कविता
सूर्य थकला आहे
सूर्य थकला आहे
पहाट जरा चेतलेली पण;
सूर्य थकला आहे
नितळण्याच्या बुरख्याखाली
विस्तव निजला आहे
सारं काही सामसूम, मात्र;
एक काजवा जागत आहे
चंद्रकलेच्या गर्भाराला
भिक्षा मागत आहे
वादळं वारं सुटलंय पण;
वीज रुसली आहे
बुद्धिबळांच्या शय्येखाली
ऐरण भिजली आहे
शिवशिवणारे स्पंदन काही
उधाण मोजत आहे
चिवचिवणार्या चिमणीमध्ये
दीक्षा शोधत आहे
अंगरख्याची सनदी गुंफण
टरटर उसवत जावी
अपहाराची दुर्धर खाई
काव्यरस
सस्नेह निमंत्रण : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा (अंतिम फेरी २०१४)
कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१४ (वर्ष ५ वे)
नमस्कार,
या स्पर्धेबद्दल या आधीही एक निवेदन मी येथे दिले होते. त्यानुसार काही कवींनी आपापल्या कविताही पाठविल्या. त्याचबरोबर स्थानिक वर्तमानपत्रातूनही मी निवेदने दिली होती. या सर्व प्रक्रियेला भरघोस प्रतिसाद मिळाला असेच म्हणावे लागेल. दरवर्षी, साधारणपणे ६० कवींचा सहभाग यात असायचा. मात्र, यावर्षी एकूण १०४ कवींनी त्यांच्या 'प्रेम' या विषयावरच्या काव्यरचना पाठविल्या.
रंग आणखी मळतो आहे
रंग आणखी मळतो आहे
रंग सुगीचा छळतो आहे
वसंतही हळहळतो आहे
गारपिटाचे गुलाबजामुन
डोळ्यामध्ये तळतो आहे
मावळतीचा तवा तांबडा
भातुकलीला जळतो आहे
पडतो आहे, झडतो आहे
तरी न मी ढासळतो आहे !
भोळसटांच्या वस्तीमध्ये
घाम फुकाचा गळतो आहे
बेरंगाच्या रंगामध्ये
रंग आणखी मळतो आहे
ऐलथडीच्या सुप्तभयाने
पैलथडीने पळतो आहे
'अभय'पणाचा वाण तरी पण;
पाय बावळा वळतो आहे
रंग सुगीचा छळतो आहे
वसंतही हळहळतो आहे
गारपिटाचे गुलाबजामुन
डोळ्यामध्ये तळतो आहे
मावळतीचा तवा तांबडा
भातुकलीला जळतो आहे
पडतो आहे, झडतो आहे
तरी न मी ढासळतो आहे !
भोळसटांच्या वस्तीमध्ये
घाम फुकाचा गळतो आहे
बेरंगाच्या रंगामध्ये
रंग आणखी मळतो आहे
ऐलथडीच्या सुप्तभयाने
पैलथडीने पळतो आहे
'अभय'पणाचा वाण तरी पण;
पाय बावळा वळतो आहे
काव्यरस
ही अता विद्रोह करते कातडी
दावती नुसता उमाळा बेगडी
माणसे आतून सारी कोरडी
पाय मातीचेच सार्यांचे इथे
चाल उंटाचीच होती वाकडी
पोट छोटे भूक मोठी फार ही
ही पहा कुरकूर करते आतडी
थोर समतेचा तुझा दावा खरा
मारती ही हात आता मापडी
तू जरी आजन्म करशी भिक्षुकी
रे तुझी झोळीच राहे तोकडी
छान तू हा न्याय सार्यांना दिला
वाजतो हा दंड नुसता लाकडी
जी मघा मिरवीत गेली पालखी
त्यात होती जातधर्माची मढी
हे कसे स्वातंत्र्य आम्हाला दिले
ही अता विद्रोह करते कातडी
पापपुण्ये मोज सारी तु पुन्हा
थरथरु दे ही जीवाची पालडी
वस्त्र आत्म्याचे नव्याने वीण तू
ने भरोनी देह अमुचे कापडी
डॉ.सुनील अहिरराव
मी परदेशी
कुणास मी का केले अवघड ?
प्रेमच अनगड काय करू ?
येता जाता
दिसते माया
रुधिर उसळते
जाग जराशी
हृदयापाशी
काजळ राशी
वादळ उठते
हलते तारू
कोण कुणाचा
नसते काही
झुरते काया
रचने पायी
बचनागी हे
मंथन अवघे
दैव दानवी
घुसळे मेरू
मीच भुकेला
एकांताचा
स्वप्न पहातो
रात्र जाळतो
हसतो रडतो
चितारतो ते
शब्दांमधुनी
सापडलेले
तुटके फुटके
शब्दच वेडे
एकल कोडे
सुटते वाटे
पण सुटते ना
कविता होते
गूढ वेदना
खरी न खोटी
वाट खुंटते
दरी वाढते
शिल्लक उरते
शून्य पोकळी
अर्थ निरर्थक
मी परदेशी
…………. अज्ञात
काव्यरस
भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी
आलो रे धावून खास तुझ्यासाठी
भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी
करेल इच्छा पुरी चंद्रभागा काठी
कर कटेवर ठेवुनी उभा हा जगजेठी ॥१॥
देईल सारे तुला जे सर्वांनाच हवे
रोज रोज खाशील नवनविन मेवे
सर्वांच्या आनंदाला उधाण यावे
दही दुध तूप लोणी सर्वांनी खावे ॥ २॥
घेत असतो मी अधेमध्ये परीक्षा
नापास झाल्यास देतो मोठी शिक्षा
वेळ आली तर मागावी लागते भिक्षा
अडल्याला करावी मदत ही खरी दीक्षा ॥ ३॥
Taxonomy upgrade extras
भजन - महागाई
सिनेमाच्या, अल्बम च्या गाण्यांच्या मीटरवर बसवलेली भजनं हा संगीताचा एक विशिष्ट प्रकार म्हणावा लागेल. त्यात फूल न फुलाची पाकळी म्हणून ही माझी एक प्रामाणिक भर.
तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही
अजून नात्यात या पुरेसा तणाव नाही
सिधासिधा खोल घाव आहे , बनाव नाही
जरी तुझी धारदार हुकुमी कट्यार आहे,
छलकपटाचा तुला पुरेसा सराव नाही
किती दयाळू, महान आहेस तू खरोखर
तुझ्यासमोरी इथे कुणाचा निभाव नाही!
तुझ्या कृपेचे कधीच आकाश सोडले मी
मला उमगले कुठेच माझा पडाव नाही
अशीच ये तू कधीतरी भेटण्यास मजला
तुला पुरेसा अजून माझा लगाव नाही
हवी तशी उत्तरे तुझी दे ,तुझ्या कलाने
तुझ्या खुशीचा सवाल आहे, दबाव नाही
अखेर मरणात हात माझ्या तुझाच होता
तुझ्या गुन्ह्याचे अजून कोठेच नाव नाही
डॉ.सुनील अहिरराव
सुराई
'सुराई'
अजून देहातुनी उसळते अजाण शाई
अजून आत्म्यास गाज देते तुझी रुबाई
अजून तेजीत बाग आहे कळ्याफुलांची
अजून श्वासातली पुरेशी नसे कमाई
अधीर गात्रात रात होते पहाटताना ...
अजून तृप्तीत लोळते ही तुझी रजाई
मनात माझ्या तुझा विलासी महाल झुलतो
परी तुझ्या अंगणात मजला असे मनाई
हरेक पेल्यात कैफ अजुनी जुनाच आहे
भरुन घे तू नव्या दुखाने नवी सुराई !
अजून झाले न नाव माझे इथे पुरेसे
अजून पुरती नसे म्हणावी तशी बुराई
डॉ.सुनील अहिरराव
मिसळपाव