द स्पिरिट ...
पूर्वीचा भाग: झुईं..
राईट ब्रदर्सनी हवेपेक्षा जड इंजिनवर चालणारं आणि पायलटच्या हाती संपूर्ण कंट्रोल्स असलेलं विमान उडवून दाखवलं. माणूसप्राण्याचा हा एक जबरदस्त लोभस गुण आहे की एकदा "ब्रेक थ्रू" सापडला की पुढे सुधारणा करुन तंत्र परफेक्ट बनवण्याचं काम हा प्राणी फार झपाट्याने करतो. राईट्सनी आपल्या विमानात सुधारणा करत करत ते आणखी स्थिर बनवलं.. आणखी नियंत्रित बनवलं...
नव्या तंत्राचा पहिला उपयोग आपण माणसं ज्यासाठी करतो त्यासाठी, अर्थात युद्धासाठी, विमानाचा वापर शोध लागताक्षणीच सुरु झाला.
मिसळपाव