Skip to main content

कविता

रसिका

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 28/01/2014 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
गुंतती खुणा गाठती रेशमी धागे हृदयात रुधिर रसिकाचे जेंव्हा जागे चांदणे टिपुर आवसेचे निर्मळ अवघे चंद्रास न माहित पण; ते पडद्यामागे श्वासांचे प्राक्तन; सुखवी प्रेम नि माया चिरतरुण ठेवते अभिलाषा; मन-काया जन्मास सोबती गोत; खेळ खेळाया शोधण्या किनारा लाट हवी उसवाया प्रेरणा कामना उचंबळाचे कारण ऋतु गंध रंग रस चैतन्याचे सारण अभिसरण नसे ते; रुक्ष पोरके अंगण दशदिशा चराचर अस्वादास्तव आंदण ………………… अज्ञात
काव्यरस

"परिस्थिती"

लेखक अमेय६३७७ यांनी शनिवार, 25/01/2014 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
(सुनीत: वनहरिणी मात्रावृत्त) बर्फावरती झुंजूमुंजू थंड शांतता करे पहारा  शेकोटीची ऊब सोडता श्वास गोठतो, फुले शहारा  दूर कुठेसे शहर जागते आखडलेले पाय मोकळे पुन्हा एकदा सळसळती जे काल श्रमाने गाढ झोपले  बर्फावरच्या 'ह्याच्या' हाती बंदुक चमचमणारी काळी तंबूमधली झोप क्षणाची अंधुक सीमा घाली हाळी  शहराकाठी 'त्याची' जागा गाडी गाठायाची घाई  वेळ साधणे सूत्र दिनाचे वेगासंगे वाहत जाई  काही तत्त्वे थोड्या निष्ठा एकाचे जगण्याचे इंधन  कर्तव्याचे पाश टाकती दुसऱ्याच्या असण्याला बंधन  काय माहिती कुठली गोळी करील अवचित सावज 'याचे' तसेच 'त्याचे' जगणेसुद्धा ताणामधल्या सुप्त

बंधने

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 23/01/2014 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
ओठांस बंधने हृदयाची हृदयास प्रेरणा प्राणाची प्राणास गती मन-शरिराची शरिरास कुंपणे काळाची काळास न आहे गोत कुणी वय चिर ओघळणारे पाणी अंतास अथांग जलाशय पण त्यासही किनार्‍याची करणी गुदमरे प्रयोजन जन्माचे ईप्सीत न कळते जगण्याचे प्रणयात म्हणे क्षणशांती परि सागरास अथक अशांती ………………. अज्ञात
काव्यरस

समुद्र......!!

लेखक फिझा यांनी मंगळवार, 21/01/2014 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्र......!! किनाऱ्यावर भेटतात सगळे जरी … तुझा एकटेपणा कुणा दिसला का कधी आकाशाचा रंग लेऊन घेतोस तुझा रंग कधी पहिला का कुणी हसतोस फक्त लाटांमध्ये ..... तू रडतोस खोल आत कुठेतरी ………. ! रोज तसाच दिसतोस तू ,… अथांग… प्रत्येक एकट्याला अरे , तुझाच संग …. तुझ्या लाटांबरोबर ओठावरचे हसू … तुझ्या क्षितीजाबरोबर डोळ्यातले आसू …. पायाखालून निसटलेल्या रेतीचा आधार शेवटी … हसतोस फक्त लाटांमध्ये …तू , रडतोस खोल आत कुठेतरी ………. रोज नव्याने जगतोस तू ,… एकटा सूर्याचा दाह झेलतो तू असा ....

कॉफीचं कॅथार्सिस अर्थात चिडचिड-ए-सोमवार

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 20/01/2014 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
अरबट कॉफी चरबट कॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी || डोक्याची ग्रेव्ही, इनबॉक्सचं मटण | कॅफेनची किक, बुळबुळीत बटण | पहिला ढकलतोय, चारच बाकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||१|| परीट घडी, टायचा बावटा | आकड्यांची उसळ, एक्सेल पावटा | बॉस निकम्मा, टीम पापी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||२|| पायांची घडी, मांडीवर पोट | अप्रेझल मीटिंग, बोका भोट | परफॉर्मन्स मदिरा, रेटिंग साकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||३|| गारगिट्ट पोळ्या, बकाबकाबका | सिग्रेटचा धूर, फकाफकाफका | पगार, पीएफ, बोनस टॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||४||

निरलस

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 20/01/2014 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
सुकते झडते पुन्हा उगवते भावुक ओले नाते अवनीलाही कळते ना कोशात कसे तण अंकुरते स्पर्श खुणेचा थेंब एक , गंधाळ : कुपीतुन उलगडते रोम रोम रंध्रातुन अलगद अंतरातले दरवळते कुठेच ना शब्दांचे जोखड मुक्यानेच सारे घडते झुळुक वाहते अशीच निरलस अंग अंगणी शहारते ………………. अज्ञात
काव्यरस

पारा

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 17/01/2014 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
...पारा तुझ्या पावलांची इथे खुण अजुनी पडे पावलांना तुझी भुल अजुनी नभी कल्पनेच्या उन्हाचा धुराळा तुझ्या सावलीला उरे प्राण थोडा दिशांच्या उरी वादळाची कहाणी उरे जन्म आता दिव्याच्या ठिकाणी फुटे प्राण उल्केसम वेदनेला फुलांच्या उरी दाटतो घाव ऒला तुझा शब्द प्राणातुनी साद देतो जुन्या मैफिलीची जुनी य़ाद देतो तुझे ऒठ हळव्या मदाच्या मशाली रुधीरातुनी वाहते तप्त लाली उङो सप्तरंगी निशेचा धुराळा असा चंद्र श्वासातुनी माळ थोडा तुझे गात्र॑ गात्र लपेटून घेतो तुझे भास श्वासात माळून घेतो मिठीने सरावा युगांचा दुरावा इथे ज्न्म अवघा फुलांचा उरावा फिरे कालचक्रावरी उष्ण पारा .. उरे फक्त थोडा मिठीचा किनारा ड

मन अंतर्मन

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 17/01/2014 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
उगवतीस क्षितिजावर हसते दिसते लोभस मोठे मावळतीला पुन्हाहि हसते पण ते खोटे खोटे दोन ध्रुवांची विलग अंतरे सलग न वाटे कोठे दिशा चुम्बकांच्या ऐशा अंतरात साटे लोटे कुणास ना ठाऊक कसे हे काळिज धडधडते क्षण एका भेटीस्तव मन अंतर्मन धडपडते ……………………… अज्ञात
काव्यरस

सैनिक

लेखक अमेय६३७७ यांनी सोमवार, 13/01/2014 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा संपल्यावरही केबिनमध्ये  दिवा जळता ठेवून  योजना आखत राहणारे मुख्याध्यापक  कलत्या दिवसावेळी दमून येऊनही 'पुस्तक हवे' म्हणल्यावर  उत्साहाने सायकल काढणारे बाबा  तापाने फणफणत असूनही  थंडीत चार वाजता उठून  अभ्यासाआधी चहा देणारी आई स्वत:ची दिवाळी मनाआड टाकून  माझ्यासारख्या अनेकांना  उत्सवासाठी घरी नेणारा एसटीचालक महायुद्धाच्या पटावरचे लक्षावधी छोटे सैनिक  कदाचित असेच असतील नाही?…  जीव विझू आला तरीही  शेवटच्या श्वासापर्यंत….  मनापासून कर्तव्य बजावणारे !  -- अमेय

प्रीत खुळी

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 12/01/2014 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक हुंदका कुशीतला निश्वास सांडला आकाशी वादळ विरले उरले लाघव हिरवळले चंद्रापाशी उलगडल्या सावल्या नाचल्या रास जणू हृदयी कोषी अवसेकाठी पुनव रंगली ना कळले अवचीत कशी कळा मिळाल्या ऋतुपर्णांना गंध कळ्यांना ह्या वेळी मेघ दाटल्या नभओळी अंगणी सणाची रांगोळी वलय शहारा अंकुरला ओठांवर खळखळ ओघळली जातकुळी ही प्रीत खुळी रुधिरावर अलगद पागोळी ……………………… अज्ञात
काव्यरस