Skip to main content

राजकारण

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 15/01/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

आरक्षण

लेखक धुरंधर यांनी मंगळवार, 12/01/2016 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
आरक्षण....! समाजातील ज्वलंत आणि संवेदनशील मुद्दा. मग ते गुजरातेत पटेल आरक्षणासाठी पेटलेलं रण असो की, महाराष्टातील मराठा,धनगर किंवा मुस्लिम आरक्षणाची मागणी असो, या सा-यामागे निव्वळ राजकारण आणि जातीच्या मतांसाठी राखुन ठेवलेलं एक हत्यार म्हणूनच राजकारणी लोकं उपयोग करवून घेतांना दिसून येतय. मुळात आरक्षण हवय कशाला..? त्याची गरज खरचं कुणाला आहे, याकडे कुणाचच लक्ष नाहीय. सगळेच आपल्या पेटीत जास्तीचे मतं कशी पडतील याकडेच लक्ष ठेउन आहेत. त्यात अजुन भगवं,हिरवं,निळं,पिवळं वादळ आहेच समाज पेटवायला. ओपन वर्गात मोडणारे सर्वच लोक खरचं प्रगत आणि उन्नत आहेत काय..? आरक्षणाचे निकष आज खरचं योग्य आहेत काय...?

बंगाली मातीचा साजरा बुरूज

लेखक माहितगार यांनी रविवार, 10/01/2016 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी क्रिकेटची बातमी खुपच हौशी क्रिडा रसिक असाल तर फुटबॉलची बातमी, कधी मधी राजकारणाच्या निमीत्ताने-कम्युनीस्ट किंवा आजकाल ममता बॅनर्जी- अल्पसा उल्लेखाच्या बातम्या फारफारतर बांग्लादेशींची घुसपैठ या पलिकडे 'कलकत्ता' आणि 'पश्चिम बंगाल' हा विषय तुमच्या माझ्या सर्वासामान्य मराठी माणसाच्या फारसा नजरेस येत नाही. विचारवंत आणि रॅशनलीस्ट असलेल्या बंगाली बाबूंनी गेली ३० ३५ वर्षे कम्युनीस्टांना लोकशाही मार्गाने स्वत:हून वाहून दिली होती म्हटल्यावर पश्चिम बंगाल मधला सेक्युल्रीझमचा झेंडा चांगलाच गाढ असेल आणि ब्राह्मोस्माज - विवेकानंदांची ते रबिंद्रनाथ टागोरांची पुरोगामी प्रतिमा आणि पश्चिम बंगाल बद्द्ल अस्म

पुढाऱ्याचे प्रेम

लेखक सप्तरंगी यांनी सोमवार, 04/01/2016 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम या थिम वर एक गद्य-पद्य लिहायचे होते त्यात मी ' पुढाऱ्याचे प्रेम ' वर लिहायचे ठरवले.

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 02/01/2016 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

लेखक DEADPOOL यांनी रविवार, 27/12/2015 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

लेखक माहितगार यांनी बुधवार, 23/12/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग स्वप्नात झाले होते पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!) पंतप्रधान मोदींचे सचीव !! :) क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग त्यांनी विचारले गेले वर्ष भर काय केले ? ओबामां फोनु आला डू यु नो अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ओह मिपाकरांना आमचा निरोप द्या ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !!

श्री.भगवंतराव वामनराव खोपडे-देशमुख

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 22/12/2015 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविकः मराठी विकिपीडियावर एखादा लेख टिकुन राहण्यासाठी ज्ञानकोश म्हणून उल्लेखनीयतेचे निकष महत्वाचे ठरतात. कोणत्याही व्यक्ती बद्दल काही विशेषत्व दाखवल्या शिवाय ज्ञानकोशीय उल्लेखनीयता स्विकार्य ठरत नाही. हनुमाना सारखे भक्त स्वतःच देवता म्हणून स्वतंत्रपणे पुजले जातात, तर मंदिराच्या स्थापना/जिर्णोद्धार/दान-धर्म/देवालयातील पायरी इत्यादीवर नाव लिहून घेणार्‍या भक्तगणांची संख्य अगणीत असते काही जणांची एखाद ओळीतच मावेल एवढाच विश्वकोशिय मजकुर उपलब्ध होणार असतो. हनुमानाकरीता स्वतंत्र लेख बनवणे समजण्या सारखे आहे.

हिवाळी अधिवेशन -मित्रपक्षांचीही नाराजी ? शेतकरी आत्महत्यांवर काय करणार?

लेखक अनिकेत एस जोशी यांनी सोमवार, 07/12/2015 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
नागपुरात सध्या हलक्या थंडीची सुरुवात झालेली आहे. सकाळच्या वळेत एखादा स्वेटर चालू शकेल इतपतच थंडी आहे. सोमवारपासून नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होते आहे आणि त्यासाठी इथे दाखल होणाऱ्या मुंबईकरांना ही थंडी आल्हाददायक नाही वाटली तरच नवल. वातावरण पुढे अधिकाधिक थंड होणार आणि राजकारण मात्र गरमागरम होत जाणार असे नागपूरच्या अधिवेशनाचे वैशिष्ठ्यच आहे. तसेच यंदाही घडते आहे. गेली अनेक वर्षे प्रत्येक मुख्यमंत्र्यांना मनात कुठेतरी एका कोपऱ्यात नागपूरच्या अधिवेशनाची भीती वाटावी अशीच स्थिती राहिलेली आहे.

भारतिय वंशाचा बाबुशा पोर्तुगालचा पंतप्रधान !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 27/11/2015 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
भारतिय वंशाचे अंतोनिओ लुई सान्तोस दा कोस्टा हे २६ नोव्हेंबर २०१५ पासून पोर्तुगाल या देशाचे पंतप्रधान झाले आहेत. सप्टेंबर २०१४ मध्ये ते सोशियालिस्ट पार्टी या पोर्तुगालच्या मुख्य विरोधी पक्षाचे सेक्रेटरी जनरल बनले. ते लिस्बन या पोर्तुगालच्या राजधानीचे मेयर (२००७ ते २०१५) होते. या अगोदर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर (१९९७ ते १९९९), मिनिस्टर ऑफ जस्टिस (१९९९-२००२) व मिनिस्टर ऑफ स्टेट अँड इंटर्नल अ‍ॅड्मिनिस्ट्रेशन (२००५ ते २००७) या पदांवर काम केलेले आहे.