शेतकरी संघटक : वर्धापनदिनाच्या निमित्ताने
शेतकरी संघटक : वर्धापनदिनाच्या निमित्ताने
ही गोष्ट आहे १९८६-८७ च्या सुमारातली. सुरेश चोपडे सकाळी ६ च्या सुमारास माझ्या वर्धेतील खोलीवर आला आणि आल्याआल्याच अगदी दारावरूनच हुकूम सोडला.
“ए आवर रे पटकन, आपल्याला तातडीने निघायचे आहे.” मी सुद्धा कुठे,कशाला,कशाने वगैरे कोणताही उपप्रश्न न विचारताच तयारी केली आणि बाइकवर बसलो. तो येतानाच रवीभाऊ काशीकर यांचेकडूनच बाइक घेऊन आला होता. रस्त्याने निघालो आणि मग सांगायला लागला. “मुरलीचा (मुरलीधर खैरनार) फोन होता. ‘आठवड्याचा ग्यानबा’ अंक प्रिटींगला गेलाय पण कागदाला पैसे नाहीत म्हणून छपाई थांबली आहे.
मिसळपाव