Skip to main content

कविता

टुकारघोडे! (हझल)

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 10/03/2012 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
टुकारघोडे! (हझल)

गाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे

कशी बघा चालते कचेरी, अशी जशी की दुकानदारी
अनाथ सोडून कायद्याला, विधानमंडळ फ़रार आहे

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

गमावतो ना कधीच संधी सफ़ेद कुत्रा पिसाळलेला
डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे
काव्यरस

.....सखे.......

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 10/03/2012 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
सखे... मी होतो एक वादळ भरकटलेलं कुठेतरी. भरुन घेतेस त्याला ..शिडातल्या वार्यासारखे..तु तुझ्या पदरी. तुच दिशा होतेस..होतेस प्रेरणा मार्गावरच्या काटेरी. मी ही निघतो मग वाळवंटी फुलवित बागा. तारा सुध्दा मला बघुनि ठरवु लागतो त्याची जागा. सखे... तुझ्या डोळ्यातुन अलवार काजळ विखुरतं.. रात्र होऊन सार्या गगनात पसरतं.. पुर्ण निर्वस्त्र होऊन तु तुझा पदर भिरकावतेस गगनात .. चंद्र..तारे..त्यामध्येच मग लहान मुलासारखे खेळतात.. वासनेने फणफणणार्या मला तु समईच्या शांतपणाने कुशीत घेतेस.. निर्माल्यातील फुलासारखे स्वत:ला मला अर्पण करतेस... भोगात दंग मला अचानकच तुझ्या ह्रुदयाच्या स्पंदनातुन मृदंग ऐकायला येतो.. तुझ्य

लावणी: शिटी मारून

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 09/03/2012 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
लावणी: शिटी मारून
{{{रंग माझा गोरा मदनाला दावतोय तोरा रती मी सुंदर आहे मदभरली अप्सरा नका जवळ येवू नका ओळख दाखवू मी नार नखर्‍याची होईल पाणउतारा }}} (चाल सुरू) भरल्या बाजारी गर्दी जमली अहो भरल्या बाजारी गर्दी जमली तिथं शिटी तुम्ही का मारता? अहो पाव्हनं शिटी मारून शिटी मारून येड्यावानी काय करता? ||धृ|| कोरस: शिटी मारून, हातवारे करून येड्यावानी काय करता? हो दाजी शिटी मारून येड्यावानी काय करता?
काव्यरस

स्वप्नांस बाप आहे .!

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 08/03/2012 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, ही आमची प्रेरणा misalpav.com/node/20935 अन ही आमची प्रतिभा (इथं आमची आदरार्थी नसुन अनेकवचनी आहे ) अवलीच छंद आहे, स्वप्नाकडे पहाणे.. स्वप्नास बाप आहे, घनदाटशा मिशांचा.. रुतले उरी नि पार्श्वी, ते रात्री मार खाणे. झाला सराव आता, बांबूस सारण्याचा.. स्वप्नास रोग आहे, झोपेत चालण्याचा.. बापास शाप आहे, रात्रीस जागण्याचा.. गेल्या कितीक रात्री, उलटून जागताना. झाला सराव आता, झोपेस टाळण्याचा.. त्या बापसास वाटे, तो यार मीच आहे. स्वप्नास धाक देतो, आवशीस सांगण्याचा.. नजरेतले इशारे, जरि जाणिले तिच्या मी. आहे खडा पहारा, गल्लीत सासर्‍याचा.. गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. तो खास बेत

का? का? का?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 08/03/2012 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
का? का? का? पानांनाही कधी का येतो गंध फुलासारखे हुंगून होण्या धुंद पाण्याला कधी चढते निळाई जंगलात का असते हिरवाई रंग फुलांचे इतके का आगळे पाहून असे का होते ते नकळे डोंगरावर ते वृक्ष उभे का सावली देण्या ते तेथे का आकाशात ढग का जमून येती आता येथे मग कोठे जाती वारा भणाण उगा का वाहतो "की, मी येथे आहे" असे सांगतो हा मी एकटाच का कधीचा आलो येथला नसूनही का येथलाच झालो - पाभे
काव्यरस

आकाश उजळले होते,,,

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 08/03/2012 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच आपल्या गुर्जींनी म्हणजेच अतृप्त आत्म्यांनी एका प्रतिसादात त्यांना सुरेश भटांच्या 'एल्गार'ची आठवण आली म्हणून सांगितले आणि आमच्याही मनात त्यासरशी त्यांची आठवण ताजी झाली. s.y ला असताना सुरेश भटांच्या गजला आमच्या अभ्यासक्रमात होत्या. खरं तर त्या वेळीच आमची आणि सुरेशभटांच्या गझलांची खरी ओळख झाली म्हणायची. त्यांच्या प्रत्येक गझलेमध्ये जणू एकप्रकारचा जादूच होता. आजही ती गझल वाचताना किंवा ऐकताना त्यातील श्ब्द न् शब्द मनाच्या खोल गाभार्‍यात कुठेतरी चर्रर्र करुन जातो. त्यातीलच गुगलमध्ये सापडलेली ही एक गझल=>
काव्यरस

मन-झोपाळा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 07/03/2012 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
ओघळ पिकल्या पानांचे; सुकले देठ जरी अंकूर अजूनहि ओले; खोडात चिमुकले; गाभारी वारा,.. झाडून नेतसे हिरमुसलेले; गत वय माघारी झुळुकेत चिन्मयी कल्प उमलवे; नवजीवन दरबारी अंकीत कळ्या विलसती कोवळ्या वर्मावर अवतारी गंधाने भारी नवपर्णांकित शुभ्र परांची वारी किलबिल अवघी चौफेर; पिले पक्षिणी परतली माहेरी किमया ही ऋतु-तारुण्यबहर-रत प्रणयआभेची सारी यातना वेदना गळलेल्या; नत पायतळाशी; गोळा पाहून रम्य मय वसंत-शोभा; तृप्त ऋणांकित डोळा मजला ही भेटे अशी मनोरम रत्नजडित मधुशाळा अवकाशाचा अन झुले अंबरी मदनमस्त मन-झोपाळा ................................अज्ञात
काव्यरस

पालखी

लेखक चैतन्य दीक्षित यांनी मंगळवार, 06/03/2012 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
पालखी काळाची थांबली एकदा, बदलण्या खांदा भोईयांचा | त्याच क्षणी माझ्या-समोर ती होती, पेटवून ज्योती, अंतरात | पालखी काळाची गेली निघोनिया, ज्योत ठेवोनिया तेवतीच | आता वाट आहे पहायाची फक्त, 'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी | -चैतन्य

अंबरात फिरुनिया उगवतो....

लेखक सांजसंध्या यांनी रविवार, 04/03/2012 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
अंबरात फिरुनिया उगवतो, हासरा राजस तारा परिमळता देहातून गंधित, मोगरमोहर सारा................. || धृ || बालपणीचा काळ हरवला, गाव कुसाला सांगा हिरवाईचा ऋतू परतता, फुलल्या रेशीम बागा पूर्व दिशेला, भिजवुनि आल्या, कोवळ्या पाऊसधारा ......... || १ || स्वप्नांच्या गावात बोलले, बोल मनीचे कोणी निळ्या बोलक्या..
काव्यरस

संवाद करते मी विश्वेश्वराशी ..!

लेखक सांजसंध्या यांनी शनिवार, 03/03/2012 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या प्रतिभेची लखलखती आभा . मान्यय माझी .. सांजावाती प्रभा :) तुमच्या यशाचा हा दुमदुमता डंका उध्वस्त राहु द्या माझी ही लंका :( सोन्याने सजावा हा तुमचा महाल सोडा हो चिंता, मी नाही बेहाल :cool: उजळावे दिव्यांनी तुमचे शिवार नकोय ते मला, चांदणे उधार :tired: तुमच्या दयेचा ना करते स्विकार उसन्या प्रतिमांचा त्रिवार धिक्कार , , सृजनआंगण फुलेल जेव्हां क्षितिजाला देईन धडका मी तेव्हां आकाशगंगेची फिरविन भिंगरी भिरकावून देईन गोवर्धन गिरी कशास करता हो तुलना कुणाशी संवाद करते मी विश्वेश्वराशी ..! :innocent: - संध्या