एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
२: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
११ मे ला पहाटे साडेपाचला परभणीतून निघालो. अनेक जण निरोप देण्यासाठी आले, त्यामुळे उत्साह आणखी वाढला. अनेक जणांनी मॅसेजवरही शुभेच्छा दिल्या. काही अंतरापर्यंत माझे प्रिय सायकल मित्र आणि माझे रनिंगचे गुरू बनसकर सरसुद्धा सोबत आले. मी चालवतोय ती एटलस सायकल त्यांचीच तर आहे! पाय दुखत असूनही ते काही अंतर सोबतीला आले. थोडा वेळ त्यांची सोबत मिळाली व मग पुढे निघालो. योग प्रसार हेतु सायकलिंगच्या ग्रूपवर माझं लाईव्ह लोकेशन टाकलं आहे.
मिसळपाव
दहावीची परीक्षा देऊन निकालाची वाट बघत होतो. आमच्या डोंबिवली तल्या चन्दुमामाने मला एका लोकल लायब्ररीत नोकरी करतो का असं विचारलं. वाचायची आवड होतीच. म्हटलं भरपूर पुस्तकं वाचायला मिळतील. व्यवहारज्ञान आलेलं नव्हतं पण पैसे न मोजता हे करता येईल याचा कोण आनंद होता. महिना दीड महिना केली असेल नोकरी मी ती. पण ते असं पुस्तकांच्या संगतीत दिवसभर राहणं मला खूप आवडून गेलं होतं. ती लायब्ररी जणू माझं पहिलं प्रेमच होतं.