Skip to main content

समाज

तुमच्या देशात....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 13/04/2018 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.' '........' ------ 'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही. 'काय पाहणार हिंदमध्ये?' तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते.

प्रदूषण (२५): महानगर - एक प्रदूषित कारागृह

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 12/04/2018 19:06 या दिवशी प्रकाशित केले.

शेरखान जंगलाचा राजा. राजा असला तरी पोट-पाण्यासाठी त्याला शिकार करावीच लागायची. किमान दहा-बारा वेळी प्रयत्न केल्या वर त्याला शिकार गवसायची. कधी सांभर सारखे मोठे जानवर गवसले तर काही दिवस मेजवानी. तर कधी-कधी सस्या सारख्या छोट्या जनावरा वर ही गुजाराण करावी लागे. कधी-कधी कित्येक दिवस उपासमार ही व्हायची. तरी ही शेरखान खुश होता. कुठल्या जनावराचा शिकार करायची हे ठरविण्याचे स्वतंत्रता त्याच्या पाशी होती. आपल्या मर्जीचा तो राजा होता. तो जंगलात कुठेही फिरू शकत होता. पण म्हणतात न, काळ कधीच एकसारखा नसतो. एक दिवस शेरखान शिकारीला निघाला होता. त्याला एका पिंजर्यात लटकलेले जनावराचे मांस दिसले.

निष्ठा आणि लोणी

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 10/04/2018 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
एका जंगलात त्या जंगलाचा राजा सिंह रहात होता, त्याला काही उंदरांनी सतावून सोडले होते. ते उंदीर तो झोपलेला असताना त्याची आयाळ कुरतडत, त्याला त्रास देत. इतका मोठा सिंह पण उंदरांचा बंदोबस्त करू शकत नसे. म्हणून मग त्याने एक मांजर नोकरीवर ठेवले. मांजर सिंहाला त्रास देणाऱ्या उंदरांना खात असे. त्यामुळे सिंहाची झोपही नीटपणे व्हायला लागली. याबदल्यात सिंह मांजराला रोज दूध देत असे.

वास बापूंचा

लेखक रानरेडा यांनी रविवार, 08/04/2018 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाआधी एक काळ असा आला कि मी आणि भाऊ दोघेही मुंबईबाहेर नोकरी करीत होतो आणि आई काहीशी एकटी झाली होती. त्याच वेळी बिल्डींग मध्ये अनेक बायका अनिरुद्ध बापू भक्त झाल्या होत्या आणि आई हि बरीच नास्तिक असली तरी त्यांच्या बरोबर जाऊ लागली. मग एकदा कधीतरी तिने हे एक खरेखुरे साधुपुरुष आहेत, किती चांगले बोलतात असे सांगितले. थोडे ऐकताच मी तिला सांगितले कि सर्च जण फ्रोड असतात, तू यांच्या नादी लागू नकोस.नंतर तिने भावाला सांगितले ( मी नसताना ) ; तर भाऊ तिला अशा चोरांच्या नादी लागू नकोस म्हणून ओरडला. मग तिची आणि भावाची वादावादी झाली. मग तिने मला सुनवले कि तुम्ही कसे आजीबात धार्मिक नाही ....

अधिजनुकशास्त्र - समारोप

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 06/04/2018 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी आत्तापर्यंत जे काही किडुकमिडुक शिक्षण घेतले त्यात "असंबद्ध विचारांचा प्रतिवाद" या विषयाचा समावेश नव्हता त्यामुळे माझ्यामध्ये एक फार मोठे न्यून राहीले आहे याची मला जाणीव आहे. माझे अनेक हितचिंतक व नातेवाईक व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी कधीच मला माझ्या "delusions of grandeur " विषयी सांगितले नाही याचे मला आश्चर्य वाटते आणि आता तर राग आला आहे. त्यांच्यावर कोणत्या कायद्या अंतर्गत दावा दाखल करता येईल का, याचा शोध घेत आहे. नुकतेच बहुधा विकीपिडीयावर भारत हे सर्वात कमी आय० क्यु० असेलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे असे वाचले.

गणपत वाणी, सतत मागणी

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 02/04/2018 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
गणपत वाणी, सतत मागणी. विड्या ओढून थकलेला गणपत वाणी कवितेच्या छपराखाली अलंकार गोळा करताना मला दिसला. म्हणाला, 'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता कोण कवी वापरतो? तसा एखाद दुसरा हौशी असतो नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?' त्याला एकदा मालक म्हन्ले, 'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही काव्यापेक्षा कवित्व जड आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात कवितेला हाणून पाडतात. गणप्या, आता तुझं काम एकच, अलंकार काढायचे, अन कविता वाळत टाकायची.' 'मग काय होईल मालक?' पिंक टाकीत मालक म्हन्ले , ' काय होईल? अरे, मग काय वास्तवदर्शी, सत्याचे खोल भान, कित्ती खर्र वा, वा!

अधिजनुकशास्त्र - एक गैरसोईचे विज्ञान

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 19/03/2018 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाने विवेकाचा, शिक्षणाचा, आधुनिकतेचा कितीही टेंभा मिरवला तरी गैरसोईचे सत्य पुढे आले की तो गडबडुन जातो, चवताळतो. हे गैरसोईचे सत्य मी-मी म्हणणार्‍या लोकांना अडचणीत आणते. मग मूळ प्रश्न शिताफीने नाकारून तो प्रश्न उजेडात आणणार्‍याला सुळावर चढविण्याचे उद्योग होतात. हे सर्व ठाऊक असून आज एक गैरसोईचे सत्य मला सांगायचे आहे. हे सत्य सांगायचे आणि स्वीकारायचे धाडस फार थोडे लोक करतील. आपण अन्नधान्याची आधुनिक तंत्रज्ञानाने निर्मिती करतो, तेव्हा त्या अन्नाचे पोषणमूल्य जास्तीत असावे यासाठी उत्तम प्रतीच्या बियाणाचा वापर शेती करताना व्हावा याकडे आग्रह आपला असतो.

.... बाकी तुमचं चालू द्या।

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 19/03/2018 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
काल एक मेसेज आला.... गुढीपाडवा साजरा करू नका... कलश म्हणजे राजाचं शिर... वगैरे वगैरे. काल मुद्दाम डेक्कनवर गेलो... आमच्या राजाला नमस्कार केला. आज गुढी उभारली... कडुनिंबाची पानं खाल्ली... श्रीखंड केलं.... बाकी तुमचं चालूद्या! काही लोकांनी दीपिका पदुकोणचं नाक - शिर उडवण्याची मागणी केली म्हणे. तिने भारतीय संस्कृतीचा अपमान... वगैरे वगैरे... चित्रपट बघितला नाही पण ती पोरगी दृष्ट लागण्याइतकी सुंदर दिसते. तिचे काही चित्रपट आवर्जून पुन्हा पुन्हा बघतो... छान वाटतं....बाकी तुमचं चालूद्या! फेसबुकवर पोस्ट वाचली....मुसलमानांनी नेहेमीच हिंदूंना.... वगैरे वगैरे.

माझे अपहरण

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 15/03/2018 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझे अपहरण ... मी पोते, सुतळी, दाभण घेऊन तयार आहे.. मी वाट पहात, दबा धरून बसलेय. मला माझेच अपहरण करायचे आहे.. कुत्रा माग काढणार नाही, भिकारी चुकून माझी एखादी खुण लक्षात ठेवणार नाही, गाड्यावरचा भाजीवाला ओळख दाखवणार नाही, शाळेत जाणारे पोर मला बघून हसणार नाही, नाक्यावरचा फुटकळ तरुण मला बघून, न बघितल्यासारखा करणार नाही, कुणी रिक्षावाला माझ्या अगदी जवळून रिक्षा नेणार नाही, .......