राजकारण
मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...
हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत...
१. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील.
२.
ज्योती आणि स्मृती
नमस्कार,
काल तब्येत ठीक नसल्यामुळे पूर्ण वेळ लोकसभा आणि राज्यसभा channels पाहिले.
ज्योतिरादित्य सिंधिया, स्मृती इराणी आणि अनुराग ठाकूर यांची संसदिय भाषणे ऐकली.
स्मृती इराणी आणि ज्योतिरादित्य यांनी जे काही दाखले/पुरावे दिलेत, त्यावरून तरी काँग्रेस आणि भाजप JNU प्रकरणात राजकारण करत आहे असंच वाटतंय.
खरं-खोटं न्यायव्यवस्था बघून घेईल. मुद्दा तो नाहीये.
मुद्दा असा आहे, देशाच्या एकात्मतेविरोधात जर एखादी घटना घडत असेल (सिद्ध झालेले नाहीये, तरी पण गृहीत धरू कि घडलीये), तर सरकार म्हणून आणि विरोधी पक्ष म्हणून जी असंवेदनशीलता यांनी दाखवलेली आहे तो योग्य आहे का?
भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ४)
भाग १ | भाग २ | भाग ३
-------------
काश्मीर प्रश्नाचे वेगळे[पण समजून घेण्यासाठी मी प्रथम त्याची जुनागढ आणि हैद्राबाद बरोबर तुलना करतो आणि मग तेंव्हाचा घटनाक्रम सांगतो.
जुनागढ भारतीय भूभागाला लागून होते. हैद्राबाद भारतीय भूभागाने वेढलेले होते. या दोन्ही संस्थानांची पाकिस्तानशी भौगोलिक जवळीक किंवा सलगता नव्हती. तर काश्मीर भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांबरोबर मोठी सीमा असलेले संस्थान होते.
भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ३)
भाग १
भाग २
-------------
जुनागढ हे आजच्या गुजरात मधील एक संस्थान. इथल्या नवाबाने १५ ऑगस्ट १९४७ ला माउंटबॅटनच्या भौगोलिक जवळिकीचा सिद्धांत धुडकावून लावत पाकिस्तानात सामील व्हायचा निर्णय घेतला. युक्तिवाद होता, समुद्रमार्गे पाकिस्तान जवळ आहे. मंगरूळ आणि बाबरीवाडा हे जुनागढचे दोन अंकित प्रदेश होते. त्यांनी जुनागढच्या नवाबाच्या इच्छेप्रमाणे पाकिस्तानात सामील होण्यास नकार दिला. म्हणून नवाबाने या दोन प्रदेशात आपले सैन्य पाठवले. त्यामुळे आजूबाजूची इतर संस्थाने खवळली आणि त्यानी आपापले सैन्य जुनागढच्या सीमेवर नेवून भारतीय सरकारला साकडे घातले. आणि जुनागढ मध्ये एक अस्थायी सरकार देखील स्थापण्यात आले.
भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग २)
भाग १
------------------------
आजचा आपला भारत देश म्हणजे ब्रिटीशांच्या अखत्यारीतला संपूर्ण भूभाग नाही. ब्रिटीशांच्या अमलाखालील भारताची एकदा रद्द केलेली आणि तीनदा सर्वमान्य झालेली विभागणी / फाळणी झाली. १९०५ सालची बंगालची फाळणी ही पहिली फाळणी. ती लोकक्षोभामुळे ब्रिटीशांनी मागे घेतली. मग १९१९ साली दुसरी फाळणी झाली, ती जुन्या भारतीय संस्कृतीचा भाग असलेला सुदूर उत्तर-पश्चिमेच्या एक मोठ्या भागाने स्वतःला ब्रिटीश साम्राज्यापासून स्वतंत्र घोषित केल्याने. हा भाग होता प्राचीन भारतातला, ‘गांधार’. रामायणकालीन भरताने जिंकलेला गांधार. (भरताच्या तक्ष या पुत्रावरून तक्षशीला आणि पुष्कल या पुत्रावरून पुष्कलावती या शहरांची नावे पडली असे मानतात. प्रसिद्ध इतिहासतज्ञ दामोदर कोसंबींनी, तक्षक या नागाचे शहर म्हणून तक्षशीला अशीही व्युत्पत्ती सांगितली आहे.) बामियानच्या बुद्धमूर्तींची भूमी असलेला गांधार, मगधाधीपती धनानंदाकडून अपमानीत होऊन मगध सोडून विद्यार्जन आणि विद्यादान ही दोनही कामे आयुष्याच्या मोठ्या कालावधीसाठी आचार्य चाणक्यांनी जिथल्या विद्यापीठात पूर्ण केली त्या तक्षशिलेचा गांधार. म्हणजेच आजचा अफगाणिस्तान.
भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग १)
"विष्णू पुराण" म्हणते की,
उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।।
म्हणजे राजा भरताचे साम्राज्य आसेतुहिमाचल होते. पण या सम्राट भरताच्या पुढच्या पिढ्या जगात येईपर्यंत ते खंड खंड झालेले होते. महाभारत काळाततर कुठे जरासंधाच्या मगधासारखी साम्राज्यवादी राजेशाही नांदत होती, तर कुठे मथुरेसारखी छोटी छोटी गणराज्ये. म्हणजे भरताच्या वंशजांना "आम्ही चालवू हा पुढे वारसा" काही जमले नसावे.
प्रसार माध्यमे आणि टिपिंग पॉईंट - एक रोचक संशोधन
दि न्यूयॉर्कर साप्ताहीकाचा पत्रकार माल्कम ग्लाडवेल, याने २००० मधे एक पुस्तक लिहीले होते - "The Tipping Point - How Little Things Can Make a Big Difference". कुठलिही गोष्ट अचानक मोठी होण्याआधी कशा घटना घडत असतात त्या एकमेकांना कशा लागलेल्या असतात, याचा अन्वयार्थ लावताना या पुस्तकात अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे. असा टिपिंग पॉईंट हा रोगराई, युद्धे, गुन्हेवारी वाढ इथपासून ते राजकीय बदल या सर्वत्रच दिसू शकतो. उदा. "ऑस्ट्रीयाच्या राजपुत्राचा खून हे पहील्या महायुद्धाचे तात्कालीक कारण" समजले जाते.
शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं
गिरगाव चौपाटीवर मेक इन इंडिया च्या अंतर्गत महाराष्ट्र रजनी हा कार्यक्रम सुरु असताना स्टेज ला आग लागली व खूप गोंधळ उडाला. त्यावरच प्रहारचे ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता मांडली आहे. श्याम सुंदरसोन्नर यांनी आपल्या कवितेतून सरकारवर आसूड ओढले आहेत, ही कविता सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रिय होत आहे, फेसबुक तसेच व्हॉटसअॅपवर ही कविता व्हायरल होत आहे.
साहित्यिक कसले हे !
साहित्यिक नामक जमात - कदाचित बहुसंख्येने - व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात सुमारे कशी असते याचे प्रतिबिंबच "दरवर्षी" "वाजतगाजत" ( म्हणजे बोंबाबोंब करत ) साजरे होणा-या साहित्य संमेलनात दिसते !!! ते साहित्य संमेलन आले की काही तरी वादविवाद, हाणामारी, पेपरबाजी होणार हे अगदी ठरून गेलंय. म्हंजे एखाद्या साहित्यीकाविषयी काहीतरी भलते सलते लिहून आले की संमेलन आले असे ओळखावे इतके !! साहित्याव्यतिरिक्त अन्य संमेलनाच्या बाबतीत असे का नाही होत ? उदाहरण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे घ्या.
मिसळपाव