Skip to main content

प्रकटन

!! श्रद्धांजली !!

लेखक नाम्या झंगाट यांनी बुधवार, 25/01/2012 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुण्यामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली..... संतोष माने नावाच्या एका माथेफिरू S.T महामंडळाच्या कर्मचाऱ्याने बिचाऱ्या ९ माणसांना कारण नसताना चिरडले आणि कित्येक लोकांना जखमी केले.. याच्यावर काय लिहावे तेच कळत नाही....डोके बधीर आणि सुन्न झाले आहे. या घटनेत मृत पावलेल्या सर्व नागरिकांना !! श्रद्धांजली !!

नाती-गोची २

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 20/01/2012 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
"एन्हॅन्स्ड सेन्सिबिलिटीज म्हणजे काय रे"? कुठे ऐकलास हा शब्द? (पल्याडचे लेख वाचायला लागली की काय?) "आंघोळीला गेला होतास. फोन सारखा वाजत होता म्हणुन उचलला. मी हॅलो म्हणायच्या आधीच त्या बै ३ मिनीटे बोलत होत्या". हा शब्द वापरणार्‍या ना बै नाही म्हणायच. मॅम म्हणायच. "मॅडम मधला ड चे काय"? ते मॉडर्न आहे तुला नाय समजायच. "नाही तर नाही. मला अर्थ सांग". जाणीवांच्या विस्तारलेल्या कक्षा. "अगो बाई. विस्तारलेल्या कक्षा मधे अक्षरे खातात की काय? तो फोन कर.

लहानपणीच्या गोष्टी

लेखक तिमा यांनी गुरुवार, 19/01/2012 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रकला हा माझ्या आवडीचा विषय कधीच नव्हता. शाळेमधे परसेंटेज व नंबर खाली यायचा तो याच विषयामुळे. त्यातून मोठ्या बहिणी त्याच शाळेत असल्यामुळे तर मला चांगलीच बोलणी बसायची. त्या दोघींची चित्रकला अप्रतिम होती, अगदी बोर्डावर त्यांची चित्रे लावली जात. मला मात्र माणसाची फिगर अजिबातच जमत नसे. तशी इतरांची सुंदर्, सुंदर चित्रे बघायला मला खूपच आवडत. पण मला येत नसलेली कला, अशी मारुन मुटकून कशी येणार हे समजत नसे. वर्गात ३/१० मार्क मिळवणारा मी घरुन काढून आणलेल्या चित्रांना मात्र ९/१० मिळवत असे. पण ते मार्कस देताना चित्रकला शिक्षक, छदमीपणे हंसून, बहिणीने काढलेलं ओळखताय हं गाढवा!

माझा निबंध.....

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 19/01/2012 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझा निबंध..... एकदा वर्गात ऑफ पिरिअड होता. मस्त पुस्तक वाचत होतो....मार्क ट्वेन चे....टोम सायर....बाईनी निबंध दिला.... "मला पंख असते तर" कोण मुंबईला गेला.....कोण हिमालयात गेला...(एक तर पार अमेरिकेत गेला....त्यावेळी अमेरिका दूर होती आणि इंग्लंड जवळ होते..)...तर कोण पक्ष्यान बरोबर गप्पा मारत बसला.... आता पुस्तक वाचावे की, निबंध लिहावा....मग काय पटकन निबंध लिहिला आणि पुस्तक वाचायला लागलो..... बाईनी बघितले कि हे काय...हा मुलगा लिहित का नाही?

नाती गोची

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 17/01/2012 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
"उद्या कुठे आहेस"? विरार, का ग? "अरे अनिकेत भाउजींचा साठावा वाढदिवस आहे ना. आमंत्रण आहे". किती वाजता? "आठ वाजता. स्पेशल पाणी पुरी चा कार्यक्रम आहे" येउन पोचतो. पण तु आधी जा. "गिफ्ट काय घेउ"? मला माहीत नाही. "अरे सुचव ना" घरात एक ग्लेन फिडीच आहे ना. ती देउ. "शी. साठाव्या वाढदिवसाला दारु" मग तुला काय आवडते ते दे. "येताना एक बुके घेउन ये. कार्यक्रमात मिळलेच ना. विकतचा आणु नकोस. तेवढेच वाचले. स्पेशल पाणीपुरी म्हणजे काय रे"? पाणी पुरीच्या पाण्यात थोडीशी व्होडका आणि लिम्का टाकले की झाली स्पेशल पाणी पुरी.