Skip to main content

प्रकटन

अंबेजोगाई जिल्हा देशी दारु विक्रेता संमेलन - घोषवाक्य व प्रतिकचिन्हांची स्पर्धा

लेखक सन्जोप राव यांनी शनिवार, 17/12/2011 06:03 या दिवशी प्रकाशित केले.
२०१३च्या अंबेजोगाई येथे होनार्‍या अंजोजिदेदाविसं (अंबेजोगाई जिल्हा देशी दारु विक्रेता संघ) अधिवेशनाच्या संयोजक समितीने घोषवाक्य आणि प्रतीकचिन्हाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. विजेत्या स्पर्धकाला २०१३ -२०१४ या शैषणिक, स्वारी, शिक्शनिक, दिल्या मायघाल्या ह्ये ली रे येवडं... शैक्शणिक, हां.. वर्षात अंबेजोगाई जिल्ह्यातील कोणत्याही देशी दारुच्या दुकानात आपल्या आवडीच्या ब्रॅन्डची दररोज एक क्वाट्टर (याला काही लोक चुकीने 'क्वार्टर' असेही म्हणतात) विनामूल्य दिली जाईल.

१९७१ चे युद्ध - पाकवरील विजयाचा ४० वा स्मृतिदिन

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 16/12/2011 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज १६ डिसेंब्रर २०११. आज १९७१ च्या पाकिस्तान युद्धातील भारतिय विजयाला चार दशके झाली. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाक सरकारने युद्धाला सुरुवात केली. पाकी हवाईदलाच्या विमानांनी आपल्या ११ हवाई तळांवर आणि रडार केंद्रांवर हल्ले चढविले आणि पाठोपाठ भारताला युद्ध घोषीत करावे लागले आणि या युद्धाला सुरुवात झाली. १३ दिवस चाललेल्या युद्धात पाकला नामुष्की पत्करावी लागली, बांगला देश हे नवे राष्ट्र जन्माला आले. मोठ्या वल्गना करणार्‍या कुरापती पाकला अवघ्या १३ दिवसात दाती तृण धरुन शरण यावे लागले. ले. ज. ए.ए.के.

मी ऑफिसमध्ये कामचुकार पणा का करतो..?

लेखक जमीर इब्राहीम 'आझाद' यांनी गुरुवार, 15/12/2011 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
दार वाजू लागले.. पण दिसत तर कुणीच नव्हते... दुकानदाराला वाटले भास झाला असावा.. दार पुन्हा वाजले .. मग त्याने खिडकीतून वाकून पाहिले तर एक धिप्पाड, मोठ्ठा, अल्सेशियन कुत्रा त्याच्या दुकानाचे दार ठोठावत होता.. त्याने त्याला लगेच हुसकून लावले....तरी पुन्हा तोच सीन.. कुत्रा त्याच्या दुकानाचे दार वाजवत होता.. मग त्याने नीट पहिले तर त्या कुत्र्याच्या तोंडात एक पिशवी होती..

"पारंबी" एक वेगळा चित्रपट

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शुक्रवार, 09/12/2011 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझा मित्र सतिश सलागरे यांनी दिग्दर्शित केलेल्या " पारंबी" या चित्रपटाचा प्रिमिअर शो पाहाण्याचा योग आला.. अंधेरीच्या फन रिपब्लिक मध्ये या चित्रपटाचा प्रिमिअर शो होता..अतिशय साधे पण तितकेच विचारप्रवणीय कथानक..खेडेगावातील एक गरिब तरूण शिक्षण घेउन आल्यावर , गावाची परिस्थीती बघून आपलच गाव सुधारण्या प्रयत्न सुरू करतो.. हे करत असतांना त्याला काय अडचणी येतात, त्यातून तो नायक कसा मार्ग काढतो.. अशी साधी कथा.. भूषण प्रधान.