Skip to main content

साहित्यिक

गुत्तुडा

लेखक टारझन यांनी गुरुवार, 24/06/2010 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
"ए कटली रे कटली " "ए मध्या .......... पकड पकड " "मांजा पकड ... मी पतंग घेउन आलो " "च्यायला ... टार्‍या लै गुतुडा झाला लका .. मांजा काय कामाचा नाय " " आण रं इकडं .... गुतुडा आसला मुन काय आख्खा मांजा वाया घालितो का ? " काही नात्यांचही असंच असतं , बरिच गुंतागुंत असते आणि आपण तो गुंता सोडवण्याबाबद बर्‍याचदा पॅसिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. गोष्ट मनाला बोचत असते कुठे तरी. पण कधी इगो आडवा येतो, मी कमीपणा का घेऊ ? मी का गैरसमज दुर करावेत ? नाती नेहमी रक्ताचीच असावीत असंही नाही. इनफॅक्ट आपला नातेवाईकांशी हल्ली संबंध तरी कितीसा येतो हो ? कधी सुख-दु:खाच्या प्रसंगात तोंडदेखली चार हाय-बाय-कसंकाय ?

मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 21/06/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
डीसक्लेमर :- खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. खालील युक्त्या ह्या गंमत म्हणुन दिल्या आहेत, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करु नये, तोंडावर पडल्यास लेखक अथवा मिपा जबाबदार नाही. "पर्‍या , यार मिपावर कोण विचारत नाही बे आपल्याला. इतके लेखन केले, प्रतिक्रीया दिल्या पण चार सदस्य पण धड ओळखत नाहीत." आमचे मित्रवर्य उद्वेगाने म्हणत होते.

घरगुती सावरकर

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 28/05/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज.... सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे.

शिवाजी महाराजांवर ई-बुक

लेखक अस्मी यांनी शुक्रवार, 21/05/2010 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
सारंग माडगुळकर यांनी शिवाजी महाराजांवर King Shivaji -the spiritual quest म्हणून एक ई-बुक मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत लिहिले आहे... शिवइतिहासामध्ये 'मिर्झाराजांची मोहीम' व 'आग्रा भेंट' ही दोन प्रकरणे चुकीची लिहिली गेली आहेत, असं त्यांच मत आहे. भाग १ मिर्झाराजे जयसिंह प्रकरणाचे सत्य स्वरूप ! ...

विजय तेंडुलकरांचा !

लेखक दिपोटी यांनी बुधवार, 19/05/2010 04:54 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल २०१० मध्ये अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनात प्रकाशित झालेल्या 'हितगुज'च्या संमेलन विशेषांकात हा माझा लेख प्रथम छापला गेल्यानंतर शुक्रवार १४ मे रोजी 'सकाळ' वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीत व आज १९ मे रोजी विजय तेंडुलकरांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त याच वर्तमानपत्राच्या मुंबई आवृत्तीत छापला गेला आहे.

कानुन का बेटा...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 17/05/2010 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
"कानुन का बेटा" "मै हर काम कानुन के दायरेमें रहकर करता हूं! कोइ गुनाह भी करता हूं तो इस तरह की कानुन कि कोइ भी दफा उसे गुनाह ना कह सके! कानुन की दफाओंके बीच सुरंग बनाकर कानुन को भी इन्साफ दिलाता हूं मैं! लोग मुझे कानुन का जादुगर कहते है... मगर मै हूं "कानुन का बेटा!" हिंदीचं वेड शाळेत असल्यापासुनच होतं, कदाचित त्यामुळेच वैकल्पिक भाषा म्हणून संस्कृतच्या ऐवजी हिंदी घेतली होती. अगदी दहावी - बारावीलादेखील हिंदीला ९५ च्या पुढे मार्क होते. पुढे पुढे जसे हरिशंकर परसाई, प्रेमचंद, शैल चतुर्वेदी, अशोक चक्रधर हे वाचनात येत गेले तसे हिंदीचे वेड अजुनच वाढत गेले. कॉलेजला आल्यानंतर मात्र टेस्ट बदलत गेली.

"जान्हवी"-- पुस्तक परिचय.

लेखक टुकुल यांनी बुधवार, 12/05/2010 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकः जान्हवी लेखकः वि. वा. शिरवाडकर प्रथम आव्रुती: १९५२ प्रकाशकः कॉन्टिनेन्टल प्रकाशन किंमतः 50.00 परवा घरी थोडा वेळ मिळाला आणी बर्‍याच दिवसापासुन पडुन राहीलेले "जान्हवी" हातात घेतले. त्याआधी एकदा तीसेक पाने वाचली होती, पण परवा एका दमात पुस्तक वाचुन संपले (संपवावे लागले) वि. वा. शिरवाडकरांचे माझ्यासाठी पहिलेच पुस्तक आणी प्रथम आव्रुती १९५२ ची, त्यामुळे वाटले कि काहीतरी जुनाट वाचायला मिळेल, पण शेवटचे पान वाचुन पुस्तक ठेवले त्यावेळी डोक सुन्न झाले आणी तो विचार गळुन पडला हि कथा मुख्यतः तिन व्यक्तीभोवती फिरते. वसुदेव, महंत आणी जान्हवी.

चेतन भगतला अनावृत्त पत्र

लेखक विनायक पाचलग यांनी रविवार, 09/05/2010 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज ६ महिन्यानी पुन्हा मिसळपाव वर येत आहे , ऑक्टोबरमध्ये अभ्यास आणि इतर कारणांसाठी मिपाचा रामराम घेत असताना परिक्षा झाल्यावर परतायचे हे ठरले होतेच.त्यानुसार आज परत येत आहे. मधल्या काळात अनेक घटना घडल्या. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ,अनुभव घेता आले. या सार्‍यानी समृद्ध होऊन आज पुन्हा आलेलो आहे. आपले माझ्यावर प्रेम आहेच ,ते तसेच रहावे ही मनापासुन विनंती... याच काळात साप्ताहिक साधना मध्ये मी एक लेख लिहिला होता, त्यावर तुमचे मत जाणुन घ्यायला मी उत्सुक आहे , म्हणुन हाच लेख आज इथे देत आहे..

पुस्तकविश्व.कॉम -वापराकरिता खुले.

लेखक नीलकांत यांनी शनिवार, 01/05/2010 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्वप्रथम महाराष्ट्रादिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व मराठी रसिकांना कळविण्यास आनंद होतो की, मराठी नववर्षारंभाच्या मुहुर्तावर पुस्तकविश्व ह्या प्रकल्पाची (www.pustakvishwa.com) जी घोषणा करण्यात आली होती तो प्रकल्प आज १ मे २०१० रोजी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधुन पुर्णत्वास आला आहे. आजपासुन पुस्तकविश्व.कॉम (www.pustakvishwa.com) हे संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी खुले करण्यात येत आहे. पुस्तकविश्व.कॉम येथे आपण वाचलेल्या, आवडी-नावडीच्या पुस्तकांबद्दल परिचय, परीक्षण लिहु शकता.

गंधमय अस्तित्त्वाचा शोध.......

लेखक सांजसखी यांनी सोमवार, 26/04/2010 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
होती एक जमीन.... खडकाळ, भेगाळलेली, ओसाड आणि नापीक..... अतिशय निरपेक्ष ..... जणू स्वतःच्या अस्तित्त्वाची जाणीव नसलेली.... काळाच्या ओघात गोठलेल्या भावनांची आणि त्यामुळे या भावनाविश्वाशी दूर दूर जाऊ पहाणारी....... तिच्या मनात एकच सलं होता..... आपण नापीक... निरूपयोगी.... आणि म्हणूनच की काय सारं जगं आपल्याला वाळीत टाकल्यासारखं दुर्लक्ष करतं.... तिला सतत एकच भीती असायची... ती सतत बदलणार्‍या ॠतूंची.... कधी रखरखणार्‍या ऊन्हाची......तर कधी झोंबणार्‍या वार्‍याची .... कधी हुलकावणी देणार्‍या अन न बरसणार्‍या ढगांची...... असचं आयुष्य होतं तिचं .. एकाकी... निरस.. रू़क्ष... पण काळाचा महिमा खरचं अजब असतो....