Skip to main content

समाज

असच..

लेखक पुष्कर विजयकुमार जोशी यांनी गुरुवार, 05/07/2018 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
अशुद्ध लेखनासाठी माफ करा, ऑफीस मधे क्विलपॅड उसे करावं लागतं. ======================== "So, are you from India" - तिने सुमधुर स्वरात विचारलं. "Yeah, from quite far. So since when are you practicing this dance?" - संभाषण पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न. युरोपात प्रत्येक शहरात अशा काही जागा असतातच जिथे singles एकत्र जमतात. अशाच एका बुचारेस्ट नावाच्या शहरातली एक जागा. अमाप सुंदर पूर्व युरोपिअन मुलं-मुली. मद्य असं प्यायलं जातं जसं उद्या नाहीच. एका हातात मद्याचा प्याला, दुसऱ्या हातात जळती सिगारेट. गोठवणारी थंडी, ओपन एअर पब. इथे अँप्रोच करण्याचे नियम असतात. मुलं मुलींना अँप्रोच करणार.

रेल्वे कोणाची हो ! रेल्वे आमच्या बापाची....

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 05/07/2018 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय रेल्वेच्या प्रवासातील हा एक प्रसंग. मी एका प्रवासास प्रारंभ केलेला. गाडीत मध्यम स्वरूपाची गर्दी होती. माझा डबा आरक्षित स्लीपर गटातला होता आणि त्यातली काही आसने रिकामी होती. अशातच तीन हिंदी भाषक माझ्या डब्यात आले आणि माझ्या समोरील रिकाम्या आसनांवर बसले. ते बसल्यानंतर थोड्याच वेळात आमच्या आसपासची शांतता भंग पावली. ते तिघे मोठमोठ्या आवाजात असभ्यपणे हिंदीतून बडबडू लागले. त्यांच्या संभाषणातून ते रेल्वेचेच कर्मचारी असल्याचे समजले. तसेच ते ‘रेल्वे आपल्या ‘बा’चीच आहे’ असे त्यांच्या वर्तनातून जाणवून देत होते. आम्ही प्रवासी ते निमूटपणे सहन करत होतो.

विज्ञान सनातन (अनादी) आहे, कि ईश्वर निर्मीत ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 01/07/2018 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
हा प्रामुख्याने एकेश्वरवादी 'श्रद्धावंत' आणि आस्तीकांसाठीचा प्रश्न आहे. विज्ञान हा शब्द आधूनिक कालिन सायन्स याच अर्थाने वापरला आहे. श्रद्धावंतांसमोर विज्ञानाच्या बाबतीत हा प्रश्न या पुर्वी कुणी ऊपस्थीत केला आहे का, किंवा उहापोह केला आहे का माहित नाही. (ज्यांना धागालेख न वाचता शीर्षकावरुन सरळ चर्चा सहभाग घ्यायचा आहे त्यांनी तसे करण्यास हरकत नाही.) पण अशा धर्तीवरचे जरा वेगळे प्रश्न ग्रीक तत्वज्ञांनी ऊपस्थीत केले होते. त्यानंतर ख्रिश्चन धर्माच्या विकासाच्या सुरवातीच्या काळात ईश्वरादेश (उदा बायबल) सनातन म्हणजे ईश्वरा प्रमाणेच अनादी आहेत की एकेश्वर निर्मीत असा प्रश्न उपस्थीत केला गेला.

जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत!

लेखक निनाद यांनी रविवार, 01/07/2018 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे सात तारखेनंतर दुकानातली गर्दी भयंकर असायची. कारण प्रेसचे पगार व्हायचे. एखाद्या आठवड्याने गर्दी जरा कमी व्हायची. मग आई एका संध्याकाळी हाक मारायची. आणि यादी करायला बसवायची. मी आमच्या दोन खोल्यांच्या घरात स्वयंपाक खोलीमध्ये पाटावर बसून वाट बघायचो. आईकडे तिने काढून ठेवलेला पाठकोरा कागद असायचा. मी खाली धरायला वही घेऊन पेन्सिलिने यादी करायला सुरुवात करायचो. हं लिही, स्वच्छ मोहोरी शंभर ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत! हरबरा डाळ एक किलो, स्वच्छ हवी, मागच्यावेळी पिवळे खडे निघाले होते. मुगाची डाळ एक किलो गुळ अर्धा किलो शेंगदाणे अर्धा किलो, खवट नको.

संघाचा स्वातंत्र्यलढ्यामधे सहभाग होता का ?

लेखक आशु जोग यांनी रविवार, 01/07/2018 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
संघाचा स्वातंत्र्यलढ्यामधे सहभाग होता का ? या मुद्द्यावरून विरोधक पुन्हा पुन्हा टिका करताना दिसतात. काय असतील या संघ विरोधामागची कारणे ? इंग्रजांविरुद्ध मोठ्या लढाईला सुरुवात झाली ती 1857 मधे. त्याचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले आणि झाशीच्या राणीसारखे संस्थानिक त्यात सहभागी होते. पुढे वासुदेव बळवंत फडकेंनी सशस्त्र लढा दिला. सर्वात कमी वयाचा क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे, तीन चाफेकर बंधू फासावर चढले.

स्वैपाकघरातून पत्रे ३

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 30/06/2018 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अन्नपूर्णा, तू जेव्हा कुणाला कौतुकाने सांगतेस ना, आज अठरा वर्षे झाली पण या किसणीची धार जश्शीच्या तश्शी आहे, तेव्हा माझे खवल्याखवल्याचे अंग मोहरून येते. माझ्यावर खराखरा होऊ लागले कि मुळा, काकडी, गाजरं, रताळी, बटाटे, खोबरं यांची मस्ती अशी जिरते, मला फार मज्जा वाटते. I enjoy it. तुम्ही लोक माझ्या नावाचा इंग्रजी किस’शी चाबरट संबंध जोडून, कोट्या करता ना........., मी ऐकते ते! आधी मला माहित नव्हते इंग्रजी ‘किस’ म्हणजे काय ते!

आठवणी

लेखक चंद्रकांत यांनी मंगळवार, 26/06/2018 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
‘आठवणी’ एक लहानसाच, पण अर्थाचे अनेक आयाम असणारा शब्द. आनंदाच्या पाकळ्या घेऊन उमलत राहणारा, कधी वेदनांच्या व्यथा घेऊन कोमेजणारा. आठवणी समुद्रासारख्या अथांग. आभाळासारख्या अफाट. क्षितिजासारख्या अमर्याद. आयुष्याच्या वाटेवरून प्रवास घडताना इच्छा असो, नसो स्मृतींची सोबत घडत राहते. कुणासाठी त्या आनंदाचं अभिधान असतात, तर कुणासाठी वेदनांचे वेद. आठवणींचं पाथेय घेऊन निघालेली माणसे सुखांचे कवडसे हाती लागताना हरकतात. पदरी पडणाऱ्या वंचनेच्या वेदनांनी विकल होतात. त्यांचं असणं, नसणं जेवढं कालसापेक्ष तेवढंच परिस्थितीसापेक्ष. आठवणींच्या ओलाव्याने मनाचं आभाळ भरून येतं.