Skip to main content

कविता

पाटाला भसा भसा पानी

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 18/03/2012 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/21045#comment-381773 समुद्र का विहिर...? बेडकं का खेकडे..? या नस्त्या व्यापाला कटाळुन, जरा नाचगानं करुन शीन घालवावा,,,म्हंन्तो... या मंग करु वाईच डोस्कं ग्गार... (चाल--- पाडाला पिक्कलाय अंबा...) सोडलं हो...आता सोडलं हो...आता सोडलं हो,सोडलं भसाभसा पानी हो...ओ...सोडलं भसाभसा पानी,,,ध--नाजी राव पाटाला भसाभसा पानी ॥धृ॥ धागा ह्यो पडला थंड ,बॉडीत होईल बंड ... ओ धनाजी... थंड कसा पडला जी,,हो ओ,, थंड पडला कसा जी... ओ पाटिल... सोडा ना लवकर पानी... ध--नाजीराव सोडा ना भसाभसा पानी..
काव्यरस

मी पप्पा

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/03/2012 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
मी पप्पा
मी पप्पा तू मम्मी! आपलं बाळ यम्मी यम्मी बाळ आपलं गोरं गोरं लाल टाळ्या वाजवून धरतंय ताल कधी बसतं तर कधी हासतं कधी रांगतं कधी उभं राहतं छोटे छोटे तिचे कान आवाजाकडे वळवी मान हात तिचे बारीक इवलेसे! बोटे तोंडात घाली कसे! नजरेने ती सारे पाही पण अजून काही बोलत नाही! - पाषाणभेद
काव्यरस

काशीबाई काशीबाई

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/03/2012 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
काशीबाई काशीबाई
काशीबाई काशीबाई तुमच्या साडीचा कसोटा घट्ट खोचा वारा येईल भसाभसा तर होईल मोठा लोचा ||धृ|| अशी कशी हो तुम्ही नेहमीच करता घाई कामावर यायची उगाच करता नवलाई भांडी निट घासा नाहीतर आणाल त्यांना पोचा ||१|| तुम्ही सांगून बोलून रजा घेत जा हो न सांगता दांडी मारू नका हो निट मी सांगते नका असे भांडू कचाकचा ||२|| नगरसेवक पुतण्या अन हवालदार तुमचा भाचा तालेवार व्याही असून एक नाही काही कामाचा सोन्याचा चमचा त्यांच्या तोंडी तुम्हां सांगती गौर्‍या वेचा ||३|| बरं जावूद्या शेजारीण काय बोलली ते जरा सांगा चुगल

ते एक घर...

लेखक निश यांनी शनिवार, 17/03/2012 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
ते एक घर आनंदाने बहरलेल चिमण्या पाखरांच्या किलबिलाटाने गजबजलेल. ते एक घर तारुण्याचा उत्साह भरभरुन वाहणार ते एक घर संपत्ति यश ह्यावर समाजात मान तोलणार. ते एक घर देवावर अगाढ श्रध्दा असणार ते एक घर शिक्षणाला महत्व देणार. ते एक घर आलेल्या प्रत्येकाचि विचारपूस करणार प्रत्येक उत्सवात आनंदाने सामिल होणार. आणि.. तेच ते एक घर त्याच घरातिल एक अडगळिचि खोलि एक फाटका बिछाना एक मोडक कपाट व तिथे राहणार एक म्हातार जोडप. तेच ते एक घर मुलगा चांगला कमविता असताना म्हातार्‍या आई वडिलाना अडगळ समजुन त्या खोलित रवानगि करणार ते च ते एक घर आयुष्य म्हंजे म्हातारपणि भोगावा लागणारा तुरुंगवास अस समजुन त्याना आयु

स्वप्नचित्र...

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 17/03/2012 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नाळू राती, सहज एकदा, नदीकिनारी बसले ओढून घेता, पदर नभाचा, रम्य दॄश्य ते दिसले चांदणे होते, चमचमणारे, तीरावरी उतरले पाण्यामध्ये, पोहते तारे, पाहुनिया मी हसले आकाशीच्या पडद्यावरति, चालत होते, मन कुंचले चंद्र सोळा चितारलेले, लख्ख दिवे लखलखले रंगीत संगीत रेषा हलता, जरा जरासे पर हलले फुलपाखरे, फडफडणारी, स्वप्नचित्र असे दिसले.. हिरवाईत होते, शुभ्र रेशमी, ससे देखणे, गोजिरवाणे पिठूर चांदणे, माळून येता, शुभ्रतेत मी न्हाले कुठे एकला, गात होता, चंदन तो ..
काव्यरस

तेव्हा येईल अर्थ खरा जगण्याला

लेखक गोंधळी यांनी शुक्रवार, 16/03/2012 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
कधी करावे भांडण अंधाय्रा दु:खाशी कधी करावे स्वागत आनंदरुपी उजेडाचे कधी भरकटावे बिन्धास विचारांच्या जंगलात कधी उडावे उंच मनाच्या आभाळात कधी सुटावे सुसाट वाय्राच्या जगात कधी यावे पोहुन भावनांच्या समुद्रात कधी बघावे बसुन अनुभवाच्या शाळेत कधी दरवळावे होउन प्रेमाचा सुगंध मग बनावे प्रकाश दिवा होउन शेवटी व्हावे लुप्त मेणासारखे जळुन तेव्हा येईल अर्थ खरा जगण्याला जाताना ही मग खेद नसेही कुठला.

एक हिंस्र कविता (?)... (१८+ only)

लेखक अस्वस्थामा यांनी शुक्रवार, 16/03/2012 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
हाणा रे हाणा , या विडंबकांना.. हे चावताती, हळव्या कवींना.. टांगून उलटे, माळावरी अन.. नवकवितांची धुरी द्या हो त्यांना.. जशी कोवळ्या कवितांची, पिसे हे उपटती.. यांच्या बोडक्याचे, केस केस उपटा.. तरीही जर उरले, अतृप्त अस्वस्थ आत्मे, हृद्य गद्य ललितात यांना बुडवून टाका.. (अपूर्ण आणि विस्तारासाठी सर्वाना खुले आवाहन... आणि ह. घ्या. हे सांगणे न लगे.. )

खेळ नियतींचा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 16/03/2012 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
उडाली पाखरे परदेशी ,मोकळा चौसोपी वाडा. पोपडे पडे ओसरीस ,नाही अंगणी शेणसडा.. परसदारी तो औदुंबर, असे शांतपणे उभा. ना त्यास प्रदक्षिणा, ना कुणी राखे निगा. कोनाड्यातील आरसा ,उडाला त्याचा हि पारा भीतीवरील कुंकु खुणा, मिरवी सौभाग्याचा तोरा अडगळीतली रेशमी वसने, सांगे शृंगाराच्या कथा कोप~यातली उभी काठी, रडे वार्धक्याच्या व्यथा. कोप~यातल्या खाटेवर, श्वास मंदसा घुमे कुणाचा? ना हाती जीवनमरण ,भोग भोगणे खेळ नियतींचा

ती वेळ निराळी होती . . . ..

लेखक अरूण म्हात्रे यांनी गुरुवार, 15/03/2012 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
छातीत फुले फुलण्याची वार्‍यावर मन झुलण्याची ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. डोळ्यात ऋतुंचे पाणी मौनात मिसळले कोणी वाळूत स्तब्ध राहताना लाटेने गहिवरण्याची ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. तू वळून हसलीस जेव्हा नक्षत्र निथळले तेव्हा मन शहारून मिटण्याची डोळ्यात चंद्र टिपण्याची . . . ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. ज्या चंद्र कवडशा खाली कुणी साद घातली ओली मग चंद्र वळून जाताना किरणात जळून जाण्याची ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. पाऊस परतला जेव्हा नभ नदीत हसले तेव्हा कोरड्या मनाने कोणी गावात परत येण्याची ती वेळ निराळी होती....

नभांगण...!!

लेखक वेणू यांनी गुरुवार, 15/03/2012 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
सुरावटींनी सजलेल्या, तर कधी उधळल्या गेलेल्या मैफिली.... घमघमलेली सांजरात अन् अर्धोन्मिलीत मोगरा.... 'आठवतंय का ते?'- सालांनंतरच्या भेटीतला, तुझा निरागस प्रश्न तेच, विस्मयी डोळे न् दुमडलेले ओठ! तुला विचारायचेच राहून गेले कधी वाकून पाहिलंस मनात माझ्या...? तू नेहमीच काठाशी वावरणारी..... 'अपनी धुन में मस्त' असं अधोरेखित जगणारी... जितकं तुला ओढू पाहिलं, अडकवु पाहिलं, तितकी निसटत गेलेली... 'बांधील प्रेमाचा व्यापार का?' ह्याच भोवती धुमसणारी समजलो नव्हतो, बंधनात अडकणारी तू नाहीस, जितकं स्वातंत्र्य नात्यात, तितकी माझी होशील ते! उमजताच, आलो हाक मारायला तोवर मनाचं नभांगण रिकामं करून गेलीस.... हाक