Skip to main content

कविता

मायमराठी

लेखक सार्थबोध यांनी गुरुवार, 27/02/2014 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द अलंकार भंडार, मधाळ अमृतवाणी वदे सुमधुर सिद्ध ऐसी, भाषा माझी मराठी ll १ ll वेदतुल्य मंगल प्रार्थना, आरती ईश्वराची दंड थोपटे गर्जुनी, आरोळी हो पोवाड्याची ll २ ll सुबक डौल लावण्याचा, शृंगारते लावणी तरल मनीच्या भावना, भावगीती रंगती ll ३ ll सजग करण्या जना, बोले फटका झणी ठेचुन काढी दुष्ट रुढी, भारुड कीर्तनातुनी ll ४ ll अभंग कवणे जागविती, सदभाव भक्ती वर्णन करितो विश्वाचे, मुक्तछंद पक्षी ll ५ ll शब्दांची तीक्ष्ण पाती, दंडिते शत्रू लेखातूनी संपन्न सुबत्ता शास्त्र, झळके व्याकरणातूनी ll ६ ll परंपरा नाट्यपदे नाटके, साहित्य श्रीमंती ईश्वर स्वये प्रगटे, ऐकून

मराठी भाषा

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 26/02/2014 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
ममराठी भाषादिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी भाषा भाषा किती छान आपुली भाषा किती छान महाराष्ट्राची शान आपुली भाषा किती छान संत महत्मे होऊन गेले मराठी ग्रंथ लिहुन गेले आपुल्यासाठी ठेऊन गेले अद्वयताचे ज्ञान 'आपुली भाषा किती छान कवी लेखक अनेक झाले मराठी साहित्य लिहुन गेले आपल्यासाठी ठेऊन गेले शब्दरत्नांची खाण आपुली भाषा किती छान तिला बोलावी तशी ती बोलते तिला ओळवावी तशी ती वळते परप्रांतीयांना ही सहज कळते वाटे मला अभिमान आपुली भाषा.... माय लेकराचे नाते आपुले ह्रदयामध्ये त्याला मी जपले नाजुक शब्दांमध्ये गुंफले चरणी ठेऊन ध्यान आपुली भाषा किती छान बी डी वायळ

श्वास लय

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 26/02/2014 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
स्फटिक निर्मळ स्वर अभंग रोम रोमी चाळ ते दूर कोठे गाव माझे अंतरीचे चाळते श्वास लय; अदृष्य सारे लुप्त शब्दी वेधते चांदण्या गर्दीत कांही हरवलेले शोधते त्या आभा भासात अजुनी संभ्रमी मन धावते गोडशी हुरहूर अंगी; स्वप्न नादी लावते पाश मय रागा-स्वरांचे सोसलेले घाव ते चंदनी आनंद त्यांचे बाळकोषी दावते …………… अज्ञात
काव्यरस

अस्वस्थता अस्वस्थता

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी शुक्रवार, 21/02/2014 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
अस्वस्थता अस्वस्थता अस्वस्थता अस्वस्थता राजकारण्यांच्या चालण्यामुळे राजकारण्यांच्या चालींमुळे त्यांनी त्यांच्या सोयींसाठी चालवलेल्या राजकारणांमुळे अस्वस्थता अस्वस्थता दिशाहीन आंदोलनांमुळे चारित्र्यहीन आंदोलकांमुळे त्यांनी त्यांच्या सोयींसाठी चालवलेल्या चळवळींमुळे अस्वस्थता अस्वस्थता हरवलेल्या मित्रांमुळे रोज भेटणार्‍या शत्रुंमुळे त्यांनी त्यांच्या सोयींसाठी जुळवु पाहिलेल्या नात्यांमुळे - कवी म.ना.दे.

'पालखी'

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 21/02/2014 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
'पालखी' कुणी मोल केले, कुणी मापले भल्या भाविकाने तुला कापले घडावीत रांगेतुनी दर्शने जरी चोरट्याने खिसे नापले उठे ही सुखाची तुझी पालखी उरे भर्जरी दुःख आपापले तुझी आसवे लागली सार्थकी तुझे त्याग नोटांवरी छापले नसे आज चिंता तुझी जीवना पहा दुःख हे छानसे रापले ! डॉ.सुनील अहिरराव

कश्या कश्याला मुकलो ते...

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 21/02/2014 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
आठ दिवसानी टुर वरुन घरी आलो.. समोर तु उभी प्रसन्न वदना. मोकळा केश संभार. काजळ कोरलेले आतुर नयन आठ दिवस ऑफिस कामाशिवाय काहिच सुचत नव्हते.. तुला पाहिले अन उमगले. कश्या कश्याला मुकलो ते...

बसा की एकदा खुर्ची वरती

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 17/02/2014 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १५.१२.२०१३ ला ही कविता भावी मुख्य मंत्री साठी लिहली होती. दिनांक २८.१२.२०१३ ला श्री केजरीवाल मुख्य मंत्री बनले. त्यांचे मुख्य मंत्री बनण्याचे आणि वनवासी होण्याचे भाकीत खरे ठरले. च्यायला आपण बी जोतिषी झालो. कसला राव विचार करता बसा की एकदा खुर्ची वरती तोडा आकाशीचे तारे पूर्वा हौस जनतेची. विजेची बिल कमी करा मुफ्त मध्ये पाणी द्या दाखविलेले स्वप्न जनतेला तोडू नका हो राव तुम्ही. पुकारते ही खुर्ची कसी होऊ नका हो वनवासी औलीयाची श्रापित वाणी करू नका हो पुन्हा खरी. औलिया: निजामुद्दीन औलिया "दिल्ली दूर आहे- असा त्यांनी बादशाहला श्राप दिला होता". तो खरा ठरला.
काव्यरस

निर्मोही

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 17/02/2014 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
अंशात तुझ्या वसलो मीही वाहिले हवे ते निर्मोही समिधा सुखदा अक्षत ग्वाही आतंक मनी कुठला नाही मन अबोलसे स्वर विकलांगी प्रतिमा न कधीही एकांगी ध्वनि छेडतसे सम प्रतिध्वनी हृदयात वलय लय शतरंगी लाटेस काठ हळवा म्हणुनी खेळते किनाऱ्यावर पाणी भारती ओहटते ओघळुनि डोहात माणकांच्या खाणी ………अज्ञात
काव्यरस

घाव

लेखक लाडू यांनी सोमवार, 17/02/2014 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यांतुनि तयांच्या त्यांचेच भाव होते हातात गोंदलेले त्यांचे न नाव होते लटकेच हासणे अन् खोटे मुरडणे ते अंगात भिनलेले सगळे बनाव होते शुक् शुक माझ्या कानी चारीकडून आली मी एकटाच होतो त्यांचेच गाव होते हातात हात कोणी घेऊन जात होते जणु आपसांत त्यांचे जमले ठराव होते शरिरातल्या भुकेचा बाजार पाहताना का वेदना निघाली, माझ्या न घाव होते
काव्यरस

नाते आपुले तसेच आतून...

लेखक आनंदमयी यांनी रविवार, 16/02/2014 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
जसे फुलावे रंग साजिरे श्यामनिळ्याच्या मोरपिसातून मुके तरी मोहाहुन मोहक नाते आपुले तसेच आतून.. मी मुरली तू सूर खुळासा मी यमुना तू माझी खळखळ तू कविता, मी तुझ्या आतली आर्त खोल दडलेली तळमळ तू कान्हा मी अधीर राधा राघव तू मी तुझी मैथिली नर्तक तू मी नुपुर नादमय छुमछुमणारे तुझ्या पाऊली भेट घडे या वळणावरती अनोळखीशी आज नव्याने वर वर सारे परके तरिही जुळले अंतर जुन्या दुव्याने परस्परांतच परस्परांनी पुन्हा नव्याने जावे गुंतून अनोळखी देहात नांदते नाते आपुले तसेच आतून.. © अदिती जोशी