Skip to main content

कविता

क्रुसावरिल माणिक

लेखक ajay wankhede यांनी मंगळवार, 27/03/2012 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
तू आलास ,थांबलास, आणि मनाला चटका लाऊन गेलास. शब्दांना शब्दांच्याच माळेत गुंफलेस तु लय, ताल, माधुर्य सार्‍यांनाच थंड निखार्‍यावर जाळलेस तु चालावयास पायवाट होति या नागफणिच्या वनात हळुवार कोरलीस आपलीच पायवाट तू पाणी विद्रोहाचे पिऊनि, उतरलास सागरात या झेलणारा मंथने हजारो तु एकटाच देवमासा मज नाहि आज दु:ख क्रुसावरिल 'माणिका' होशिल भाग तु या मैत्रेय जातकाचा. ................................................................................................................... कविवर्य 'ग्रेस' यांना विनम्र अभिवादन
काव्यरस

ग्रेस!!

लेखक शैलेन्द्र यांनी सोमवार, 26/03/2012 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
टीचली काच बिलोरी, दुखा:चा हलला पारा, अस्फुट वेदना जाते, मग वाहे उदास वारा.. एकाकी होता कोणी, रिचवित विषाचे प्याले, हळुवार तरल जखमांचे, गुंफीत मोती ओले.. शब्दांतुन द्यावे त्याने, चरचरीत तलम हुळहुळते, अन जग शोधित बसते, त्याच्याशी आपुले नाते.. रक्तातील गहरी त्याने, काजळी लपवली नाही , नक्षीत कवडश्यांच्या, कधी प्रकाश चोरला नाही.. कोंडले आतुन काही, विष्षण्ण नाद निनादे, झुंबर दचकुन हलले, अन लोलक एक उनावे.. -- शैलेंद्र
काव्यरस

... अस्तित्व माझे

लेखक गणेशा यांनी सोमवार, 26/03/2012 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे बसू कसा पंक्तीत तुमच्या, बदनाम अस्तित्व माझे निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे भावनांच्या बाजारात, बंदिवान अस्तित्व माझे घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे माणसांच्या कल्लोळात हरविले मनाचे स्वैर बंध भासांच्या ताटव्यात, सुनसान अस्तित्व माझे सुगंधाच्या मायाजाळात अडकली फ़ुलपाखरे झुगारले नभाला असे, बेगुमान अस्तित्व माझे रात्रीस, सांजवेळी साद घालतो जख्मी सूर्य झाकोळले अंधारात, दीपमान अस्तित्व माझे छप्परविरहीत घरट्यात उभ्या असंख्य भिंती नभांकणात विखुरले, बेभान अस्तित्व माझे स्वरविरहीत शब्दांचे उठते निशब्द क

साहित्यातील 'माणिक' हरपलं ....

लेखक सुहास झेले यांनी सोमवार, 26/03/2012 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
जीव राखता राखता तुला हाताशी घेईन झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी तुझा पदर धरून मागे येईन उपाशी मुक्या बाहुलीचा खेळ देवघरात मांडीन नथ डोळ्यांशी येताना निरांजनात तेवीन तुझ्या चिमण्यांची जेव्हा घरी मळभ येईल वळचणीचा पाऊस माझा सोयरा होईल भाळी शिशिराची फुले अंगी मोतियांचा जोग तुझ्या पापण्यांच्या काठी मला पहाटेची जाग नाही दु: खाचा आडोसा नको सुखाच

झाड झाडासवे बोले.. (अष्टाक्षरी)

लेखक वेणू यांनी सोमवार, 26/03/2012 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
झाड झाडासवे बोले, काय गूढ आहे सारे? नाही प़क्षी घरट्यांत कसे झाले बंद वारे? झाड उत्तरे झाडाला, अरे सारे बदलले, पक्षी रमती बाहेर घेत वार्‍यासवे झुले.. झाड झाडासवे बोले, काय सांगतोस असे? नाही पक्षी नाही वारा आता जगायचे कसे? झाड उत्तरे झाडाला, नको होउस उदास, वय तुझे माझे झाले त्यांचे तारुण्य भरास.. झाड झाडासवे बोले उरे पानगळ अशी, होतो बहरलो जेव्हा सारे होते माझ्यापाशी... झाड उत्तरे झाडाला, जगण्याची रीत खरी पंख फुटता फुटता पक्षी भरारी भरारी झाड झाडासवे बोले, आत दाटून रे येते रोज बोलतो जरी हे फिरुनीया तेच वाटे..! यावा बहर बहर भेट चिमण्यांची व्हावी, माझ्या अंगाखांद्यावर पुन्हा हसावी खेळावी.. प

सांब भोळा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 24/03/2012 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
रानात सांब भोळा उघडा असे दुपारी 'देवा कसाही तू रे...!?' मी एक त्या विचारी म्हणतो मलाही सांब 'मी खेळ तव मनाचा, असतो निसर्ग सारा.. कधी देव का कुणाचा..?' 'पडणार साऊली जी माझेच अल्प रूपं.., का बांधता तुम्ही हे.. नसते खुळे हिशेबं..?' 'व्यापुनि चराचरी या मी विश्वरूपं सारे..., माझेच भोग मजसी.. छळतीलं का कधी रे..?' 'तुमच्या खुळ्या स्वभावी मज देव-जन्म आहे.., कुणी 'देवं' का म्हणा ना..? अंती निसर्ग आहे...!' 'त्याचीच शुद्ध किमया भासे तुम्हा उन्हाळा, निर्जीव मूळचा मी तुमचाच सांब भोळा...!'
काव्यरस

सांजवात..

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 23/03/2012 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
सांजवात.. शीळ तुझी दरीतली खूण तुझी सरीतली.. ओढ तुझी अंतरात रोज मुकी चांदरात.. ओल तुझी काळजात बोल तिचे आसवात साद तुझी वादळात याद तुझी काजळात आजही तू आठवात तेवते मी सांजवात.. - संध्या
काव्यरस

....पुन्हा!!

लेखक वेणू यांनी शुक्रवार, 23/03/2012 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
सांज साजरी सखी लाजरी, आठव बोचरी रुतली पुन्हा... पेटलेले रान उन्हाला तहान सुन्न वहीचे पान, मिटले पुन्हा... दमलेला श्वास श्रमलेली आस, अवघडले त्रास दुर्मुखले पुन्हा... तू असण्याचे भास मनाचे खोटे कयास, निराशेने खास गाठले पुन्हा... आशेनेच फसवणे जगासवे हेलकावणे, मिळवून गमावणे घडले पुन्हा... शुभ्र तेवती वात काळावरही मात, एक नवी सुरुवात भरारले.... पुन्हा!! -बागेश्री

मैफिल नववर्षाची

लेखक जयवी यांनी शुक्रवार, 23/03/2012 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
आसमंती हा बहर बसंती सरे पानगळ शिशिराची कोकील कंठी सुरु होतसे मैफिल ही नव वर्षाची नवे सूर अन् नवे तराणे नव्या दिशा, उन्मेष नवा नवीन स्वप्ने, नवी भरारी नवी दृष्टी अन् जोश नवा नवसूर्याचे तेज लेऊनी सृष्टी गाई गीत नवे उधळण होता सप्तसुरांची इंद्रधनुवर रंग नवे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !!

मालवणी गजाली बरो...

लेखक निश यांनी बुधवार, 21/03/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
(मी कोकणातला असल्यामुळे एक मालवणी कविता) असोच लोका उगाच देतत माका भाव म्हणूण झालो माझा गावात नाव. नाचु लागलो मनात मोर, लोका म्हणती कवठा चोर, म्हटला झाला अस माझा नाव, मांडुन बघाया राजकारणी डाव. मित्रान सांगितल्यानी, जाऊन तुझ्या बापाशिक विचार, निवडणु़क लढवुचा असय, पैसो दे म्हणाव. बापाशिक जाऊन विचाल्यानी, पैसो देउक नाय, पण माझा मुस्काट फोडल्यानी. आवशीच्या घोवान कधी निवडणुक लढवल्यानी, गाववाल्यानी तुझो मामा केल्यानी. पैसो कमवुची अक्कल नसा तुका, शिक्षो म्हणुन कोंबडो केलो बापान माका. जसा काय चांगल्या जेवणात मीठ जास्त पडता. तसो मराठी माणुस आपल्याच माणसाचो पाय खेचता. बापाशीच्या मारान घे