Skip to main content

कविता

ऋण

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 07/02/2014 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
भांबावतो कल्लोळ. माझ्या उरात दडू पाहतो. पाहता पाहता नभही अलगद झाकोळून येतं. आपसूक दूरस्थ होणारे किनारे पाहताना, भरतीचा ठाव सुटतो... तुझा माझा मांडलेला पसारा पाहते. त्यातून स्वत:ला निर्लेपपणे बाजूला काढायचं ठरवते. हळूच एक प्रश्न डोकं वर काढतो, विचारतो, कधी चुकतं करशील तुमच्या नात्याचं देणं? परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं, ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...
काव्यरस

चिमुटभर

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 06/02/2014 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
हूल हीच चाहूल आजवर तीच ओळखीची आळवावरचा थेंब जसा अस्पर्श उजागर त्याची एकेक शहारा आस तयाला ह्या हृदयीची त्या हृदयी झुरे सावली वाटेवरती खंत तिला रात्रीची रोमांकित अनुबंध पोरका धग अशीच जराशी फुंकर हळवी भेट चेतवे निखाराच वैशाखी संधीवरची दूर क्षितीजे स्मरणे आभासाची सुंभ जळाले पीळ खळे ना राख चिमुटभर बाकी ………………अज्ञात
काव्यरस

एक गीत

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 06/02/2014 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार रसिक आणि कलाप्रेमी मि.पा.कर, आज बर्‍याच दिवसांनी काही लिहित आहे.मूळ गाणे हिंदी आहे , त्यावरून - अर्थ तोच ठेवून लिहिण्याचा प्रयत्न केलाय.पाहुया कुणी ओळखतय का मूळ गाणे. ना कुणाचा मी ना कोणीच झाले माझे इथे, परके तर जाऊद्या, सख्ख्यांचा आधार नाही जिथे ! एरवी लोक जिथे रडकेही जिणे जगती की, अन् माझ्या हसण्याचा ही लागला निभाव कुठे? हाय मी काय असे प्रेमाखेरीज मागितले? तेव्हढेही का न समाजास झाले मान्य इथे? बघ किती तारका चमचमती तुझ्या ठायी नभा, ना कधी न्हायले हे भाग्य चांदण्यात इथे! पुढील कडवे मात्र नवीन आहे बघ तुझा हात फिरे, आंधळ्यास ये दृष्टी, ये फिरुन परतुनी, डोळ

संत मीराबाईची विराणी

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 03/02/2014 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
नाते जोडले नामाशी, कधीच मी तोडणार नाही|| पिवळ्या पानावानी दिसे मी जरी, नसे हा पंडूरोग| चोरून करीते उपवास, देईल रामभेटीचे योग|| पकडून माझी भुजा, वडिलांनी वैद्य बोलवला | कळे ना त्या मुर्खाला, हृदयात माझ्या पीळ पडलेला|| जावो वैद्य आपुल्या घरी, माझे नाव काढू नको| विरहाने जळालेली मी अशी, औषध मला देऊ नको|| अंगावरील मांस उतरले, उरला हाडांचा सापळा| बोटाच्या अंगठीत घुसेल, झाला बारीक दंड आगळा|| राहून राहून पापी कोकीळ, समोर प्रियाचे नाव आळवतो| विरहात सांभाळते स्वःताला, प्रियासाठी जीव जाळवतो||
काव्यरस
Taxonomy upgrade extras

पांडुरंग

लेखक आतिवास यांनी सोमवार, 03/02/2014 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
बेल वाजली.. ’आत्ता या वेळी कोण?’ चडफडत दार उघडले, तर समोर पांडुरंग - मला म्हणाला, “बोल". कटेवर हात नव्हते, पायाखाली वीट नव्हती, चंदनाचा टिळा नव्हता, भोवती भक्तीचा मळा नव्हता. मी म्हटले, “या, बसा. सुखदु:खाच्या गोष्टी बोलू हवे तर, पण उगीच दांभिक देवत्त्वाचा आव आणू नका.” “हे तर लई बेस झालं" म्हणत तो विसावला, आरामखुर्चीत बसून गॅलरीतून दिसणारा आकाशाचा तुकडा न्याहाळताना हरवून गेला. त्याने मला प्रश्न विचारले नाहीत, मीही नाही. त्याने मला उपदेश केला नाही, मीही नाही. त्याने स्वत:भोवती एक अदृष्य भिंत रचली, मीही तेच केले. माझ्या सहवासात त्याने स्वत:चे एकाकीपण मनमुराद जपले - मीही तेच केले. तरीही आम्ही

अमेठीची शेती

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 03/02/2014 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
अमेठीची शेती

सांगा कशी फ़ुलावी, तोर्‍यात कास्तकारी
वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी

देशात जा कुठेही, भागात कोणत्याही
सर्वत्र सत्य एकच; तोट्यात कास्तकारी!

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

कांदा हवा गुलाबी, स्वस्तात इंडियाला
जावो जरी भले मग, ढोड्यात कास्तकारी

पोसून राजबिंडे; आलू समान नेते
उत्पादकास नेते, खड्ड्यात कास्तकारी

सत्ता सुकाळ शेती, बारामती-अमेठी

'अद्वैत'

लेखक drsunilahirrao यांनी रविवार, 02/02/2014 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
'अद्वैत' खांद्यावर रूळते कुंतल बट नादान ओठावर हलके स्मीत : कळ्यांचे रान ! क्षण एक अडकतो मत्स्य जसा जाळ्यात नयनातुन उसळे इंद्रधनुष्यी बाण ! जणू संगमरवरी आरस्पानी कात वक्षात धपापे चंद्र नवा बेभान मनी बधीर भुंगा : भरकटतो विरक्त रात्रीस कवळते आसक्ती वैराण ! नागीण विराजे लवलवती देहात रक्तातुन तुटती तीव्र विजेचे ताण ! श्वासातुन उसळे राग असा बेफाम रात्रीला छळते दूर उषेचे गान बेशीस्त र्रुतुंच्या उजाड भिंतीवरती अस्वस्थ उगवती लवलवती हे प्राण । गात्रात विरघळे गात्र असे बेफाम देहात विजेचा लोळ उसवतो त्राण । अंधार युगांचा असा झळाळुन येतो, प्रीतीत निथळते अद्वैताचे दान। डॉ.

चांदणचकवा

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शनिवार, 01/02/2014 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
काट्यांत हरवली वाट संदिग्ध पावले माझी वळणावर एका अवचित अबोल होऊनी गेली.... वस्ती ही आता दूर वळ्ण्याचा नाही धीर एकाकी निर्जन रानी हे श्वास ही होती तीर.... जगण्याचे वादळ शमले मृत्युची ओढ न उरली निस्तब्ध शांत या रात्री ओझेच सावली होई.... भिरभिरतो रानी आता दिशाहीन जणू रावा जगण्याच्या आवर्ताला मरणाचा चांदणचकवा... पद्मश्री चित्रे (फुलवा)
काव्यरस

मदगन्ध

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 31/01/2014 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
ओठावर प्रणयी ओल स्नेहमय शब्द जिव्हाळ्याचे ओषाड घनातिल जणू धरेवर अगतिक वळवाचे सढळ समागम तृप्त विसावा खेळ ऐहिकाचे मोहरलेले अंग अंग उधळी मदगंध मनाचे ……… अज्ञात
काव्यरस

पांढर धुकं काळ धुकं

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 28/01/2014 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज नेहमीप्रमाणे सकाळी ७.३० वाजताची ७४० घेतली. रस्त्यावर धुकं पसरलेलं होत. दिल्ली केंटचा भागात वस्ती विरळ असते, त्या मुळे रस्त्यावर धुकं ही जास्ती दाट होत. धुक्याचा रंग जवळपास काळाच होता त्या मुळे २०-२५ मीटर पुढचे दिसत नव्हते. एक प्रकारची उदासी वातावरणात पसरलेली होती. एसी बसच्या खिडकीतून धुकं बघता-बघता बालपणाचे दृश्य डोळ्यांसमोर तरंगले. धुकं तेंव्हा ही पडायचं पण रंग मात्र पांढरा शुभ्र असायचा. धुक्याच्या परद्याला भेदून सूर्याची सोनेरी किरणे अंगावर पडायची तेंव्हा मन प्रसन्न व्हायचं. कधी-कधी धुक्यात सप्तरंगी इन्द्रधनु ही दिसायचे. पण आज सूर्याची सोनेरी किरणे ही काळपट वाटत होती.
काव्यरस