जगणे असेच का असते?
जगणे असेच का असते?
जगता जगता मरायचे असते.
जगण्याकरिता लढणे असेच का असते?
लढता लढता हरायचे असते.
जगण्यातले सुख असेच का असते?
सुखाचि वाट बघता बघता दु:ख भोगायचे असते.
जगण्यातली आशा अशीच का असते?
आशेवर जगताना निराश व्हायचे असते.
जगणे हे स्वप्नासारखे का असते ?
सत्यात येता येता मोडुन ते पडते.
खरच जगण हे एक कोड असते.
ऊत्तर सापडल अस वाटत असताना
नव कोड देउन ते शोधण्यात संपायचे असते.
मिसळपाव
