Skip to main content

कविता

फैसला

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 12/04/2014 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
फैसला जीवनाचा हाच साला घोर आहे येथला प्रत्येक मुर्दा थोर आहे भामटा असणार हा नक्कीच नेता ऐकतो, सर्वत्र त्याचा जोर आहे खेळतो पैसा भल्यामोठ्यांत आता हे कुणाचे माजलेले पोर आहे मांडतो प्रस्ताव आता एकतेचा कालचा तो हाच दंगेखोर आहे मी निघालो आणि तू आलीस राणी फैसला हा छान काटेकोर आहे डॉ.सुनील अहिरराव

विलक्षण कविता - असाध्य वीणा

लेखक शुचि यांनी शनिवार, 12/04/2014 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
"अज्ञेय" नावाच्या कवीने हिंदी भाषेत लिहीलेली एक विलक्षण कविता "असाध्य वीणा" मध्यंतरी वाचनात आली. भारदस्त अन कसदार शब्दसौंदर्याचे बावनकशी लेणे ल्यालेली ही कविता माझ्या मनाला चिंब भिजवून, अतिशय आल्हाद देउन गेली. मी तर म्हणेन सर्वाधिक आवडलेल्या काही कवितांपैकी ही एक! ___________ कवितेचा गाभा हा आहे की - गुहावासी ऋषी प्रियंवदा हे राजाकडे आलेले आहेत अन राजाने त्यांना एका वीणा छेडून , वाजवून दाखविण्याची, वीणावादन करण्याची विनंती केलेली आहे.
काव्यरस

आयुष्याचे सात वार

लेखक sunrise यांनी शुक्रवार, 11/04/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्राचा शीतल प्रकाश, बाप्पा सगळ्यांना देतो गोंडस बाळाच्या रुपात, प्रत्येकजण जन्माला येतो बालपण कसे संपते, कधी कळतच नाही असा सोमवार परत, कधी मिळतच नाही मंगळाचा जोश, संपूर्ण तारुण्य व्यापतो आभाळा एवढ्या आकांक्षा, आपण उरात जपतो खूप काही करायला, वेळ कमी पडतो आपल्या नकळत अचानक, बुधवार उजाडतो बौद्धिक आणि आर्थिक, आपण झेप घेत असतो कुटुंब, तब्येत, मित्र - ह्यांसाठी वेळच नसतो अनुभवाचं लक्षण म्हणून जग, पांढऱ्या केसांकडे पाहतं स्वतःसाठी थोडं जगायचय, असं मनात वाटत राहतं एक महत्वाचा निरोप घेऊन, मग गुरुवार येतो खरा मार्ग दाखविण्याचा, प्रयत्न करून जातो स्वार्थात भिजलेलं मन, इतक्या लवकर

छन्दोरचना

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 10/04/2014 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रा.माधव त्रिंबक पटवर्धन (माधव जूलियन) ह्यांचा छन्दोरचना हा ग्रंथ प्रथम १९२७ साली प्रसिद्ध झाला. त्यात आणखी भर घालून हाच ग्रंथ १९३७ मध्ये छापून प्रसिद्ध झाला.
काव्यरस

निवडणुकीचा बिगुल . . .

लेखक संचित प्रमोद कुलकर्णी यांनी शुक्रवार, 04/04/2014 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणुकीचा बिगुल देशभर वाजला कालचा तो 'आम आदमी', आज एकदम खास झाला कॉलर पकडणारे हात, नमन करू लागले ओळख विसरलेल्या चेहेऱ्यावरती, भुलवणारे हसू खुलू लागले झोपड्यातलं ते फाटक पातळ, नव्या साडीत बदलून गेलं व्हरांड्यातल्या गांजलेल्या नळांना, ५ वर्षांनी परत पाणी आलं रस्त्यामधले काल परवाचे खड्डे, अचानकच हरवून गेले पल्याड गावच्या दुष्काळग्रस्तांना, एका रात्रीत अनुदान मिळाले शेकडो पोकळ आश्वासनांचा, रोजचा रतीब चालू झाला सफेद सदरेवाल्यांचा घोळका, दारोदारी फिरू लागला चार महिन्यांचा सारा खेळ, पुन्हा सगळं तसंच घडणार पुन्हा पदरी तीच निराशा, आमचा शेतकरी पुन्हा रडणार रस्त्यांवरती तसेच खड्डे, पुन्हा रस्

रूमानी

लेखक अनाम यांनी शुक्रवार, 04/04/2014 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
देवांचे देव्हारे नेहमीच गच्च असतात अन तुझा हट्ट दूरवर वसलेल्या सिद्धेश्वराचा. दुर वळणावळणाच्या रस्त्यावर वाहत जातो मीच माझ्या गाण्याबरोबर थोडा उथळ होतो. सिद्धेश्वरही तस तसा उदास  होत जातो.

प्रीतीची पारंबी

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 02/04/2014 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रीतीची पारंबी

रामाच्या प्रहराला केळीला जाग येते
पाडाच्या घडातुनी कंगण वाजविते

पूर्वाच्या पावसाने न्हाणीची धुणी केली
वेंधळ्या वादळाने जीवनी जुनी केली
रस्त्याचे रंक-राव फुंकून फुंक जाते ॥

मंजूळ मैना शीळ घालते गोंजारून
बघते रानवल्ली नजर न्याहाळून
चंद्राची चंद्रकला लाजुनी लाजविते ॥

तनूच्या तनाईला ताणतो रानवारा
पाटाच्या पैंजणाला झुरतो जीवसारा
प्रीतीच्या पारंबीला पारवा पिंजारते ॥

चोचीत चोजवाया चालला खेळ न्यारा

मी तुझ्या ऐन्यात होतो नेहमी

लेखक drsunilahirrao यांनी मंगळवार, 01/04/2014 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
भर्जरी दुःखात होतो नेहमी मी तुझ्या कर्जात होतो नेहमी शोधिसी आता मला दुनियेत या मी तुझ्या ऐन्यात होतो नेहमी तू जरी केले न दिसल्यासारखे मी तुझ्या लक्षात होतो नेहमी आसवे उबदार तू मजला दिली मी असा श्रीमंत होतो नेहमी ! तू जरी रस्ताच माझा सोडला मी तुझ्या रस्त्यात होतो नेहमी ! मी जरी पापी न होतो फारसा पण तिथे स्वर्गात होतो नेहमी मी तुझ्या हास्यामधे होतो कुठे पण तुझ्या अश्रूंत होतो नेहमी मी तुझ्या भाग्यामधे नसलो तरी हातच्या रेषांत होतो नेहमी ! डॉ.सुनील अहिरराव

नाते

लेखक अमेय६३७७ यांनी शनिवार, 29/03/2014 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
ना ओढ असे देहांची वा स्पर्शाची मर्यादा सहवासाने उजळावे वाटे तरीही कितीदा ना प्रीती - ना ही मैत्री हे तुजला मजला ठावे जे मिळते यातुन, पुरते का द्यावी खोटी नावे हे देण्या अन् घेण्याचे फुललेले मोहक अंगण का बहराला मारावे नसलेले घालुन कुंपण याआधी कैसे होते यापुढती कैसे जाऊ सध्या ठरवू इतके की सध्याला बिलगुन राहू क्षण अपार श्रीमंतीचे ये जपून हृदयीं ठेवू नाजुकसे नाते अपुले वळणाशी अलगद नेऊ -- अमेय

लोकशाहीचा सांगावा

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 28/03/2014 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
लोकशाहीचा सांगावा

आली भूमाता घेऊन । लोकशाहीचा सांगावा ।
पाचावर्षाच्या बोलीन । गडी-चाकर नेमावा ॥

लोकप्रतिनिधी नको । म्हणा लोकांचे नोकर ।
जनतेच्या मतावर । यांची शिजते भाकर ॥

होऊ नका लोभापायी । कोण्या पालखीचे भोई ।
करा फक्त तेच ज्याने । सुखावेल काळीआई ॥

धन-द्रव्य घेतल्याने । होते कर्तृत्व गहाण ।
नको स्वत्वाचा व्यापार । राखा आत्म्याचा सन्मान ॥