Skip to main content

कविता

((सहज..))

लेखक सतिश गावडे यांनी शनिवार, 03/01/2015 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
p शब्दाने वाढला शब्द कडाक्याचे भांडण झाले मी सुन्न आणि स्तब्ध अन, ती निघून गेली न मागे वळून पाहणे न माघारी ते फिरणे वादातून तुटला धागा आता उरले ते झुरणे मी आशा का ठेवावी? की जीवनी असेच व्हावे साथ ही सुखाची नेहमी मनाजोगे घडावे ती निघून गेली आता तिच्या एकल्या मार्गाने कोमेजून गेली स्वप्ने मी व्याकुळ इथे विरहाने भेटेल कुणी कधी तिला तो मार्ग चालता चालता दाटूनी कंठ माझा आला मज काही न ये बोलता आता माझ्याही नशिबी हे थ

रक्तदाब!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 03/01/2015 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
एक अस्तो उच्च रक्तदाब्,आणि एक असतो हुच्च रक्तदाब! उच्च साधा सरळ असतो ,जसा आत..तसाच बाहेर! आणि हुच्च..?? अबबं!!! आम्ही काय बोलावे?... (वरच्या ओळित ,सगळच नै का आलं? ;-) ) उच्च रक्तदाबाला निच्च रक्तदाब पण असतो. पण हुच्च असेल तोच तर तो, फ़क्त हुच्चच असतो! ( ;-) ) उच्च रक्तदाब वाढलेला,चढलेला...कसाही! पण हुच्च मात्र..वाढवलेला,चढवलेला...असाही! उच्चरक्तदाबवाली माणसं..एकदम जातात...सिरियस-वगैरे होत नाहीत.. पण हुच्चवाली..???

अर्रे पांडुब्बा ..

लेखक टवाळ कार्टा यांनी शुक्रवार, 02/01/2015 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
वर्जीनल कवी, लाडके मिपावासी स्पा आणि उल्लेखलेल्या समस्त मिपाकरांची मापी मागून आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/29893 --------------------------------------------------------------------------------- माताय, अंगातल्या टवाळकीमुळे खूप जिल्ब्यांसोबत मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय. टैम्पास करून घ्या मंडळी ...

अगा पांडुरंगा ..

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 02/01/2015 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योताय, तुझ्या हुकूमावरून खूप दिवसानंतर मिपावर परत लिहायला सुरूवात करतोय. गोड मानून घ्या मंडळी ...
काव्यरस

(सहज..)

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 01/01/2015 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मुदांची मापी मागून :) पेर्णा - http://www.misalpav.com/node/29887 ------------------------------------------------------------------------ adagal कोळ्यांनी विणले जाळे वाळवीने करामत केली. मी कचरा केला नाही अन्,तरीही अडगळ झाली. विटलेला रंग कचर्याचा गंध ना घुशींना प्रतिबंध. कोपर्यातुनी मोडलेला (खिडकीचा) सांधा लाभला उंदरांस स्वच्छंद! मी आशा का ठेवावी? की कबुतरांना शी न व्हावी! वैतागून संध्

सहज..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 01/01/2015 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
https://lh4.googleusercontent.com/-SlYwf_I5qkM/VKKOxOhFBGI/AAAAAAAAGoo/bWGXNKJWhdU/w326-h580-no/https%253A%252F%252Flh6.googleusercontent.com%252F3Il92l88Ww_O5tbjFoNYzLAkiCz4u-_2HvN22m-XOe0%253Ds0-d जाळ्यावर विणले जाळे शब्दांनी कसंरतं केली. मी काहि केले नाही अन्,सहजी कविता झाली. ना शब्द रंग रस गंध ना प्रतिकांचे प्रतिबंध. तालातून जुळता सांधा
काव्यरस

सुखसाधना

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 30/12/2014 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
मथुरा सुखी कान्हा सवे, त्याच्याविना इथे प्राण ना गोकुळ रंगे त्याच्या सवे, त्याच्याविना मुळी त्राण ना ll १ ll जादू करी मुरलितुनि फुलवी, चैतन्य कैसे सांग ना मी घेतसा माझ्या करी, ती अबोल कैसी सांग ना ll २ ll तू सावळा चितचोर रे, तू घननीळ जैसा श्रावणा तू घे मला संगती, रंगात तुझिया मज रंग ना ll ३ ll तू येतसा मन नादते, आल्हाद छाया या वना तरु फुले अन पाखरे, धेनुही आतुर तव दर्शना ll ४ ll तू सखा संगे तुझ्या, ये पूर्णता या जीवना अगम्य साऱ्या लीला तुझ्या, एकवार अजुनी दाव ना ll ५ ll तू श्वास माझा ध्यास, तूच माझी सुख साधना सांज होतसा तू जातसा, राधा राहील कैसी सांग ना ll ६ ll -सार्थबोध

कसं जमतं तुला

लेखक सुचेता यांनी सोमवार, 29/12/2014 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
कसं जमतं तुला, मनाला आवरणं? किती सहज, हे तुझ असं विचारणं? उत्तर द्यायला माझं पुरत भांबावणं कितीएक क्षण नुसतचं गप्प राहण गप्प राहण्याचा का हा अर्थ तू घेतला? की सगळचं हे सहज शक्य होतय मला? थोपवताना भावना घामाघूम जीव आपला तुझ्यालेखी थट्टेचा, का विषय ठरला? फुरंगटुन मी आणखीच व्हावं अबोल समजवण्याच्या मिषानं तू यावं जवळ लपवताना थरथर, मन उघडं पडावं जे हवच होतं तुला, तुझं तु समजून घ्यावं
काव्यरस

निरंजनाची कविता

लेखक यशोधरा यांनी रविवार, 28/12/2014 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
झोप येईना येईना, कविता सुचली निरंजना | शब्दापुढे रचणे शब्द, हाचि लागला तया नाद| निरंजनाचा कपडा भगवा, आत निरंजन रे नागवा || कौतुक, स्तुती, वाद- विवाद, उपेक्षा आणि अपेक्षा ह्याहीपलिकडे जाणार्‍या शाश्वत परिमाणाशी नातं जोडू शकणारी रॉय किणीकरांची कविता. गहिर्‍या चिंतनशीलतेशी नातं सांगणारी, अचूक मोजक्या शब्दांच्या सहाय्याने विलक्षण असा कायमस्वरुपी असर मनावर टाकणारी आणि मनाला चुटपूट लावणारी. काही उमजलं आहे, समजलं आहे ही जाणीव होता होता, पार्‍यासारखा निसटून गेला, अशा अर्थांची काहीशी अनुभूती देणारी. गूढ आणि तितकीच मोहिनी घालणारी समर्थ शब्दकळा ल्यायलेली, पण काहीशी अस्थिर वाटणारी.

गंध माझे

लेखक टवाळ कार्टा यांनी शुक्रवार, 26/12/2014 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा - http://www.misalpav.com/node/29834 वर्जीनल कवीची मापी मागून :) ------------------------------------------------------------------------ ये जरा "बसायला", घे बाटलीतले तीर्थ इथे गाठी शेवया मागाया, काय सांग जाते तुझे ll १ ll अट्टल पिणारे लाजतील, येता (बाटली) तुझ्या हातावरी अंगावरल्या समस्त वस्त्रांस, जरा जडू दे गंध तुझे ll २ ll या शर्ट-प्यांटवरील, पुसती जरी साऱ्या खुणा ती अशी खमकी असता, गालावरचा रंग सजे ll ३ ll सखे ग सहवास तुझा, रंगतो लाल गालांवरी पुन्हा होईल भेट तोवरी, ग्लास वाहील काय ओझे ll ४ ll - पीकेबोध