Skip to main content

प्रकटन

कोलावरी गोदावरी

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 28/12/2011 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्या कोलावरी डी गाण्याने कहर केलाय हे नक्की. लाखो बघे त्या गाण्याला मिळाले ही कमाल आहे. लाखो म्हंजे चाळीस पन्नास लाख वगैरे. गाणे खरेतर शून्य आहे. पण तरी एवढे बघे म्हंजे हल्लीच्या सांस्कृतिक चवीचा ही अंदाज बांधता येईल. असो. मी मात्र ते गाणे कानावर आल्या आल्या आणि त्याच्या प्रसिद्धीची बातमी समजताच एक फायदा करून घेतला. आमच्या गोदेची हेळसांड मला अगदी पाहवत नाई. नाशिकला उगम पावणारी गोदावरी नदी. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे समाजबांधव आणि भक्त आणि अन्य जन तिचा बरं महिने छळ करत असतात. तिची कधी एकदा "मिठी" करावी असे काहीसे जनतेला झाले की काय कुणास ठाऊक.

उनाड दिवस .... मेणवली घाट.

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 27/12/2011 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
वल्लीनं आमच्या अनुपस्थितीत आमच्या खोर्‍यात चढाई करुन सारा मुलूख काबीज केला म्हटल्यावर आम्हालाही स्फुरण आलं. पूर्वीच कधीतरी काढलेली ही प्रकाशचित्रं आम्हाला खुणावू लागली आणि आम्ही ठरवलं की काही अस्पर्श भूभाग लोकांसमोर आणावा. बघा आवडला तर.... १. मेणवली घाट. पायर्‍या आणि झाड (स्वदेस ) २. मेणवली घाट. मंदिर (शिंगम/चिंगम) ३. मेणवली घाट.

ब्रेक अप...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 27/12/2011 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझी अपेक्षापूर्ती न करणाऱ्या या अनामिक नात्याचा मला भयंकर कंटाळा आलाय बघ. तू म्हणशील पुरुष इथून तिथून सारखेच असतात, मलाही तसंच समज हवं तर. तुझे सारे आरोप अन् आक्षेप मला मान्य आहेत. हो, मीही पुरुष आहे. मीही तुझ्यावर प्रेम करतांना एकच अपेक्षा ठेवली होती. ती सुरुवातीला तू समरसून पूर्ण करीत गेलीस. परंतु आता काळ बदलला, आपण जरा समंजस झालो आहोत. तुला तुझे करियर घडवायचे आहे. तू आता मध्यावर आली आहेस. अजून खूप पल्ला गाठायचा आहे. तू जीव तोडून काम करतेस, प्रसंगी ओव्हर टाईमलाही थांबतेस.

मनातलं जनांत

लेखक गणपा यांनी सोमवार, 26/12/2011 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही वर्षे मी ब्लॉगबद्दल बरचं ऐकुन होतो. मध्यंतरी दोन एक वर्षांपुर्वी 'स्टार-माझा'ने ब्लॉगर्सची स्पर्धा ही भरवली होती आणि आपल्या मित्रांनी त्यात बक्षिसही पटकावली होती. ते सगळ पाहुन फार कौतुक वाटलं सगळ्यांच. आपलाही एखादा ब्लॉग असता तर असा विचार क्षणभर मनात डोकावून गेला. पण ज्याला चार ओळी धड टंकता येत नाहीत त्याचा ब्लॉग? आणि समजा जरी काढला (त्याला पैशे थोडीच लागतात ;) ) तरी त्यात लिहायचं काय? शाळेत सुद्धा ५-१० मार्कांचं पत्रलेखन आणि निबंध ऑप्शनला टाकणारे आम्ही.

भ्रष्टाचारी उद्योगाविरुद्ध कारवाई व्हावी याकरिता दिलेल्या लढ्याचा वृत्तांत

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 21/12/2011 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
अजय पॉली प्रायवेट लिमिटेड या खासगी उद्योगाकडून सरकारच्या विविध खात्यांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे याबद्दल मी शासनास एक सविस्तर पत्र लिहीले.

गोल्ड सेफ आणि स्पिक अशिया ! चे अर्थशास्त्र काय?

लेखक कापूसकोन्ड्या यांनी मंगळवार, 20/12/2011 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या चुकार क्षणी टिव्ही लावला जातो आणि गोल्ड सेफ आणि स्पिक अशिया यांचे सेलिब्रिटिचे फोटो एकमेकात मिसळून तुम्हाला ओळखण्या चा कार्यक्रम चालू असतो. उत्तरे अगदी सोपी असतात. (अगदी संध्यानंद मधल्या शब्दकोड्याच्या क्लू सारखी - उदाहरणार्थ- सोमवार नंतरचा वार-भारताची राजधानी- नवी ** वगैरे) फक्त झूम ए २४ वगैरेच नव्हे तर चक्क एन डिव्ही आणि इम्याजीन सारखे च्यानेल्स सुद्धा हे कार्यक्रम प्रदशीत करीत असतात. याच्या मागचे अर्थशास्त्र समजत नाही. फ्रॉड म्हणावा तर ग्राहकाना फसवले जाते म्हणजे नेमके कसे?

सचिनचा मार्ग 'मोकळा'

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 17/12/2011 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
आता खेळाडूंनाही मिळणार 'भारतरत्न पुरस्कार' 'सचिनचा भारतरत्नचा मार्ग मोकळा' वाचून कुणालाही आनंद होइल अशी बातमी आहे. नीट विचार केला पाहिजे. एका सचिनसाठी ही नियमांची मोडतोड आहे का ! सध्या सरकार कठीण परिस्थितीतून जाते आहे.