आहे मनोहर तरी
सुनिता देशपांडे ह्यांचं “आहे मनोहर तरी” हे पुस्तक फार पूर्वी म्हणजे अगदी शाळकरी वयात वाचलं होतं. त्यावेळी त्यांचा खूप राग आला होता…की आपल्या पु.ल.देशपांडेंबद्दल असं कसं काय लिहिलं त्यांनी. म्हणजे तसं काही वाईट लिहिलं नव्हतं पण ….तरीसुद्धा आतून कुठे तरी वाईट वाटलं होतं. आता लग्न होऊन स्थिरस्थावर झाल्यानंतर…. नवरा-बायकोचं खरं नातं कळल्यानंतर…. थोडी परिपक्व झालीये असं वाटल्यानंतर….. अगदी ठरवून पुन्हा एकदा वाचलं हे पुस्तक आणि अगदी मनापासून भिडलं मनाला.
आपण कधी कधी फक्त एकाच बाजूने विचार करतो आणि तोच बरोबर आहे असं गृहीतही धरतो. पण जेव्हा दुसरी बाजू आपल्याला कळते तेव्हा मात्र ओशाळल्यासारखं होतं.
मिसळपाव
काल पु.लंची जंयती आणि त्याच्या एक दिवस आधी सुनीताबाईंच्या जाण्याने अवघे साहित्यविश्व हळहळले. वरुन कडक शिस्तीच्या आणि करारी व्यक्तिमत्वाच्या पण आतुन मृदू स्वभावाच्या सुनीताबाई ‘आहे मनोहर तरी...’ नंतर केवळ पुलंच्या पत्नी म्हणून नव्हे तर एक उत्तम सिद्धहस्त लेखिका म्हणून साहित्यविश्वाला समजल्या. पु.लंच्या जडणघडणीतही त्यांचा वाटा मोठा आहे. आम्हा वाचकांना पु.ल. आणि सुनिताबाई त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातुन आणि थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या आठवणीतून उमजले, भावले.