Skip to main content

कविता

रस्ता

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 02/03/2012 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ता जन्मापासून खातो आहे , आजवरी खस्ता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता कधी देखणा.. प्रशस्त होता, सांगते हो कोणी दोन कडेला उभारली ही टप-यांची लेणी ऐश्वर्याच्या गालाहूनी मऊ म्हणे होता असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता टप-यांपुढे उभी राहते, रिक्षांची सेना बसथांब्यावर कुत्रे बसते, उतारूंची दैना उरली आणिक, जागा म्हणूनी, पथा-याही आल्या सोय झाली, गं भाजीची, बायका म्हणाल्या शिस्त बिस्त, कधी इथे, कुणी पाळीत होता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता उरल्या सुरल्या..

रस्ता

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 02/03/2012 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ता जन्मापासून खातो आहे , आजवरी खस्ता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता कधी देखणा.. प्रशस्त होता, सांगते हो कोणी दोन कडेला उभारली ही टप-यांची लेणी ऐश्वर्याच्या गालाहूनी मऊ म्हणे होता असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता टप-यांपुढे उभी राहते, रिक्षांची सेना बसथांब्यावर कुत्रे बसते, उतारूंची दैना उरली आणिक, जागा म्हणूनी, पथा-याही आल्या सोय झाली, गं भाजीची, बायका म्हणाल्या शिस्त बिस्त, कधी इथे, कुणी पाळीत होता असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता उरल्या सुरल्या..

देखणी

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 01/03/2012 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
नवी पालवी अन नवे अंतराणे जुन्या ओळखीचे नवे तेच गाणे उराशी किती भोवले पाहुणे हे गळाले आता जीर्ण शीण दीनवाणे पुन्हा पाखरे आळवीती तराणे जरेल्या तरूंचे उभरले कणे साद घाली कुणी देइ आमंत्रणे बघ उषा न्हाइली सज्जली अंगणे मनाची कुपी उलगडी आवरणे गुंफलेल्या स्वरांशी करी भाषणे देखणी सुप्तशी उंबराची फुले अमृताच्या सरी द्वैत पारायणे .......................अज्ञात
काव्यरस

एक कविता

लेखक राजो यांनी बुधवार, 29/02/2012 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती.

राजकारणी अन आपण.......... बरोबर ना ??

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 28/02/2012 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्टाचाराचे रोज नवे प्रकरण ....देशद्रोह्यांचे लांगुलचालन | जातीच राजकारण करण ....झोळी स्वताची भरण | देशाचे लचके तोडण ....चालू आहे ताठ मानेन | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | जवान उपाशी-कसाब तुपाशी ....खेळीतात सैनिकांच्या जीवाशी | नक्षलवाद्याना धरलय हाताशी ....वैर याचं भारतामातेशी | घुसलेत अनेक बांगलादेशी....कारवाई न करण्याच ठरवलय मनाशी | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | स्त्री असुरक्षित....बालके कुपोषित | गर्भहत्या तेजीत.....तरुण बेरोजगारीच्या खाईत | शेतकऱ्यांना कापत.....स्वारी चालली देश लुटत | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | महिन्यातून एकदा तिहाराची वा
काव्यरस

निःशब्द

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी मंगळवार, 28/02/2012 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे म्हणावे तुझेच केवळ असे काही एक माझे निव्वळ कुणी म्हणाले तिथेच बनती जुळती तुटती रेशीमगाठी मी न पाहिले हात तयाचे तुझ्या किनारी सापडले घर आयुष्याच्या अंक पटावर दिले घेतले हिशेब झाले समर्पणाच्या वाटेवरचे आज पडावे पहिले पाउल उलगडताना ह्रदयाची धून सूर कापरा कातर कातर शब्दांची वीण उसवीत जाती शब्दांवाचून डोळ्यांचे तळ तुझे म्हणावे तुझेच केवळ असे काही एक माझे निव्वळ
काव्यरस

मराठी भाषा दिवसानिमित्त

लेखक चिम् चिम् मामा यांनी सोमवार, 27/02/2012 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज मराठी भाषा दिवस... त्या निमित्ताने माझ्या काही कविता. वहितली कविता मी माझ्या ब्लॉगवर ताकली, सर्वांनी वाचावी म्हणुन पत्रिके सारखी वाटली! माझी कविता वाचून त्यावर भरपूर रिप्लाय यावेत, कवितेत कमी पण रिप्लाय मधे शब्द जास्त असावेत! माझी कविता वाचून यावी ओठांवर गाणी भावुक शब्दांनी यावे डोळ्यात पाणी! अशी असावी माझी कविता जी सांगुन जाइल खूप काही, प्रत्येक जण आपली कविता त्यात पाही! मग, माझी ही कविता त्याने तिला फॉरवर्ड करावी, आवडते ती त्याला ह्याची ती पावती असावी ! http://bhagyaswap.blogspot.in/

सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा

लेखक गणेशा यांनी सोमवार, 27/02/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा धगधगत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये घुमतो आवाज मराठीचा एकतेची साद घेवुनी संवाद मराठीचा शब्द चिंगार आवाज मराठीचा संस्कार दिसे खुलुनी साजशृंगार माय मराठीचा हाती तेजोमय तलवार तळपते रणांगणात गर्जतो यल्गार मराठीचा गरजले परके सारे जरी घरात आपापल्या नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत, बाणा मराठीचा . . . . . . . . . . .
काव्यरस

" आज मराठी भाषा- दीन ! "

लेखक विदेश यांनी सोमवार, 27/02/2012 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
धरला मी अभिमान मनीं "आज मराठीभाषा-दिन " मी मराठी तू मराठी बोलू सारे आज सुदिन ! सुरेख उत्तम वा वा छान म्हणत वाहवा करू - जमेल तेथे मायमराठी आपण जवळ करू ! मराठी निवेदक वदला- हाऊ नाईस ! मराठी अभिनेता कण्हला- गुड आयडिया ! मराठी नटी किंचाळली- वॉव फॅंटॅस्टिक ! मराठी परीक्षक ओरडला- ब्राव्हो सुपर्ब ! मराठी नेता गरजला- व्हेरी गुड ! मराठी जनता म्हणाली- गुड, छान ! भ्रमिष्ट ठरलो मी अभिमानी जगास मराठी शिकवीन - मजला पुरते कळून चुकले, " आज मराठीभाषा- दीन ! "
काव्यरस

आठवड्यातून भरनारया बाजारासारखे ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 27/02/2012 06:42 या दिवशी प्रकाशित केले.
तो तुकड्या तुकड्याने फिरत असतो ह्या महानगरात तो राहत असतो कोठेतरी दूर....उपनगरात वसई ,बोरीवली ,कधीकधी विरारला अंबरनाथ ,कसारा ,कधी पुण्याला ,नाशिकला देखील पोटासाठी येत असतो पहाटे उठतो चारला ,पाचला, सहा किंवा सातला डबा भरते त्याची बायको रात्रीच भिजवून ठेवते कणिक पोळ्या भाजी नि कधी चटणी तो निघतो भल्या पहाटे ,सकाळी सकाळी नि स्वप्न बघत असतो उद्याच्या सुखाची पुढच्या महिन्यात असतो बायकोचा वाढदिवस एखादया मुलाचा किंवा मुलीचा देखील छोटा परिवार सुखी परिवार [?] घट्ट डोक्यात असते त्याच्या तरीही वेळ मिळत नसतो क्षणभर....!! किती तरी दिवसात तो बायकोला नाही घेऊन गेला सिनेमाला नाही कधी प्रेमाने बघितले त्याने
काव्यरस