Skip to main content

राजकारण

नवाज शरीफ सही बोलले!

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 22/05/2011 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
नवाज शरीफ सही बोलले! (माझ्या नेहमीच्या लेखांतील विचारांपेक्षा एक वेगळाच विचार मांडणारा लेख) गेल्याच आठवड्यात नवाज शरीफ यांनी सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्काच दिला! कराचीत त्यांच्या "पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज" या पक्षाच्या वतीने बोलावलेल्या पत्रकारसंमेलनात त्यांनी "पाकिस्तानने आता भारताला त्याचा सर्वात मोठा शत्रू समजणे सोडून दिले पाहिजे" असे उद्गार काडले आणि "पाकिस्तानला जर प्रगतीच्या वाटेवर पाऊल टाकायचे असेल तर त्याने भारताबरोबरच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन (Re-appraisal) केले पहिजे" असेही ते पुढे म्हणाले.

मन उगाच भरकटते -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 17/05/2011 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे सर्व कामं आटपून हातात वर्तमानपत्र घेतलं . कुठेतरी कुणीतरी आंदोलन केलं होतं , त्याचा पाठपुरावा म्हणून आंदोलनाविषयी सविस्तर बातमी आली होती . माझी नजर त्या बातमी मधील चौकटीवर खिळली होती. आंदोलन 'संपवण्या'साठी आतुर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराचे छायाचित्र त्या चौकटीत दिसत होते. त्यात पोलीस कुणाच्या पाठीवर , कुणाच्या पायावर तर कुणाच्या हातावर - हातातील काठीने जमेल तसा (त्वेषाने-) मार देतांना दिसत होते ! एका बाजूला पाठमोरा बसलेला एक मरतुकडा ज्येष्ठ नागरीक दिसत होता. ' अहो पोलीसदादा , मी नुसता या बाजूने चाललो होतो, माझा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही हो!

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर बिघडू लागलेले अमेरिका-पाकिस्तान संबंध

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 12/05/2011 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर बिघडू लागलेले अमेरिका-पाकिस्तान संबंध १ मे २०११ रोजी (आपल्या २ मे रोजी) अखेरीस ओसामा बिन लादेनला ठार करण्यात अमेरिकेला यश मिळाले. पण या घटनेमुळे पाकिस्तानच्या अमेरिकेबरोबरच्या दगाबाज वागणुकीवरील, अविश्वासार्हतेवरील (खोट्या-खोट्या) रहस्यावरचा ’बुरखा’ शेवटी उचलला गेला ही एक चांगली घटना घडली! मागे एका लेखात लिहिल्याप्रमाणे अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंध कधीच परस्पर-विश्वासाच्या किंवा परस्परांबद्दलच्या आदरभावनेच्या पायावर कधीच आधारलेले नव्हते. तर तो फक्त 'सोयीसाठी लावलेला म्होतूर'च होता!

भारतिय? जनता पार्टि आणी तिची तथाकथीत संस्कृती

लेखक अजातशत्रु यांनी शुक्रवार, 06/05/2011 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
अंक पहिला >> निमीत्त होते मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या फेरीवाल्यांची सभा या सभेत बी.जे.पी चे शहरअध्यक्ष पदावर असलेले "के राज पुरोहित" मुंबई इलाख्या मधुन जमलेल्या तमाम फेरीवाल्यांना (प्रामुख्याने भय्ये) यांना आपण किती हुशार/ शुर/ आणी अकलेचे कांदे आहोत हे आवेषात दाखवत होते... (त्यानी त्यांची हुशारी आणी शुरपणा एक विद्यार्थी असलेल्या मुलीवर दाखवला) मै राज पुरोहित, मै भारतीय जनता पार्टिका अध्यक्ष (छाती ठोकुन) मुंबे का प्रदेश अध्यक्ष यहा ये ऐलान करता हु की..जो कुछ उस सीडी मै दिखाया गया है वो सब झुट है ! ये गरीब हौकर्स के खिलाफ षडयंत्र है वो सीडी नकली है. हे महाभाग महाराष्ट्रामध्ये राह

शेतीची सबसिडी आणि "पगारी" अर्थतज्ज्ञ

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 03/05/2011 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
सबसिडी कुठाय? गेल्या अनेक वर्षापासून मी ऐकत आलोय की शेतीला भरमसाठ सबसिडी दिली जाते. शाळा-कॉलेजात शिकत असताना पहिल्यांदा ‘शेतीची सबसिडी’ हा शब्द ऐकण्या-वाचण्यात आला. अगदी तेव्हापासून मी शेतीत सबसिडी कुठे आहे म्हणून शोधण्यासाठी जिवाचा आटापिटा करत बसलोय; पण मला काहीकेल्या ही शेतीतली सबसिडी गवसतच नाहीये. बहुतेक तळहातावरच्या केसासारखीच ही ‘शेतीची सबसिडी’ सुद्धा अदृश्य स्वरूपात अस्तित्वात असते की काय, किंवा मीच तर अंधार्‍या खोलीत नसलेले काळे मांजर शोधत बसलो नाही ना? असा एक प्रश्न आजकाल माझा मलाच पडायला लागला आहे.

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

जन्मदिनी डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन

लेखक तर्री यांनी गुरुवार, 14/04/2011 07:09 या दिवशी प्रकाशित केले.
१४ एप्रिल . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आम्बेडकरांच्या जन्मदिना निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन . हिन्दु धर्मामधील जाती व्यवस्थेविरुध्द विद्रोह करणार्‍या तसेच भारतीय घटनेच्या शिल्पकारास कोटी कोटी प्रणाम .मराठी वर आत्यंतिक प्रेम करणार्‍या ह्या महामानवाच्या महाराष्ट्राची मात्र सर्व बाजुनी अधोगती होते आहे हा दैव-दुर्विलास.

श्री. सुधीर काळे यांचे अभीनंदन

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 10/04/2011 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांचा झेंडा पुन्हा एकदा प्रिंट मिडीयावर लागला. सुधीर काळे मिपावर जागतीक घडामोडींचा आढावा नेहमीच घेत असतात. त्यांचा "मित्रराष्ट्र म्हणून कशी आहे अमेरिका"" हा लेख दि.३ एप्रीलच्या सकाळच्या "सप्तरंग" पुरवणीत छापुन आला आहे. तो लेख येथे वाचा.

जपान मध्ये पुन्हा भुकंप

लेखक विनायक बेलापुरे यांनी गुरुवार, 07/04/2011 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
जपान मध्ये नुकताच पुन्हा एकदा भुकंप झाला आहे. हा भुकंप ७.१ रिश्टर चा असून ११ मार्च च्या भुकंपाहऊन त्याचा केंद्र बिंदू जपानच्या अधिक जवळ आहे. सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.