Skip to main content

प्रकटन

मरण ??

लेखक मिरची यांनी गुरुवार, 09/02/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच मरण एवढं अवघड आहे मान्य करायला? कुणाचं ? स्वतःच की दुसऱ्याच ?

"श्रद्धा"

लेखक बज्जु यांनी रविवार, 05/02/2012 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धा "श्रद्धा" या एका शब्दाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सगळ्यात आधी विचार येतो तो म्हणजे हि एक देव, संत, महात्मे झालच तर अगदी अलीकडल्या काळातले अमुक अमुक बाबा, तमुक तमुक माता यांच्याशी जवळीक साधणारी काहीतरी भानगड असावी असा. पण मग श्रद्धा म्हणजे नेमक काय असाव ? श्रद्धा म्हणजे विश्वास का ? श्रद्धा म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी किवा वस्तूविषयी वाटणारी प्रेम किवा आपुलकीची भावना का? का भीती? का श्रद्धा म्हणजे देव या संकल्पनेविषयी वाटणारा आदर ?

मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन (अ‍ॅप)

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 01/02/2012 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्व मिपाकरांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की मिसळपाव.कॉम हे आता अ‍ॅन्ड्रॉईड फोनवरून सहज वाचता यावं यासाठी मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन बनवण्यात आले आहे. यामुळे मिपाचे पान उतरवून घेण्याचा वेग सामान्य ब्राऊजरच्या तुलनेत अधिक आहे. सध्या तरी मिपा वाचता यावं हा मुख्य भर आहे. सर्व अ‍ॅन्ड्रॉईड धारकांना विनंती आहे की हे अ‍ॅप वापरून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. म्हणजे यापुढील आवृत्तीमध्ये हवे ते बदल करता येतील. मिपा अ‍ॅप हे अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट मध्ये मिसळपाव (misalpav) असे शोधल्यास सहज सापडेल.

मी ?? म्हातारा ???

लेखक गवि यांनी मंगळवार, 31/01/2012 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
ही पोस्ट आज लिहिलेली नाही.. पण तरी शेअर करावीशी वाटली. का? तर...मी आयुष्यात वट्टात पहिल्यांदा आंतरजालावर लिहायला लागलो तेव्हा माझ्या हातून घडलेलं पहिलं लिखाण.. बर्‍याचदा लिखाणाची सुरुवात नॉस्टाल्जियानेच होते.. तसंच हे.. "मी.. ?? म्हातारा ???" ते आज परत सर्वांसमोर ठेवतो आहे.. ........................ मी कधी कधी "धम्म धम्म" अशी जड पावलं वाजवत भूतकाळात शिरतो. मनाविरुद्ध.. जशी जशी आयुष्याची वर्षं जातात तसा तसा आठवणींचा ढीग जमा होत जातो.

संसर्गजन्य जिवाणू

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 29/01/2012 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी एका माणसाच्या शरीरात नाकावाटे शिरलो. म्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा. कारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू.

शेलू !!

लेखक शरभ यांनी रविवार, 29/01/2012 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजचे दिवस होते. घरी चाललो होतो. नेहेमीप्रमाणे थाण्यावरुन कर्जत पकडली, २:२८ ची. ही डबल फास्ट लोकल डोंबिवली, कल्याण करत, कल्याणनंतर सर्व स्टेशनवर थांबते. बरोबर मित्रदेखील होता. तो डोंबिवलीचा होता. अशाच गप्पा मारता मारता मित्र म्हणाला- काय रे, हे शेलू कुठे आहे ? मी म्हणालो - तुला बदलापूर माहिती आहे. त्यापुढे वांगणी आणि मग शेलू. आणि मग नेरळ... जिथून माथेरानला जाता येतं...का रे ? तो म्हणाला - अरे सहजचं. आणि डोंबिवली आल्यावर तो उतरून गेला. मी विचार केला- थोडा वेळ आहे तर एक छोटी नॅप मारुन घेऊ. तशी असली नॅप म्हणजे नेहेमीचीच असायची. थोड्यावेळाने डोळे उघडले आणि हात ताणून आळस दिला.