Skip to main content

कविता

कोवळीक

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/10/2014 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
कोवळीक आताशा आयुष्यात माझ्या येवून जा आलास कधीतरी तेव्हा चांगला राहून जा तुझीच वाट पाहते कधीची आर्त पाण्यासाठी तगमगलेली कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची फुले तर तर भरपुर निघाली पण अजूनही आस आहे फुलायची - पाभे

तवंग

लेखक बेसनलाडू यांनी सोमवार, 13/10/2014 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझाच चंद्र सतत हरवतो तुझ्या आभाळी कोसळणारे गढूळ धबधबे कडेकपारी झडणारा मी वसंत टपटप अश्रूंमधला ओळी कातर उल्लेख पानभर व्याकुळ शाई बंद पापण्या तवंग मणभर साचवलेले हिरव्याकंच जखमांचे वैभव मन शेवाळी
काव्यरस

पोहे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 13/10/2014 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवसा पुर्वि एक कविता मीपा वर वाचली निट आठवत नाहि पण ति कल्पना जाम आवडली व त्या नुसार कविता ्लिहावि असे वाटत होते "येथे उपासाच्या कचोर्‍या मिळतील..असे काहिसे शब्द होते कविता आवडल्यास त्याचे श्रेय त्या अज्ञात कविस व त्याच्या कल्पना शक्तिस. ========================================= पोहे पृथ्वीच्या अर्धगोलाकार आकाराची कढई... खाली सहस्र सूर्य ओकतोय अशी आग तापलेलेल्या रिफाइंड तेलाच्या डोहात मोहरीचे, ब्रह्मांडात अणू रेणूचे चालते तसे तडतड नर्तन साथीला हिरव्या मिरच्या व कढीपत्त्याचा व्योमास भेदणारा चर्र्र्र असा नाद कांदे व बटाट्याचे काप व रुद्राचा हळदीचा भंडारा सूर्याच्या रक्तिमा सारखे लाल तिख

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 09/10/2014 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थ बाजूला ठेवून, पहिल्यांदा हृदयनाथांनी गायलेलं हे कमाल गाणं (पुन्हा एकवार) ऐकू. अत्यंत गोड आवाज, कवितेला साजेशी, मुख्य म्हणजे ग्रेसच्या लयकारीच्या नखर्‍याला जराही धक्का न लावणारी चाल आणि कमालीची दिलकष शब्दफेक! खरं तर ग्रेसच्या इतक्या सुंदर कवितेचं `गाणं' झालं नसतं तर कदाचित, ती चर्चेचा विषय झालीही नसती.

मी लोकलयात्री

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 08/10/2014 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी लोकलयात्री स्टेशनावरी उभा ठाकतो ट्रेनागमना पुढे वाकतो युद्धासाठी सज्ज जाहतो मी लोकलयात्री गर्दी बघता चमकून जातो तरीही क्षणात मी सावरतो मग अंगीचे बळ जागवतो मी लोकलयात्री बसण्या जागा मृगजळ जरी उभे रहाण्याचे बळ जरी ट्रेन रिकामी बघून हर्षतो मी लोकलयात्री एकच गलका उडे क्षणातच कुणी कधीचे कुठे क्षणातच मेंढरापरी गर्दीत घुसतो मी लोकलयात्री नवे चेहरे रोज पुढ्यात नवे वास मम नाकपुड्यात रोज नव्याशी जुळवून घेतो मी लोकलयात्री चहूदिशांनी दाब प्रचंड अस्तित्वाचा लढा अखंड अपुली आपण खिंड लढवतो मी लोकलयात्री स्टेशन येते स्टेशन जाते गर्दी तरीही वाढत जाते 'सरणार कधी हे' म्हणत राहतो मी लोकलयात्री

पत्र

लेखक अजब यांनी बुधवार, 08/10/2014 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांपासून तुला पत्र लिहायचं ठरवत होतो... आधी विषय सुचत नव्हता मग वेळ मिळत नव्हता शिवाय 'न लिहिण्याची' झालेली सवय आणि आळस- अशा एक ना अनेक सबबी... पूर्वी पत्रांना गंध असायचा आणि अक्षरांत ओलावा न लिहिलेला मजकूरही दिसायचा लिहिणार्‍याचा चेहरा आणि बोलण्याचा आवाज वाचता-वाचता उमटायचा... इतकंच कशाला; ते आलेलं पाकीट उत्सुकतेने फोडायचं वाचलेलं पत्र पुनः पाकिटात आणि पाकीट वही, पुस्तक किंवा डायरीत ठेवून वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मूडमधे वाचायचं पत्रांची साठवण- एक खजिनाच असायचा... खरं आहे; पत्र लिहिणं आता 'सोयिस्कर' नाही राहिलं वेळ, कागद, पेन काढणं स्वतःच्या अक्षराबद्दल चडफडणं आणि खाडाखोड झाल्याव

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

प्रवाही

लेखक आतिवास यांनी शनिवार, 04/10/2014 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळीचा रेटा सोसून काही मागे उभेच आहे; पाचोळ्यातून हलके हलके जीवनरसही वहात आहे; जे झाले, ते गेले आता, मागे वळून पाहता काही नाही; तरी पाखरे सुरेल गाती जगणे होता पुरे प्रवाही!

AN ODE TO मिसळपाव ! द्वितीय पुष्प

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 01/10/2014 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा बोधिवृक्षकारांनो…वृक्षाची जोपासना करणार्यांनो …. सर्व स्वयंभू देवस्थानांनो ….खालसा आणि स्वायत्त संस्थानांनो …. अखंड धुनी पेट्व्यानो…त्यात अविरत तेल ओतणाऱ्यानो …. सतत खल करणार्यांनो …. अविश्रांत गूळ काढणार्यांनो… तळ्यात- मळ्यात खेळणाऱ्यानो… विरोधासाठी विरोध करणाऱ्यानो… खरडफळा भरणाऱ्यानो…कळफलक बडवणार्यांनो…दुर्गभ्रमंती करणार्यांनो… खाद्यचौकशी करणार्यांनो … अनुभवसमृद्ध काकांनो आणि सर्वगुणसंपन्न ताईन्नो…. फक्त किल्ली फिरवणार्यांनो…. सतत खिल्ली उडवणार्यांनो….
काव्यरस

भय इथले संपत नाही (दोन)

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 01/10/2014 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28987 -------------------------- भय आणि प्रणय या सजीवांच्या दोन आदिम प्रेरणा आहेत. खरं तर बाकी सगळ्या प्रेरणांचा त्या स्त्रोत आहेत. आणि आपलं मन या दोन प्रेरणांमधे अविरत दोलायमान आहे. भय केवळ मृत्यूचं नाही, तर जिथेजिथे आपण जोडलो गेलोत, जिथून आपल्याला आनंद मिळतो, जो आपला आधार आहे, तो तुटण्याचं भय आहे. मग तो सखीचा देह असो, आपला की कुणा जिवलगचा देह असो, त्याच्या विलयाचं भय. नाती, अनुबंध, किंवा मैत्री तुटण्याचं भय. आर्थिक विपन्नतेचं भय किंवा मग स्व-प्रतिमेला तडा जाण्याचं आणि सामाजाच्या अवहेलनचं भय.