Skip to main content

कविता

तू घे विसावा जरा........!

लेखक रसप यांनी रविवार, 01/04/2012 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
होते रोज सुरू पहाटसमयी गर्दी इथे धावती सारे शांतपणे कसे समजुनी वेगास त्या पाळती ? कंटाळा करती कधी न बसती काट्यासवे चालती पाहूनी तुज वाटले गजब ना ही मुंबईची गती ? जागेला धरण्यास लोकलमधे घेती उड्या धावुनी हॉटेलात कधी पहा बसुनिया खाती भुका मारुनी जो-तो येउन हो अधीर बनुनी होतो उभा मागुनी घाई ही कसली असे?
काव्यरस

एप्रिल फूल -

लेखक विदेश यांनी शनिवार, 31/03/2012 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
रंग नाही, रूप नाही, सुगंध नाही पान नाही, पाकळी नाही, देठही नाही - अजबसे फूल, देते हूल, कुठे दिसेना आकर्षण आहे तरी तयाचे सर्वांना ; फजितीत फसवते, स्वत:लाच हसवते एप्रिलमध्येच कसे नेमके बघा उगवते - एक तारखेचे "एप्रिल फूल" भारी जीव जडवते, मी मी म्हणणाऱ्याची खिल्ली पाहता पाहता उडवते !

सिमोल्लंघनी ट्रेक

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 31/03/2012 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
दूरदर्शनचे हिरकणी सन्मान पुरस्कार जाहीर, विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव २१ मार्च रोजी प्रतिनिधी, मुंबई सुचेता मुंबई दूरदर्शन केंद्र सह्याद्री वाहिनीतर्फे दरवर्षी देण्यात येणारे हिरकणी सन्मान पुरस्कार जाहीर झाले आहेत. हा पुरस्कार बुधवार, २१ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता दूरदर्शन केंद्राच्या वरळी येथील प्रांगणात आयोजित केला आहे.

विडंबन करुक अक्खो दिवस जाय...

लेखक निश यांनी शनिवार, 31/03/2012 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन करुक पडत्याती कष्ट, दुसर्‍यांच्या जीवावर बांडगुळा होती धष्टपुष्ट. विडंबन करुन थकुन जाय चांगली कविता ह्यांच्या डोक्यावरुन जाय. ह्यांका घरात नसा मान विडंबना करुन नवकवीक म्हणतत, ह्यांची कविता असता घाण. घरचो राग कवितेत काढतत नवकवींच्या जीवावर आपलो धंदो चालवतत. चोरलेल्या कोंबड्या अन उधारीचो मसालो म्हणुन ह्यांच्या कवितेत असता टमरेल चाळो. जाउन जाउन हे लोका जाती खय स्वताक झाकायचा सोडुन दुसर्‍यांक उघडो बघुची सवय. ऑफीसातला काम ह्यांका येणा नाय एक विडंबन करुक ह्यांचो आक्खो दिवस जाय. एक विडंबन करुक ह्यांचो आक्खो दिवस जाय

प्रवास जीवनाचा...!

लेखक वेणू यांनी शनिवार, 31/03/2012 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
जगण्याची लय गवसली, असं जाणवताच सर्वांग सरसावतं ठेका धरायला.... 'पण-परंतू' येणारच आडवे.....! खाच-खळग्यांशिवाय मजा ती कसली? अपरिहार्य प्रवासातलं- ठेचकाळणं, बांधीलच जणू! बिघडतोच ठेकाही! प्रवास मात्र, तसाच अखंडित.. त्याच्याच गतीचा...!! येणार खळगे, विस्कटणार सूरही.. तालास लयीची भेट घडवून आणण्याची कसरत आणि जिम्मा, फक्त आपलाच! जगणं असं स्विकारलं ना की मग सहज जमतं, लयीत ठेचकाळायला.... -बागेश्री (पूर्वप्रकाशित- दीपज्योती दिवाळी अंक २०११ - http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_09.html)

दिवसेंदिवस

लेखक शरद यांनी शनिवार, 31/03/2012 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसेंदिवस अनुराधा पाटील यांचा पहिला कवितासंग्रह "दिगन्त" १९८१ ला प्रसिद्ध झाला. दुसरा "तरीही" ८५ ला व तिसरा "दिवसेंदिवस" ९१ ला. आजच्या तरुण वाचकांना हे नाव कदाचित माहीतही नसेल पण २५-३० वर्षांपूर्वी समीक्षकांनी, लेखकांनी व कवींनी, हो, कवींनीही, त्यांच्या कवितेचे पोट भरभरून कौतुक केले होते. आज माझ्यासमोर आहे "दिवसेंदिवस". कविता वाचतांना आठवण येते पावसाळ्यात ढग दाटून आलेल्या संध्याकाळातील विषण्णतेची. अशा वेळी तुम्ही एकटे असतांना आठवणी जागृत होतात त्या बहुदा आल्हादकारक नसतातच. आणि त्यात तुमचा स्वभाव अंतर्मुख असेल तर जखमा भळाभळा वाहू लागतात.

ए माझे संजीवनी

लेखक नरेंद्र गोळे यांनी शुक्रवार, 30/03/2012 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
ए माझे संजीवनी, तुला माहीत नाही अजूनही तू रुचिरा, आणि मी युवा तुझ्यावर वाहिले कधीच मी जिवा ते कटाक्ष, ती चपळाई अन् जी तुझ्यात असे, नसे कुठे ती कला मनास मोहवी जी तुझ्यात असे, नसे कुठे मी तुझ्या, मी तुझ्या, डोळ्यात पावलो सर्व जगा तू मधुर जे बोल बोलशी हसून जराही सुंदरी तर अजूनही स्पंदने नशेत धुंद रंगती ए परी, ए परी, मी तुझा कायमच ग खुळा वक्त चित्रपटात बलराज सहानी असा दावा करतात की वय झाले तर काय झाले, अजूनही सारे कसे शाबूत आहे. तसेच. पूर्वीसारखे. शब्द पुरवले आहेत साहिर लुधियानवी ह्यांनी. अर्थातच हे गीत माझे नाही. हा आविष्कार मात्र माझाच आहे.
काव्यरस

म्हणून ......!!

लेखक फिझा यांनी शुक्रवार, 30/03/2012 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणून ............ सावरायचे होते आता सगळ्यांनाच एकमेकांबरोबर स्वतालाच ............. कुठेतरी बिनसले कि सगळे संपले असे नाही ........ नाती अशी सहजासहजी तुटत नाहीत ..म्हणून.............. झाल्या असतील खुळ्या काही चुका सुधारून पाहू ना एकदा.......... नाही जगता येत 'तुझ्याशिवाय' सांगून पाहू एकमेकांना एकदा......... ...म्हणून ................. पाण्यात मिसळलेला रंग जसा वेगळा करता येणार नाही तसाच तुझ्या आठवणीचा पसारा आवरता येणार नाही दोन श्वासातले अंतरही मोजता येणार नाही ..म्हणून........... म्हणून.....

अल्लखकरण

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 30/03/2012 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
अल्लखकरण मी तुला पाहताच मनोमन बद्धरुपांतरण| रोजच ते अनुभववावे तव धन्यमरण|| ती आज आली घेऊन गुलमोहतरण| मला देतेसे चषक तेच अल्लखकरण|| अजूनी ते येतातच पाहताच झल्लकसरण| तसे पाहता नजरेचे हे विक्षेपसंक्रमण|| शब्दांचे असे कसे सदैव कर्षित्रचर्वण| एकटाभयाण विचार ते बिंबाणुश्रवण||

वळण

लेखक नपा यांनी गुरुवार, 29/03/2012 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या वळणवर, वळताना नजर गेली इथवरच्या मार्गावरती दिसले माझेच पदचिन्हे स्पष्टपणे कधी योग्य, कधी अयोग्य कधी सन्तुलित तर कधी अनिर्बन्ध भयभीत वा निर्भिड थबकलो क्षणभर, स्वत:बद्दलचे समज गैरसमज धुसर झाले हे तर माझेच प्रतिबिंब.. आज़वरचे ..पण अगदि सत्य शहारलो, किती अनभिज्ञ होतो मी स्वत:ला.. वाट माझी खुणवत होती मन मात्र सुन्न होत् सावरलो, अन् पुन्हा लागलो अव्याहत प्रवासाला पूढच्या वळणावर थबकण्या करता..
काव्यरस