Skip to main content

कविता

मुख न लपवून जगा

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 09/05/2012 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
मुख न लपवून जगा, आणि न मानही झुकू द्या की दुःख कोसळो कितीही, तुम्ही हसून जगा की अंधारात बुडून, तारे नाहीसे न होती अंधेर्‍या रात्रीच्या हृदयी, दिवे उजाळा, जगा कुणा पडावावरी, जीवन थांबू ना शकते दरेक पडावा नंतरही, पुढे मार्ग चला न जाणे कोणता क्षण, मृत्यूच्या सुपूर्त असेल क्षणोक्षणींच्या सुखांना, उरी धरून जगा हे मराठी शब्द माझेच आहेत. मूळ हिंदी शब्द कुणाचे आहेत, ते तुम्ही ओळखालच!

" तो एक पदर मायेचा ... "

लेखक विदेश यांनी बुधवार, 09/05/2012 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
तो एक पदर मायेचा आधार किती आईचा वादळात सामर्थ्याचा भयमुक्ती उपदेशाचा नजराणा संस्काराचा संदेश शांत जगण्याचा रागास शांत करण्याचा मस्तकास थापटण्याचा तो दर्शक सन्मार्गाचा तो रक्षक कल्याणाचा तो पूजक सौंदर्याचा
काव्यरस

आनंदास मुकतो मतलबी दुष्ट चेहर्‍यांच ऐकुन.

लेखक निश यांनी मंगळवार, 08/05/2012 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
कळायलाच हव्या काही गोष्टी पण त्या कधी कळतच नाहीत. कळल्या अस वाटतानाच , खरच त्या कधीही उलगडतच नाहीत. खुप पैसा कमावुनही अजुन अजुन पाहीजे हा हव्यास का केला जाई ? टाळुवरच लोणी ओरबाडायची इथे ज्याला त्याला सतत घाई. बहुतेक खरा आंनदही विकत असावा बाजाभावात. म्हणुनच टाळुवरच लोणी खाउनही आनंदापेक्षा दु:खी चेहरेच दिसतात प्रत्येक शहर व गावा गावात. खरा आनंद असतो मनाच्या उदारतेवर टिकुन दुसर्‍यांच्या आनंदात स्वताचा आनंद मानुन. पण आपण आनंदास बसतो घालवुन अवती भोवतीच्या मतलबी दुष्ट चेहर्‍यांच ऐकुन. आनंदास मुकतो मतलबी दुष्ट चेहर्‍यांच ऐकुन.

होत आहे विश्व माझे...

लेखक चैतन्य दीक्षित यांनी मंगळवार, 08/05/2012 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा काळोख माझा आजचा अन् हा प्रकाश होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश || अंतरीचे सूख माझ्या आज झाले बोलके, आणि माझे दु:ख आपोआप झाले पोरके गवसलो माझा मला मी, भोगले मी त्या क्षणास होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||१|| काळज्या होत्याच खोट्या आणि भीती ती खुळी जे जसे दिसते जगाला ते तसे नसते मुळी कळुन आले, जाणिवेने बघत गेलो आसपास होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||२|| काल नव्हतो मोकळा मी, आज नाही बद्ध मी कालच्याइतकाच उरलो आज आहे शुद्ध मी बंधने वा मोकळेपण हे मनाचे फक्त भास होत आहे विश्व माझे, मीहि त्याचा सावकाश ||३|| जेवढा अव्यक्त आहे तेवढा प्रत्यक्ष मी मीच माझी सर्व कर्मे आ

अंदोलने

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 04/05/2012 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
पाहून कंठ दाटे लागे तरंग भंगू काठांस पापण्यांच्या जळपात पाहि लंघू हे अस्त्र नयनबाणी शब्दात काय सांगू घायाळ वृश्चिकाचे नांगीत वीष पंगू ओठांस माणकांची आलेपणे फिरंगी गाली गुलाबमाया स्मित रेशमी सुरंगी काट्यास आकळे ना ममता उलाल अंगी अंदोलने सुखाची व्यापून अंतरंगी अस्पर्श गोत न्यारे गेले विरून सारे चहुओर रजतकांती आनंदघन पसारे हळव्या सुरात हलके गंधर्वगीत भारे गंधात जाणिवांच्या अस्तित्व विलय वारे ............................अज्ञात
काव्यरस

एक रस्ता असाही ...

लेखक निश यांनी गुरुवार, 03/05/2012 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
एका गजबजलेल्या रस्त्यावर एक पोर भिक मागत आपल्याकडे, भुकेने व्याकु़ळ असुनही आपल्या नजरेतील हेटळणीचा विखार त्यालाही उमजतो व तो रडवेला होतो.

का रे असा अबोल तू

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 02/05/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
20080414 का रे असा अबोल तू तीः का रे असा अबोल तू, काहीतरी तू बोल ना । शब्दांना तुझ्या तहानले, मनातले काही बोल ना ॥ तोः तू सरस परी कुठे, कुठे मी निरस रूक्षसा । सुरस कितीही बोललो, रुचेल का तुझ्या मना ॥ तीः स्फटिक जणू तुझे विचार, स्पष्ट किती तुझे आचार । मी गुंतते गुंतते सदा, शब्दांच्या तुझ्या आवर्तनांत ॥ तोः वळत्या केसांच्या महिरपी, मीन अक्ष बोलके । जिवणीच्या मोहक हरकती, सारे कसे लावी पिसे ॥ काही गीते स्वतःतच एक नाद घेऊन येत असतात. ती इतर गीतांच्या चालीत म्हणता येतीलही. मात्र ह्या कथेत स्वतःची एक सादही आहे. ही कविता माझीच आहे. हा कुठल्याही गीताचा अनुवाद नाही.
काव्यरस

पानी आनाया जावू कशी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 29/04/2012 06:17 या दिवशी प्रकाशित केले.
पानी आनाया जावू कशी हांडा घेतला बादली घेतली घेतली ग बाई मी कळशी पन पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||धृ|| दुसरी स्त्री: का गं आसं काय म्हनतीया? आगं विहीर कोरडी, हापसा तुटका नाला भाकड, नदी सुकी ग बाई नदी सुकी मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||१|| दरवर्शाची ही रडगानी पावसाळ्यात म्होप पानी हिवाळा सरता अंगावर काटा पान्यासाठी लई बोभाटा प्यायाला नाही पानी आन कशी करावी सांगा शेती मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी?
काव्यरस

एक उनाड दिवस... (अष्टाक्षरी)

लेखक वेणू यांनी शुक्रवार, 27/04/2012 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
एक उनाड दिवस चल सख्या घालवूया, नको काटे घड्याळाचे राना- वनात फिरूया! एक उनाड दिवस घालू पाखरांना साद, जरा अंगणात त्यांच्या चल रमूया निवांत! एक उनाड दिवस नको पैसा व्यवहार, मन रिक्त होता थोडे येते नात्यांस बहार.. एक उनाड दिवस नको कर्तव्य नि पाश मागे टा़कू कवडसे पाहू मोकळे आकाश!! अश्या उनाड दिवशी भर उन्हात भटकू, मृगजळे दिसताच थोडे फसू, थोडे हसू! पाहू सांज कलंडती रंग जुनेच नव्याने, येवो मन मोहरून मरगळ विझल्याने! असे मनाजोगा वेळ मग हळूच सरावा, चित्त, पुन्हा ताजे होता नवा दिवस गुंफावा! नवा दिवस गुंफावा... -वेणू ब्लॉगः वेणूसाहित्य http://venusahitya.b