समाज
निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी
निर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे.
निर्लेप ब्रँडची भांडी हा विशेषतः मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. अडुसष्ट सालच्या सुमारास सरकारने स्टेनलेस स्टील आयात करण्यावर निर्बंध आणले त्यामुळे आताचे निर्लेपचे मालक श्री राम भोगले यांच्या वडिलांनी प्लास्टिकचे ( टेफ्लॉन ) कोटिंग असणारी भांडी बाजारात आणली. हा प्रयोग आपल्या देशात पहिलाच आणि अद्भुतच होता ! निर्लेप यंदा आपल्या उद्योगाचा सुवर्णमहोत्सव साजरे करतो आहे.
माझे नेहरवायण ३
पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या डिस्कव्हरी ऑफ ईंडिय बद्दल पुर्नवाचन करत आहे . मागच्या लेखात नेहरुंच्या पडदा पद्धतीच्या विरोधात असलेल्या प्रागतिक विचारांची दखल घेतली.
वस्तुतः भारतीय संस्कृतीच्या सकारात्मक बाजू विशेषतः भारतीय उपमहाद्विपातील विवीधतेतून एकता हे तत्व त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ ईंडिया मधून जोरकसपणे मांडलेले आढळते. आणि हेच माझ्या या पुस्तकाबद्दलच्या आस्थेचे एक मुख्य कारण आहे.
मुस्लीम समाजातील पडदा पद्धती योग्य आहे काय ?
You are not free if you feel the need to hide
* Burqa-clad women prone to vitamin D deficiency: Doctors : Syed Mohammed TNN (टाईम्स ऑफ ईंडिया न्यूज नेटवर्क) Updated: Jun 7, 2013, 03:11 IST
** ' ड' जिवनसत्व विषयक अलिकडील कुमार यांचे चर्चा धा
* Burqa-clad women prone to vitamin D deficiency: Doctors : Syed Mohammed TNN (टाईम्स ऑफ ईंडिया न्यूज नेटवर्क) Updated: Jun 7, 2013, 03:11 IST
** ' ड' जिवनसत्व विषयक अलिकडील कुमार यांचे चर्चा धाएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा
६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ५: अंबड- औरंगाबाद
योग- सायकल प्रव
आईचा मुलगा
साठ्ये आजी म्हणत,' काय गं तुम्ही पोरी! रात्रीबेरात्री फिरतां! घरं दारं सोडून इथे शिकायला येता, कि असे गुणं उधळायला येता?' त्यांचे म्हणणे कोsssणी कानात घालून घेत नसे, मनावर तर नाहीच नाही. त्या आठ मुली आपापसांत नेत्रपल्लवी करत आणि निघून जात.
त्या काहीच न बोलता गेल्या, कि आजी आणखी खवळत. ‘अपर्णा गो, अपर्णा, कुठे गेली ही?’ अपर्णा, त्यांची एकुलती एक सून वरच्या मजल्यावर रहात असे. पण आजींच्या लक्षात रहात नसे. आपल्यापासून आपला मुलगा आणि सून वरच्या मजल्यावर वेगळे राहतात, हे त्या विसरून जात. तासभर अपर्णा अपर्णा करीत. जयंता मग तळमजल्यावरच्या ऑफिसमधून आईला पहायला मध्येच डोकवायचा.
पूर्वा ( भाग २ ) (सत्यकथेवर आधारित )
" अगं पूर्वा, ये ग जरा मदत करायला . " राहुलची आई तिला बोलावत होती .
" हो येते ना काय करताय ? " - पूर्वा
" अगं काय हा पसारा झालाय त्यातून काय करायचा सुचत नाहीये बघ राहुलला लाडू खायची इच्छा झाली होती म्हणून हे सगळं घेऊन आले पण या कामाच्या रगाड्यात काही करायचं होईना . आज जरा वेळ मिळाला तर हा सगळं पसारा झालाय . मी आवरून घेते मग आपण बसुया करायला. " अहो तुम्ही बसा काकू मी आवरते पसारा . "
" अगं तुला कुठं हि काम सांगू . "
" अहो असू द्या हो मी करते हे . तुम्ही बघा किती दमलाय आणि किती घाम आलाय तुम्हाला . थोडा वेळ बसा तोपर्यंत होईल माझं . "
" बर बाई बसते मी .
उगाच वणवा भडकलेला , गजरेवालीने त्यात टाकली माती
मी इकडून आलो
ती तिकडून आली
मी बघताच थांबलो
पण ती निघून गेली
सुस्कारा सोडत वर बघितले
हळूच इकडेतिकडे बघितले
दुसरी मटकत येतच होती
ती पण न बघताच निघून गेली
कैक आल्या वाटेवरती
अशाच गेल्या वाटेवरुनी
अजून एक दुरुन येत होती
चालता चालता लाजत होती
काय होतंय ते काहीच कळेना
उगाच छाती धडधडत होती
गजरा सुंदर माळलेला
चेहरा कोमल उजळलेला
लटके झटके बघुनी सारे
भाव मनातील पिसाळलेला
जवळ येऊनि मला म्हणाली
काका, घड्याळात वाजले किती ?
काव्यरस
गणु अन गणूची मनू
गणु अन गणूची मनू
लय भारी
गणू गोत्यात येई
मनू जाता माहेरी
मनू जाता येई मंजिरी
गणूची मंजिरी
मनू सारी
गणू नाही पाहिला
गणू नाही राहिला
गणूची येगळीच दुनियादारी
कधी मनू तर कधी मंजिरी
असे हजर सदैव दारी
गणु मग्न तो
गणु भग्न तो
गणु हासतो
गणु नाचतो
मनातल्या मनात
गणु धावतो
गणु पडतो
गणु चालतो
कधी खेळतो
आतल्या आत
गणूची यातना
भेदे मना
खेळ रंगला
खेळ भंगला
गणू संपला
पंचतत्त्वात
सिद्धेश्वर विलास पाटणकर
काव्यरस
मिसळपाव