Skip to main content

राजकारण

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 14/09/2011 08:19 या दिवशी प्रकाशित केले.

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध

स्विस बँकेतले भारतीयांचे काळे पैसे भारत सरकार कधी परत आणणार?

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 13/09/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
स्विस बँकेतले भारतीयांचे काळे पैसे भारत सरकार कधी परत आणणार? (Times of India मधील बातमीचे भाषांतर) स्विस बॅंकातील गुप्त खात्याबद्दलची माहिती जाहीर करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या रुडॉल्फ एल्मर यांनी यांनी या काळ्या पैशाची पाळेमुळे खणण्यात भारत सरकारने प्रामणिकपणे पुढाकार घेतला नाहीं अशी खंत आज व्यक्त केली. स्वत: "ज्युलियस बार" या स्विस बॅंकेत एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करत असताना अशा तर्‍हेने "शिट्टी फुंकून" गुप्त बातम्या जाहीर करणारे रुडॉल्फ एल्मर यांच्यासारखे फार थोडेच लोक असतात. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही पत्करावा लागला आहे. नुकतीच त्यांची कारावासातून सुटका झाली.

गरिब मंत्री

लेखक सुनिल पाटकर यांनी सोमवार, 05/09/2011 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
हे तुम्हाला पटतं का ? पंतप्रधानांच्या सुचनेनुसार केंद्रीय व राज्यमंत्र्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा सादर केला आहे . यातील अत्यंत गरिब मंत्री एम विरप्पा मोहली १३ लाख मालमत्ता , ए.के.अंटनी यांच्याकडे केवळ १ लाख ८२ हजार रुपये आहेत त्यांच्या पत्नीची परिस्थिती बरी आहे तिच्याकडे ३७ लाख १८ हजार रु.ची मालमत्ता आहे.सुदीप बंदोपाद्याय यांच्याकडे ५६ लाखाची मालमत्ता आहे.आपले शरद पवार १२ कोटी मालमत्तेचे धनी आहेत .पंतप्रधानांकडे ५ कोटीची मालमत्ता आणि हसु नका मारुती ८०० गाडी आहे.सर्वाधिक मालमत्ता कमलनाथ २५० कोटी आणि प्रफुल पटेल १०३ कोटी . टू जी स्पेकट्रम मध्ये आपला हात साफ केलेले

"दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसून कापूस वाटी!"

लेखक सुधीर काळे यांनी शनिवार, 03/09/2011 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांच्या आंदोलनात सरकारची फजीती! परिस्थिती अंगाशी आल्यावर माणूस काय नाहीं करत? पण ती तशी अंगावर येईपर्यंत कांहींच न करणारा माणसाला काय म्हणावे? कदाचित् अशा व्यक्तींसाठीच "दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसून कापूस वाटी![१]" ही म्हण रूढ झाली असावी! एप्रिलच्या मध्यापासून ऑगस्टच्या मध्यापर्यंत केंद्र सरकारने ’रेटारेटी’त घालविलेले दिवस आणि १६ ऑगस्ट ते २७ ऑगस्टच्या दरम्यान चांदण्यात बसून (घाईघाईने) वळलेल्या वाती हे या म्हणीचे सार्थ उदाहरण आहे!

फ्रायडे टाईमपास

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 02/09/2011 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

शाबासकी आणि निर्भत्सना

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 01/09/2011 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
शाबासकी आणि निर्भत्सना! (कामरान शफी या स्तंभलेखकाने लिहिलेला हा लेख काराचीहून प्रसिद्ध होणार्‍या 'डॉन' या वृत्तपत्रात २३ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाला. तो मला खूप आवडला म्हणून तो लेख मी शफीसाहेबांची आणि 'डॉन'ची रीतसर परवानगी घेऊन इथे अनुवादित केलेला आहे. शफीसाहेबांना या लेखाला आलेल्या आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल खूप उत्सुकता आहे.)

एक कलेक्टर दोन मंत्री

लेखक आळश्यांचा राजा यांनी मंगळवार, 30/08/2011 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
१० ऑगस्टला पंचायती राज विभागाच्या सचिवांचा कलेक्टरांना फोन आला. “अजित, नारायण सुंदरम १३ तारखेला इथे येतायत. ब्रह्मपूरला ते नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार आहेत. तुला त्यासाठी एक प्रेझेन्टेशन करावं लागेल.” “नक्कीच सर. फक्त काय बोलायचं नाही ते सांगीतलंत तर बरं होईल सर,” कलेक्टर अदबीने म्हणाले. नारायण सुंदर केन्द्र सरकारातील मंत्री. राज्य सरकारचा केन्द्राशी छत्तीसचा आकडा. त्यामुळे सुंदरांच्या समोर आपण काही बोलून बसू आणि नंतर राज्य सरकार आपल्याला धारेवर धरायचं ही कलेक्टरांची भीति निराधार नव्हती. सचिवांनी कलेक्टरांचा रोख ओळखला. हसत हसत म्हणाले, “अरे घाबरु नकोस.

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा

लेखक रणजित चितळे यांनी सोमवार, 29/08/2011 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
जन लोकपाल हे विधेयक संसदेत आणण्यासाठी अण्णा हजारे ह्यांच्या आमरण उपोषणा बद्दल लोकांकडून व सरकार कडून बरेच प्रश्न विचारले जात आहेत. प्रामुख्याने त्यातले काही प्रश्न असे आहेत. अ) जन लोकपाल किंवा लोकपाल विधेयक आणल्याने भारतातला भ्रष्टाचार संपणार नाही. ब) अण्णा हजारे ह्यांचे आमरण उपोषण हे असंविधानिक आहे व पुढे हेच उदाहरण घेऊन बाकीची लोकं सरकारला वेठीस धरू लागतील. क) जन लोकपाल विधेयक लागू करण्यालायक नाही. त्यातल्या तरतुदी लोकशाहीच्या तत्त्वांविरुद्ध आहेत. ड) विधेयक संसदेत आणायला व ते पारित होण्यास वेळ लागतो.