व्यक्तीवर हे संस्कार होतात ती व्यक्ती पुढे जावून याला किती महत्व देते यावरून त्या संस्कारांची व्याख्या नेहमीच बदलत असते ......कालमानानुसार संस्कारबदलत जातात ...शंभरवर्ष पूर्वी केले जाणारे संस्कार कालानुरूप बदलले , तर काही संस्कार सततच्या बदलत्या परिस्थिती देखील काळाच्या कसोटींवर खरे उतरले.

आवारगी .....

लेखक यशोधन वर्तक यांनी रविवार, 26/02/2012 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
ये दिल ये पागल दिल मेरा क्यू बुझ गया ...आवारगी !...इस दस्त मै एक शहर था वो क्या हुवा ....आवारगी ! कल जब मुझे बेशक्ल की आवाजने चौका दिया ....मैंने कहा तू कोन हैं ..उसने कहा .....आवारगी !!!!! गुलाम आली ने ही गझल गायली आणि आवारगी प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनली . आवारगी याची व्याख्या या ठिकाणी उनाडपणा ...म्हणजे राज कपूर च्या भाषेत " आवारा हु " अशी नाही. आवारगी याचा उर्दूतील खरा अर्थ म्हणजे मनाची संभ्रमित अवस्था. आज राज कपूरच्या नातवाचा म्हणजे रणबीर कपूरचा " रॉकस्टार " सिनेमा मी स्वाती आणि आदित्य तिघंच पाहत होतो. रणबीर ने रंगवलेला जॉर्डन बघत असताना कॉलेज च्या दिवसांची आठवण आली.

कालाय तस्मै नम:

लेखक यकु यांनी शुक्रवार, 24/02/2012 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्याछूटच सांगून टाकतो शॉटमारी लेख लिहीतोय. त्यामुळं निगुतीनं वाचा; आता वेळ नसेल तर लगेच वाचूच नका. हे लिहिण्यामागे अपेक्षित असलेलं हस्तांतर शेवटी झालं की नाही ते सांगा. गेल्या काही दिवसांपासून मला एक प्रश्न पडला आहे. आपण जगात वावरतो कोणत्या आधारावर? आपल्या वावराला आधार कशाचा असतो? आपण एखाद्या काल्पनीक मितीमध्‍ये जगतो की आपल्या पायाखाली काही ठोस असतं? थोडासा आणखी फाटा फोडतो. मला ' काळ किंवा वेळ' दोन मूळ रुपात प्रतित होते. एक आहे काळाच्या उलटण्‍याची नैसर्गिक गती - ज्या गतीत कुणीही फेरफार करु शकत नाही. या काळाच्या उलटत असलेल्या नैसर्गिक गतीमध्‍ये काहीही फेरफार संभवत नाही.

गुन्हेगारीचे राजकीयकरण ....

लेखक यशोधन वर्तक यांनी बुधवार, 22/02/2012 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
आयबीएन लोकमत वाहिनी वर प्रसारित झालेल्या " आजचा सवाल " या कार्यक्रमात ...राजकारणाचे गुन्हेगारीकरण या विषयावर चर्चा झाली. राजकीय पक्षाचे प्रमुख आणि जबाबदार पदाधिकारी गुन्हेगारांना निवडणुकीची तिकिटे का देतात नेते आणि उमेदवार गुंडांची मदत का घेतात किंवा घेतात की नाही ? असा साधारण चर्चेचा विषय होता . ही चर्चा बघताना आणि ऐकताना ..." सिंघम " सिनेमा बघताना जितकी करमणूक झाली नाही तेवढी करमणूक झाली. अनेक पक्षांचे नेते येवून गुंडांना निवडणूक लढवण्यापासून कसे रोखता येईल त्याची उपाययोजना करण्याच्या गप्पा मारत होते.