Skip to main content

कविता

आता कंटाळा आलाय....

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 09/04/2012 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
आता कंटाळा आलाय मोठं होऊन जगण्याचा उगाच मक्ख चेहऱ्याने जगभर वावरण्याचा कधी वाटत आपलेही लाड कोणीतरी करावेत अन भीती वाटल्यावर हळूच कुशीत घ्यावे कधी दुडक्या चालीने रान भर हुंदडाव तर कधी भर पावसात चिंब भिजावं कधी कडक उन्हात बर्फाचे गोळे खावे वाट दिसेल तिकडे वेड्या ओढीने पाळावे कधी पोटात दुखतंय सांगून शाळेला बुट्टी मारावी अन बाबांच्या भीतीपोटी आईशी सलगी करावी कधी जेवताना चिऊ काउचे घास कोणी भरवावे मग झोपताना काका दादाबरोबर घोडा घोडा खेळावे नेहमीच आपल्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं म्हणून काहीही करावं अन मनासारखा नाही झाल तर फुगून बसावं आता अपेक्षांचे ओझे वाहताना स्वतःला रोज्गाड्याला जुंपून बस
काव्यरस

ग्रेस

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 08/04/2012 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
मी महाकवी दु:खाचा प्राचीन नदीपरि खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल स्वत:च्या संपूर्ण मालकीची आणि केवळ स्वत:ची अशी अत्यंत सुंदर भाषा, लयकारीचा जीवघेणा नखरा आणि प्रतिमांची गूढ आणि नितांत रम्य मांडणी म्हणजे ग्रेस. ग्रेसनी कवितेला दिलेल्या योगदानाप्रती अत्यंत हार्दिक कृतज्ञता व्यक्त करून; सृजनाची प्रक्रिया, सृजनातली दुर्बोधता आणि ग्रेसच्या कवितेतून आपण काय घेऊ शकतो हे विशद करणारा हा लेख सादर करतो. ______________________________ सृजनाची संपूर्ण प्रक्रिया अशीये: हिज इनिशीयल चॉइस ऍट द बिगिनींग ऑफ अ वर्क ऑफ आर्ट इज थिऑरिटिकली कंप्लीटली ओपन.

बात निकलेगी तो फिर... (भावानुवाद)

लेखक रसप यांनी शनिवार, 07/04/2012 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ गीताच्या चालीवर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे - नको इतकी अशी रंगेल उगा चर्चा ही लोक "अकारण अबोला कशास?" पुसतील "कसली चिंता तुला वाटे" असे विचारतील दावतील अंगुली पाहून त्या केसांस खुल्या आणि उलटून बघतील काळास सरल्या कांकणांना बघुन होतील आरोप किती कापरे हातही ठरतील गुन्हेगार किती लोक निष्ठूर हे सुनवतील खड्या बोलांनी माझ्या विषयास छेडतील विषय फिरवूनी लावुनी घेऊ नको मनाला जरासेही तू प्रिये तुझ्या चेहऱ्याची चलबिचल टिपून घेतील ते साहुनी घे परि, पलटून प्रश्न मांडू नको माझ्या नावाला त्यांच्यासमोरी घेऊ नको नको इतकी अशी रंगेल उगा चर्चा ही मूळ कविता - "बात निकलेगी तो फिर.." मूळ कवी - कफील

उगाच काहीतरी...

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 06/04/2012 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
उगाच काहीतरी... प्रश्नांची जेव्हा उत्तरे मिळाली तेव्हा प्रश्नच जवळचे वाटले गर्दीमध्ये वावरताना एकटेपण आपुलकीने भेटले नात्यांना जपता जपता अपेक्षांच्या जाळ्यात गुंतत गेलो मग स्वप्नांच्या बाजारात मात्र स्वतःला विकून बसलो भिजण्याच्या भीतीने आडोश्याला लपून बसलो मग पाउस पाहताना मात्र आतून कोरडा पडलो कधीतरी वाटत कि आपल्यासाठीही कधी मोगरा फुलवा आपल्या आठवणींनी कोणाच्या डोळ्याचा काठ ओलावा सगळ्यांसमोर हसून मी स्वतःला रोज फसवतो घरी आल्यावर मात्र आठवणींच्या कुशीत विसावतो तुझ्या आठवणी अजूनही डोळ्यात दाटून येतात... पावसासारख्या पडून मग रोम रोम भिजूवून जातात... गर्दीत कसाबसा लपतो मी स्वतःपासून प
काव्यरस

ए सुमनांचे राणी

लेखक नरेंद्र गोळे यांनी शुक्रवार, 06/04/2012 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
ए सुमनांचे राणी, बहर स्वामिनी तू तुझे स्मितहास्य, कहर जाहले न मन शुद्धीवर अन्, नसे शुद्धीवर मी कटाक्षांचे मिलन, कहर जाहले तुझे ओठ की, पद्म कोमल गुलाबी ह्या दो पाकळ्या, प्रेमकविता जणू की त्या पाकळ्यांनी, तव स्नेहार्द्र गूज मला ऐकविणे, कहर जाहले कधी मुक्त मिलन, कधी संकोचणे ते कधी चालतांना, बिथरणे, उसळणे हे भुवयांची महिरप, चढवून उतरणे उतरून चढविणे, कहर जाहले ही थंडी हवेतील, वयातील ही रात्र तुझ्या कुंतलांची, कृपा केवढी ही ही प्रत्येक बट जणू, शत गंधकोशी तुझे धुंद होणे, कहर जाहले ह्या गाण्यातली बहार अनुभवलेल्यांना गीतकार ओळखता यावा नाही का!
काव्यरस

पुन्हा डाव तू मांड, मी हारतो..

लेखक रसप यांनी गुरुवार, 05/04/2012 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
जगाच्या पटी हा तुझा खेळ सारा हरेकासमोरी तुझा मोहरा तुझा ना भरोसा जरी वाटला रे तरी वाटतो का तुझा आसरा ? 'लढावे' असे वाटले ना मनाला जसे ठेवले तू तसा नांदलो तुला खोड होती मला छेडण्याची तरीही कधीही न मी भांडलो मला ठाव होता तुझा धूर्त कावा 'धरूनी दबा एकटे गाठणे' चहूबाजुनी घेरुनी एकट्याला विजेत्यापरी आवही आणणे ! तुझी चाल दैवा कधी वाकडी वा कधी चाल होती तुझी थेटही मला जिंकणेही न मंजूर होते दिली जिंकण्याची तुला भेट ही अखेरीस केलीस कोंडी इथे तू मनापासुनी हार मी मानतो जरी खेळ आयुष्य झाले तरीही ....रसप.... ४ एप्रिल २०१२ http://www.ra

तुझ्या प्रेमात सजणा

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 04/04/2012 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
जवळ असूनही तुझ्यापासून मी खूप दूर आहे राहवत ना मुळी म्हणून ऐकवते हा सल आहे तुझ्या प्रेमात सजणा, झाले मन हे किती बेज़ार कोणी पाहो वा ना पाहो ईश्वर पाहतो आहे अंतरी तुझी मूर्ती स्थापित, झाली जेव्हापासून आहे शप्पथ एकही रात्र न मला, झोप लागली फार आहे हवा हवासा दर्द आहे, निश्वासही माझा सर्द आहे, चेहराही माझा जर्द आहे, न कळे कुठला रंग रंगवे तुझी पाहणे वाट तूच माझा जीव आहेस, तू ची आहेस प्राणही मला मिळावास तू, हीच मनात एकची आसही संगतीस तू साथ हो, काही मना-मनाची बात हो, गुजगोष्टी दिलखुलास हो, गाणीही गावी प्रेमाची छेडावी मनची तार ओवाळीन मी जीव तुझ्यावर, भग्न हृदय हे सांध तू नजरांमधला दूर दुरावा नजर
काव्यरस

रोजच उशीर होतो!

लेखक रसप यांनी मंगळवार, 03/04/2012 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
किरकिर किरकिर गजर वाजतो भल्या पहाटे 'पिडतो' 'स्नूझ' करुन मी परत झोपतो रोजच उशीर होतो..! खडबडून मग उठतो आणिक किती धावपळ करतो नाश्ता सोडुन देतो कारण रोजच उशीर होतो.. कापुन घेतो हनुवटीस मी पटपट दाढी करतो पाणी ओतुन बदाबदा मी 'बुडबुड गंगे' म्हणतो! इस्त्री करतो शर्टाला अन तशीच पँट चढवतो सॉक्स घालतो पुन्हा कालचे, रोजच उशीर होतो ! खिश्यात केवळ चिल्लर असून रिक्शाला थांबवतो पुन्हा पुन्हा मी घड्याळ बघतो अन सुस्कारे देतो कसाबसा तो चुकवून ट्रॅफिक स्टेशनला पोचतो रुपया-रुपया मोजुन देता रोजच उशीर होतो तोबा गर्दी भरलेली, मी पुन्हा पुन्हा चेंगरतो गाडी माझी निघून जाते हताश मीही बघतो लगडुन येते पुढची गाडी मी

आपले बुवा बरे आहे...

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 02/04/2012 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रच आता मित्रांचा खून करतात आणि वर खंडणी पण घेतात... आपले मित्र अजून पण टिकून आहेत.. मैत्री खातर जान द्यायला पण तयार आहेत.. त्यामुळे आपले बुवा बरे आहे... बायकोने प्रियकराला हाताशी धरले आणि नवऱ्याला ठार मारले आपली बायको मात्र अजून पण रात्री २ पर्यंत जेवायला थांबते.. त्यामुळे आपले बुवा बरे आहे... मुलाने केला आईचा खून कारण आला दारू पिवून.. माझी मुले काही असे करत नाहीत कारण ती अद्याप लहान आहेत.. त्यामुळे आपले बुवा बरे आहे... भाजीचे हे भाव वाढले, सरकारने पण हात टेकले... आपण काही भारतात नोकरी करत नाही शेजारी उपाशी राहिला तरी आपल्याला फरक पडत नाही.. त्यामुळे आपले बुवा बरे आहे... असते खूपच

आयुष्य

लेखक विदेश यांनी सोमवार, 02/04/2012 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य मी चालत आहे , सोबतीला चंद्र चांदण्या - मी नाही कंटाळलो, बिचारा चंद्र मूक राहिला ! पाठवून दिले त्याने माझ्या सोबतीला - विनातक्रार शांतपणे किरणांसवे सूर्याला ! ...आता मला सोबत करताना